बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देणार : किशोर तिवारी
दिनांक -१९ नोव्हेंबर २०१७
सध्या विदर्भात कपाशी पिकांवर बोंडअळीचा प्रार्दुभावर आला असून या बोंडअळीमुळे कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याबरोबरच पिक ५० टक्क्यावरून जास्त कमी प्रमाणात होण्याची शक्यता आहे . ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आला आहे. अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल व ज्या ज्या बियाणे कंपन्यांचे कापसाचे बियाणे खराब निघाले आहे त्या सर्व कंपन्यांन्यावर सरकार नुकसान भरपाईचे दावे टाकणार असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी आपली रीतसर तक्रार द्यावी त्यासाठी कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करुन अहवाल सादर करावा, अशा सुचना स्व. वसंतराव नाईक कृषी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मौदा येथील शेतकरी समस्या आढावा बैठकीत केली . या बैठकीला शेतकरी नेते विजयभाऊ तेलंगे ,प्रमोदभाऊ देशटीवार .उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते ,तहसीलदार महादेवराव जोरवार उपस्थित होते .
शेतकऱ्यांशी चर्चा करतांना किशोर तिवारी यांनी कापसाच्या पिकाच्या व बियाणाच्या विषयी महाराष्ट्रात सक्त कायदा असल्यामुळे एकही बियाणे कंपनी नुकसान भरपाई पासुन सुटणार नाही मात्र गुलाबीअळीग्रस्त सर्व शेतकऱ्यांनी रीतसर तक्रार करणे गरजेचे आहे जर कृषी विभागाचे अधिकारी वा कर्मचारी तक्रार घेत नसतील माझ्याशी मोबाईल -०९४२२१०८८४६ वर संपर्क करण्याची विनंती त्यांनी यावेळी केली . जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रार्दुभाव आलेला असल्यामुळे शेतकऱ्यांचे यामुळे बरेच नुकसान होत आहे. त्यामळे तिवारी यांनी तातडीने बैठक घेऊन बोंडअळीमुळे होत असलेल्या नुकसानीचा आढावा घेतला. तसेच शेतकरी फवारणी करताना विष बाधित झाले होते. अशा किटकनाशक औषधी विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करावे. ज्या किटकनाशकामुळे शेतकरी बाधित झाले. त्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येईल. शेतकऱ्यांकडे किटकनाशक खरेदीचे देयक नसल्यास त्यांच्याकडून शपथपत्र घ्यावे, अशा सुचनाही यावेळी त्यांनी केल्या. शेतकऱ्यांना पीककर्ज माफी देऊन नवीन पीककर्ज देणे आवश्यक आहे. पीककर्ज माफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात ३१ मार्चपर्यंत जमा करण्यात येईल. विद्युत विभागाने शेतकऱ्यांचे प्रलंबित विज देयक असलेल्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापू नये, अशा सुचना विद्युत विभागाला केल्या. यावेळी राजीव गांधी जिवनदायी योजनेचा, शेतकरी अन्नसुरक्षा योजना, शेतकरी अत्महत्या याचाही आढावा घेतला..
No comments:
Post a Comment