विदर्भ व मराठवाड्याचे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात - शेतकरी मिशनचे मदतीसाठी सरकारला साकडे
दिनांक -१३ नोव्हेंबर २०१७
यावर्षी पाऊसाने दिलेला फटका ,त्यांनतर कीटकनाशक फवारणीचे विषबाधेचे संकट ,आता गुलाबी अळीसह अनेक प्रकारच्या रोगाची पिकांना झालेली लागण त्यातच सर्रास हमीभावापेक्षा कमी भावात होत असलेली कापुस ,सोयाबीन ,धान ,मुंग ,उडीतची पडेल भावात विक्री ,नाफेड व सि सि आय ,पणन महामंडळ यांनी जाचक अटी लाऊन सुरु असलेला प्रचंड त्रास यामुळे विदर्भ व मराठवाड्यातील सुमारे ७० लाखावर शेतकरी कुटुंब दशकातील सर्वात मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करीत असल्यामुळे महाराष्र्टाच्या मायबाप सरकारने सर्व कापूस ,सोयाबीन ,धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहावे अशी विनंती कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा. मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठवाडा व विदर्भाच्या कापुस उत्पादक क्षेत्राचा दौरा करून केली आहे. माननीय कृषिमंत्री भाऊसाहेब पुंडकर यांना सुद्धा आपण संकटाची जाणीव दिली असुन त्यांनीसुद्धा संपुर्ण विदर्भ मराठवाड्यातील ४० लाख हेक्टरमधील उभे कापसाचे अभूतपूर्व गुलाबी अळीच्या हल्ल्याची गंभीर दखल घेत कृषीखात्याला अहवाल सादर करण्याचे ,सर्व वादग्रस्त बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर सरकार नुकसान भरपाईची कारवाई करीत असल्याची माहिती देण्याचे तिवारी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे .
एकीकडे कापूस ,सोयाबीन ,धान उत्पादक शेतकरी कीटकांच्या अनियंत्रित हल्ल्याने आपले उभे पीक नष्ट करीत आहे त्यातच थोडाबहुत माल घरी आला त्याला नाफेड व सि सि आय ,पणन महामंडळ जाचक अटी लावत असल्यामुळे आतापर्यंत खुल्या बाजाराची लुट रोखण्यासाठी सरकार पुर्णपणे अपयशी ठरत असल्याचे चित्र विदर्भ व मराठवाड्यात दिसत असुन शेतकरी वर्गात प्रचंड नाराजीचा सूर ऐकू येत असुन ,शेतकऱ्यांच्या या कठीण समयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच त्यांना खंबीरपणे आधार देऊ शकतात असा विश्वास त्यांनी माझ्याजवळ व्यक्त करीत असल्यामुळे आपण तात्काळ मदतीचा हात द्यावा अशी विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे .
मागील वर्षी सोयाबीन व तुर या पिकांचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या विदर्भ व दशकातील शेतकऱ्यांना पडेल भावामुळे झालेल्या विक्रमी तोट्याचा सामना केल्यानंतर यावर्षी महाराष्ट्रात कापसाच्या विक्रमी सुमारे ४८ लाख हेक्टरमध्ये बी . टी . कापसाची पेरणी केली होती मात्र पाऊसाने त्यावर थिप्स ,मिलीबग ,बॊडअळी, गुलाबी अळी यांच्या अनियंत्रित हल्ल्यामुळे संपुर्ण पीक गारद झाले आहे आता ही रोगराई सर्वच पिकांवर गेल्याने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी विनंती तिवारी यांनी केली आहे
मागील दोन वर्षात गुजरात ,तेलंगणा ,पंजाब व मराठवाड्यात मोठयाप्रमाणात बॊडअळी , गुलाबी अळी यांचा हल्लामुळे नापिकीच्या घटना समोर आल्या आहेत यामुळेच महाराष्ट्राच्या कृषी विभागाने मागीलवर्षीच्या तक्रारीवरून राशी कंपनीच्या बी टी बियाण्यावर बंदी टाकली आहे मात्र यावर्षी संपुर्ण विदर्भ व मराठवाड्यात अमेरीकेच्या मोनसँट्रो या कंपनीचे "बोन्डअळीरक्षक बोल गार्ड" हे तंत्र अळीमध्ये यातील विषाणूवर निरोधकता आल्यामुळें पुर्णपणे अयशस्वी होत असल्यामुळे केंद्र सरकारने या संकटावर तोडगा काढावा व सरळ वाणाचे हायब्रीड कापसाचे बियाणे उपलब्ध करावे अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे .
मागील दोन वर्षात गुजरात ,तेलंगणा ,पंजाब व मराठवाड्यात मोठयाप्रमाणात बॊडअळी , गुलाबी अळी यांचा हल्लामुळे नापिकीच्या घटना समोर आल्या आहेत यामुळेच महाराष्ट्राच्या कृषी विभागाने मागीलवर्षीच्या तक्रारीवरून राशी कंपनीच्या बी टी बियाण्यावर बंदी टाकली आहे मात्र यावर्षी संपुर्ण विदर्भ व मराठवाड्यात अमेरीकेच्या मोनसँट्रो या कंपनीचे "बोन्डअळीरक्षक बोल गार्ड" हे तंत्र अळीमध्ये यातील विषाणूवर निरोधकता आल्यामुळें पुर्णपणे अयशस्वी होत असल्यामुळे केंद्र सरकारने या संकटावर तोडगा काढावा व सरळ वाणाचे हायब्रीड कापसाचे बियाणे उपलब्ध करावे अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे .
केंद्रातील कृषी मंत्रालय व भारतीय कृषी संशोधन संस्था या भारतातील १३० लाख हेक्टरमधील कापसाच्या पिकावरील संकटावर पुर्णपणे उदासीन असुन महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने या बी टि कापसाच्या संकटावर तोडगा काढण्यासाठी लिहलेल्या पत्रात आपण शेतकऱ्यांना देशी सरळ वाणाचे बियाणे वापरण्यासाठी सांगा असा सल्ला देण्यात आला होता मात्र देशात १३० लाख हेक्टरसाठी कापसाचे बियाणे तर सोडा १३० हेक्टर वर पेरण्यासाठीही बियाणे नाहीत हे सत्य तिवारी यांनी मुख्यमंत्री समोर मांडले आहे . जर अमेरीकेच्या मोनसँट्रो या कंपनीचे "बोन्डअळीरक्षक बोल गार्ड" हे शोधतंत्र निकामी झाले आहे तर बी टी बियाणांची मुळ संकरीत बियाणाची २०० रुपये प्रती पाकीटाची किंमत लागू करण्याचा कृषी विभागाचा केंद्र सरकारला सादर केलेला प्रस्ताव तात्काळ लागु करावा अशी किशोर तिवारी केली आहे .
============================== ============================== ==
==============================
No comments:
Post a Comment