राजूरवाडीच्या शंकर चायरे शेतकऱ्याची आत्महत्या राज्याच्या कृषी संकटाचे विदारक सत्य - किशोर तिवारी ११ एप्रिलला राजूरवाडीला भेट देणार
दिनांक -१० अप्रिल २०१८

किशोर तिवारी ११ एप्रिलला राजूरवाडीला भेट देणार
शंकर चायरे यांच्या आत्महत्येची गंभीर दाखल घेत शेतकरी मिशनचे अध्यक्ष व शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी ११ एप्रिलला दुपारी त्यांच्या दारावर जाऊन सांत्वना करणार असुन सरकार व समाज त्यांच्या कुटुंबासोबत असुन त्यांना प्रत्येक स्तरावर मदत करण्यात येईल . त्यांच्या पत्नी, तीन मुली व एक मुलगा यांना घाटंजी तालुक्यातच सात महिण्याआधी टिटवी गावात प्रकाश मानगावकर यांच्या कुटुंबाला पालकमंत्री मदन येरावार यांनी दिलेला दिलासा शंकर भाऊराव चायरे यांच्या कुटुंबाला देऊ अशी माहीती किशोर तिवारी यांनी दिली .
यावर्षी सोयाबीन ,कापुस ,तुरीसह धानाची विक्री हमीभावापेक्षा कमी भावात झाली आता हरभऱ्याची खरेदीही राजरोसपणे ३ हजार रुपयांनी होत आहे त्यातच भारताच्या कापुस उत्पादक शेतकऱ्यांना गुलाबी बोंडअळीचा फटका बसला असुन सिंचनाची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांना तर यावर्षी प्रचंड नुकसान झाले आहे यावर सरकारने घोषीत केलेली मदत निकषात व नौकारशाहीच्या लफड्यात अडकली आहे . भारत सरकारच्या पंतप्रधान कृषी भूमी आरोग्य कार्ड योजना ,पंतप्रधान कृषी विमा योजना ,पंतप्रधान कृषी सिंचन योजना ,कृषीमालासाठी बाजार ,वखार योजना ,कृषी पीककर्ज वाटप योजना ,कृषिपंप वीज वाटप योजना सर्वात महत्वाचे कृषिमालाला लागवड खर्चावर आधारीत हमीभावाचा प्रश्न ,कापूस ,तूर ,सोयाबीनची हमीभावामध्ये होत असलेल्या खरेदीच्या अडचणीची दूर करण्यासाठी होत असलेले अपूरे प्रयन्त यामुळे विदर्भ मराठवाड्यातील कापूस-तूर -सोयाबीन उत्पादक शेतकरी सुद्धा गुजरात सारखे अडचणीत आहेत व सरकारने गंभीरपणे या नाराजीवर तोडगा काढावा अशी विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे .
यावर्षी अचानकपणे आलेले गुलाबी बोंडअळीचे अभूतपूर्व संकट ,कापुस -सोयाबीन व तुरीला आलेली मंदी यामुळे विदर्भ मराठवाड्याचे संपूर्णपणे हवालदील झाले आहेत या शेतकरी आत्महत्याग्रस्त क्षेत्रात केंद्र सरकारने विषेय आर्थिक पॅकेज देणे गरजेचे असुन शेतकऱ्यांची नुकसान भरपाई कृषी विभाग बियाणे कंपन्यांवर कोर्ट केसेस दाखल करून वसुल करून देणार असा पोकळ दावा करीत आहे राष्ट्रीय व राज्य विपदा निधींमधून देण्यात येणारी मदत सुद्धा कृषी विभागाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे तोटकी मिळणार अशी भीती निर्माण झाली असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदतीचा आधार द्यावा अशी विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे .
====================================================================
No comments:
Post a Comment