Thursday, November 2, 2017

महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या सदस्य (विधी) पदी अॅड. विनोद तिवारी यांची निवड

महाराष्ट्र  जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या सदस्य (विधी) पदी अॅड. विनोद तिवारी यांची निवड

नागपूर: महाराष्ट्र   शासनाच्या जलसंपत्ती नियामक प्राधिकरण या उच्च स्तरीय आयोगाच्या सदस्य (विधी) पदावर पाणी समस्या व त्याचे नियमन या क्षेत्रात राज्य स्तरावर काम करीत असलेल्या ”जल संघर्ष “ या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष व नागपूर येथील जेष्ठ  विधीज्ञ अॅड. विनोद तिवारी यांची निवड राज्यपाल श्री. विद्यासागर राव यांचेद्वारे करण्यात आली आहे. 
राज्यातील सर्व जलसंपदा व पाण्याचे न्यायोचित, समसमान वितरण व व्यवस्थापन यासाठी महाराष्ट्र  जलसंपत्ती नियामक प्राधिकरण कायदा, २००५ “ खाली महाराष्ट्र राज्यात    जलसंपत्ती नियामक प्राधिकरण स्थापन झालेले असून जागतिक बँकेच्या मदतीने उभारण्यात येणारे विविध धरण प्रकल्प व सिंचनाच्या पायाभूत सुविधेतुन निर्माण झालेल्या जलसंपदेचे शेती सिंचन, उद्योग-कारखाने, औष्णिक विद्युत प्रकल्प, महानगरपालिका, नगरपरिशदा व ग्रामीण क्षेत्रातील पेयजल वितरण व्यवस्थेसह भूजलसंपदा, नद्या  व पाणी स्त्रोत्रांचे संपुर्ण व्यवस्थापन व न्यायोचित पाणी वितरण यासाठी हा उच्चाधिकार आयोग कार्यरत असून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात सुरू असलेल्या जनहित याचीकेद्वारे या जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाला सर्व उच्चाधिकार देवून कार्यान्वित करण्याचा आदेष पारीत झाल्यानंतर राज्यपाल विद्यासागर राव यांनी उच्चाधिकार निवड समितीच्या शीफारसी वरून या आयोगावर तीन सदस्यांची नियुक्ती केली आहे. त्यात सदस्य (विधी) म्हणुन अॅड. विनोद तिवारी (नागपूर-यवतमाळ) यांचेसह सदस्य (भूजल संपत्ती) डाॅ. रतनचंद जैन (दिल्ली) आणि सदस्य (अर्थव्यवस्था) प्रा. डाॅ. शिवाजीराव सांगळे (औरंगाबाद) यांची नेमणूक राज्यपाल श्री राव यांनी केली आहे. 
अॅड. विनोद तिवारी यांनी इंजिनियरींग, व्यवस्थापन, कायदा, लोक प्रषासन, पर्यावरण, माहितीतंत्रज्ञान, मानवी हक्क कायदा, कर प्रणाली कायदे, अर्थ व्यवस्थापन इ. क्षेत्रात पदवीत्तर शिक्षण  प्राप्त केले असून त्यांना विविध क्षेत्रातील कार्याचा ३३ वर्षाचा  दांडगा अनुभव आहे. जलव्यवस्थापन व पाण्याचे न्यायोचित वितरण या विषयावर अॅड. तिवारी यांनी राष्ट्रीय  व अंतराष्ट्रीय स्तरावर विविध संम्मेलनात भाग घेतला असून ”जल संघर्ष “  या लोक चळवळीच्या माध्यमातून ते राज्यातील सिंचन व्यवस्थेच्या रेंगाळलेल्या विविध प्रकल्पाच्या पुर्णत्वासाठी सातत्याने लढत असून मुख्यमंत्री श्री. देवेन्द्र फडणवीस यांच्या लोकउपयोगी ”जलयुक्त शीवार“ या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या अमलबजावणीत महत्वाची भूमिका पार पाडली आहे. 
विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या व ग्रामीण जनजीवनाच्या समस्यांची अॅड. तिवारी यांना जाण असून जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या नविन जबाबदारीने ते ग्रामीण जनतेला त्यांचा पाण्यावरील समसमान व न्यायोचित हक्क मिळवून देतील असा विश्वास  व्यक्त करण्यात येत आहे. 
केंद्रीय जलसंपत्ती मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, महाराश्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शेतकरी स्वावलम्बन मिशनचे  अध्यक्ष श्री. किशोर तिवारी व यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांनी अॅड. तिवारी यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे. 
----------------------------------------------------------------------------------------------------------------

संपर्क: अॅड. विनोद तिवारी 
मो. 9371137653/9370373777

No comments: