Monday, April 23, 2018

तूर खरेदीची मुदतवाढीच्या निणर्याचे शेतकरी मिशनकडून स्वागत-प्रलंबित चुकारे -गोदामांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा -किशोर तिवारी

तूर खरेदीची मुदतवाढीच्या निणर्याचे शेतकरी मिशनकडून स्वागत-प्रलंबित चुकारे -गोदामांचा  प्रश्न तात्काळ मार्गी लावा -किशोर तिवारी 

दिनांक -२४ एप्रिल २०१८

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या विशेष विनंतीवरून  केंद्रीय कृषिमंत्री श्री राधामोहन सिंह यांनी   किमान आधारभूत दर योजनेंतर्गत 20१७-१८ या हंगामासाठी तूर खरेदीची मुदत   महाराष्ट्रासाठी १५ मे २०१८ पर्यंत वाढवून दिल्याबद्दल विदर्भ व मराठवाड्यातील सुमारे ३० लाखावर तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे  यामुळेसर्व शेतकर्‍यांना त्यांच्या तुरीला आश्वासित हमीभावाप्रमाणे किंमत मिळू शकणार असल्यामुळे या निणर्याचे स्वागत कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी केले असुन नाफेडने सध्या वखारींचे कारण समोर करून विदर्भ व मराठवाड्यातील बहुतेक खरेदी केंद्रे बंद केल्याच्या तक्रारी येत असल्यामुळे तसेच नाफेडच्या खरेदी प्रतिनिधींच्या चुकांमुळे शेतकऱ्यांना चुकारे मिळत नसल्याच्या तक्रारींकडेही तिवारी यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे . 

राज्यात शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात तूर शिल्लक असताना शासनाने खरेदी बंद केल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. खरेदी बंदचा निर्णय मागे घेऊन तूर खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी सर्वस्तरावरून होत होती ,आता घरात साठवलेली तूर विकावी कुठे, असा प्रश्न शेतकºयांना सतावत होता . खुल्या बाजारात व्यापाऱ्यांनी तुरीचे दर पाडले आहे. घसरलेल्या दरात तुरीची विक्री केल्यास मोठा आर्थिक फटका बसणार होता . त्यामुळे तूर शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता  त्यातच खरीप हंगाम तोंडावर येत आहे. या हंगामासाठी बियाणे, कीटकनाशके घेण्याची तजवीज शेतकऱ्यांना करावी लागणार असल्या मुळे सरकारने तूर खरेदी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत होती राज्य सरकारच्या पाठपुराव्याने केंद्राने आता १५ मे प्रयन्त मुदतवाढ दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे आता सर्व खरेदी केंद्रे सुरु करणे व तात्काळ चुकारे देणे काळाची गरज असल्याचे मत किशोर तिवारी यांनी व्यक्त केले आहे . 
 शेतकरी मिशनच्या वर्धा ,वाशीम ,अमरावती व यवतमाळ जिल्हाच्या मार्च महिन्याच्या दौऱ्यात शेकडो शेतकऱ्यांनी पहिलेच  तुरीचे उत्पन्न कमी आणि अत्यल्प भाव मिळत असताना तुरीचा चुकारा वेळेवर देन्यास असमर्थ असलेली शासन व्यवस्था यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला असल्याची तक्रार केली होती हवालदिल शेतकरी आर्थिक अडचणीत असल्यामुळे  नगदी चुकारा मिळवा यासाठी ३५०० ते ४००० च्या दराने आपली तूर गावातील खाजगी व्यापाऱ्याला विकत असल्याच्या तक्रारी समोर आली होत्या  तोच व्यापारी त्याच शेतकऱ्याचा सातबारा लावुन नाफेड विकत असल्याचे  सत्य  पाहील्यावर किशोर तिवारी यांनी शेतकऱ्यांना आपले सातबारा व नावाचा वापर चुकाऱ्यासाठी व्यापाऱ्याला करू देऊ नका अशी विनंती केली व सातबारा गोळा करणाऱ्या व्यापारी व त्यांची घरपोच तुरी घेणारे अधिकारी यांची तक्रार करण्याची विनंती केली आहे .
========================================================================

No comments: