Monday, November 27, 2017

बोंडअळीचे संकट अख्ख्या भारताच्या कापुस उत्पादक क्षेत्रात-शेतकरी मिशनने दिला भारत सरकारला तोडगा


बोंडअळीचे संकट अख्ख्या भारताच्या कापुस उत्पादक क्षेत्रात-शेतकरी मिशनने दिला भारत सरकारला तोडगा  
दिनांक -२७  नोव्हेंबर   २०१७
यावर्षी ऑगस्टच्या सुरवातीला गुलाबी बोंडअळीचे लगतच्या तेलंगणा राज्यात आलेले संकट आता   संपुर्ण विदर्भ व  मराठवाड्यात ,मध्यप्रदेश ,गुजरात राज्यात पसरले आहे यात महाराष्ट्राच्या कापुस उत्पादक क्षेत्रात प्रचंड नुकसान झाले असुन मात्र कृषी खाते ,केंद्रीय कापूस शोध संस्था ,भारतीय कृषी संशोधन परिषद ,कृषी विद्यापीठ यांनी ह्या अभुतपुर्व संकटावर पुरेसे लक्ष न दिल्यामुळे  विदर्भ व  मराठवाड्यातील सुमारे ७० लाखावर कापुस उत्पादक शेतकरी  दशकातील सर्वात मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करीत असल्यामुळे
कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा. मिशनने गुलाबी  बोंडअळीचा विषय केंद्रात व राज्यात लावून धरला असून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई ,गुलाबी  बोंडअळीच्या संकटातुन कायम सुटका यासाठी सर्व स्तरावर पाठपुरावा सुरु केला असुन या बोंडअळीच्या प्रकोप टाळण्यासाठी कालबद्ध पंचसूत्री तोडगा शेतकरी स्वा. मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला आहे . 
आपल्या पंचसूत्री बोंडअळी समस्या निवारण कार्यक्रमात किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्र्याना सादर केलेल्या अहवालात कापुस उत्पादक शेतकऱ्यांच्या गुलाबी  बोंडअळीच्या संकटाला सुरवातीला सरकारने भारतातील देशी कापसाचे बियाणाच्या जागी  आणलेले अमेरीकेचे  संकरीत कापसाचे बियाणेच मूळ कारण असुन व  आता बी टी कापसाचे "बोन्डअळीरक्षक बोल गार्ड" हे तंत्र अळी मारण्यास  यातील विषाणूवर  निरोधकता आल्यामुळें पुर्णपणे अयशस्वी होत असल्यामुळे संपुर्ण विदर्भ मराठवाड्यातील ४० लाख हेक्टरमधील उभे कापसाचे अभूतपूर्व गुलाबी अळीच्या हल्ल्याने पूर्णपणे खल्लास झाले आहे . मागील दोन वर्षात गुजरात ,तेलंगणा ,पंजाब व मराठवाड्यात मोठयाप्रमाणात बॊडअळी, गुलाबी अळी यांचा हल्लामुळे नापिकीच्या घटना समोर आल्या आहेत यामुळेच महाराष्ट्राच्या कृषी विभागाने  मागीलवर्षीच्या तक्रारीवरून राशी कंपनीच्या बी टी बियाण्यावर बंदी टाकली आहे मात्र यावर्षी संपुर्ण विदर्भ व मराठवाड्यात अमेरीकेच्या मोनसँट्रोच्या परवानाधारक   कंपन्याच्या  बियाणांवर सरसकट हल्ला झाला आहे त्यामुळे   बोंडअळीच्या संकटाला राष्ट्रीय स्वरूप आले आहे त्यातच महाराष्ट्रातील कापुस हे ४० लाख हेक्टर वरील सर्वात मोठे नगदी पीक असल्याने विदर्भ व  मराठवाड्यातील सुमारे ७० लाखावर कापुस उत्पादक शेतकरी हवालदील झाले आहेत म्हणूनच शेतकरी मीशनने हा प्रश्न लावून धरला आहे 
आपल्या पंचसुत्रीमध्ये सादर   केलेल्या प्रस्तावात किशोर तिवारी यांनी सरकारला शेतकऱ्यांचे गुलाबी  अळी यांचा संकटाचा सामना करण्याकरितां प्रबोधनाची मोहीम सुरु करण्याचा व या संकटाचे मूळ कारण आता निवारण करण्याकरीता उपाययोजना ,नुकसान भरपाईसाठी कारवाईची संपुर्ण माहीती त्यासाठी कृषी ,ग्रामविकास व महसुल विभागाचा सहभाग ,कापसाचे गुलाबी अळीग्रस्त पीकामध्ये उभे पीक  गाई म्हशी बैलांना वा बकऱ्याना चारणे त्यामुळे अळीचा सरसकट नाश  होईल ,उरलेले कापसाचे पीक नष्ट करणे ,जमिनीमधील गुलाबी अळीच्या अंडी नष्ट करणे ,कापसाचे पीक डिसेंबर नंतर फरतड न घेता काढून फेकणे ,मॉन्सूनपूर्व कापसाची पेरणी टाळणे ,कापसाचे पीक यावर्षी  गुलाबी अळीग्रस्त झाले असल्यास पुढच्या वर्षी  डाळीचे वा तेलबियांचे पीक घेणे,बियाणे कंपन्या विरुद्धचा सामुहिक नुकसान भरपाईचा दावा सादर करावयाचा असल्यामुळे तक्रारी  दाखल करणे गरजेचे असुन त्यासाठी शेतकऱ्यांना संपुर्ण माहिती देणे ,अमेरीकेचे कापसाचे बियाणे गुलाबी अळीचे निमंत्रक असल्यामुळे या कापसाच्या बियाणांच्या जागी भारतीय सरळ वाणाच्या कापसाचा पेरा करणे एकमेव उपाय कापुस उत्पादक शेतकऱ्यांसमोर असल्यामुळे सरकारने कृषी खाते ,केंद्रीय कापूस शोध संस्था ,भारतीय कृषी संशोधन परिषद ,कृषी विद्यापीठ यांना कामावर लावणे गरजेचे असुन विदेशी बियाणे कीटकनाशक कंपन्याचे कृषि क्षेत्रातील साम्राज्य संपण्याचा निर्वाणीचा सल्ला  किशोर तिवारी यांनी दिला आहे .
= ======================================

No comments: