Sunday, April 15, 2018

कृषी विभागाच्या ग्लायफोसेट या तणनाशकाच्या वापरण्यास बंदी घालण्याच्या प्रस्तावाचा सरकारने गंभीरपणे विचार करावा - किशोर तिवारी


कृषी विभागाच्या ग्लायफोसेट या तणनाशकाच्या वापरण्यास बंदी घालण्याच्या प्रस्तावाचा सरकारने गंभीरपणे विचार करावा - किशोर तिवारी 

दिनांक -१५ एप्रिल २०१८ 

लगतच्या आंध्रप्रदेशमध्ये ग्लायफोसेट या तणनाशकाच्या   विक्रीवर सरकारने  बंदी घातल्यानंतर  यवतमाळ येथील कृषी विभागाच्या जिल्हा कार्यालयाने गुणवत्ता नियंत्रण राज्य संचालकांना ग्लायफोसेट वापरण्यास बंदी 
टाकण्याच्या प्रस्तावावर सरकारने गंभीरपणे विचार करावा व या विषयाशी संबंधित सर्व घटकांशी चर्चा करून तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे . 
यवतमाळ कृषि अधिका-याने लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, ग्लायफोसेट या तणनाशकाच्या  उत्पादनाच्या पाकिटावरचे लेबल वाचले तर  केवळ चहाच्या लागवडीसाठी आणि बिनमहत्वाच्या जागेवर या तणनाशकाचा  वापर करण्याची परवानगी भारत सरकारच्या केंद्रीय कीटकनाशक मंडळाने दिली असल्याने  तसेच  यवतमाळ जिल्ह्यात चहाची लागवड नसल्याने ग्लायफोसेटचा वापर करण्याची गरज नाही असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे सोबतच आंध्रप्रदेशमध्ये विक्रीवर बंदी असल्यामुळे जिल्हा कृषी कार्यालयाने चिंता व्यक्त केली आहे की तेलंगानाच्या सीमावर्ती जिल्ह्यांमधून ग्लायफोसेट यवतमाळमार्गे मोठ्या प्रमाणात  जाऊ शकते ही चिंताही रास्त असल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे . 
मागील दोन वर्षात तणनाशक निरोधक एचटी कापसाच्या बियाणांचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढला असुन हे बियाणे अमेरिकेच्या मोन्सँटो कंपनीकडून सरकारची कोणतीही परवानगी नसतांना विकण्यात येत असुन आणी सामान्यत:  कापूस उत्पादकांद्वारे वापरले जाणारे एक तणनाशक  औषधी याच  मोन्सँटो कंपनीचे  ग्लायफोसेट- असल्यामुळे तसेच गवत कापण्याचा मजुरीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यानंमध्ये  तणनाशक मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले आहे अशा परिस्थितीमध्ये कापुस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासणे गरजेचे असल्याचे मत किशोर तिवारी यांनी व्यक्त केले आहे . 
 ग्लायफोसेट या तणनाशकाच्या नियनत्रित वापरामुळे आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याची चिंता पर्यावरनवीद जगात व्यक्त करीत आहेत त्यांचवेळी यवतमाळ जिल्हात गुजरात, तेलंगाना आणि आंध्र प्रदेश मधून एचटी बियानाही तस्करी सुरु झाली आहे यासाठीच  आंध्र प्रदेशमध्ये खरीप हंगामात  ग्लायफोसेट या तणनाशकाच्या  विक्रीवर  बंदी टाकण्यात आली आहे मात्र याचा अधिकार मध्यवर्ती कीटकनाशके बोर्ड (सीआयबी) अंतर्गत असुन ग्लायफोसेट या तणनाशकाच्या वापरावर बंदी घालणे राज्याला  सोपे नाही असे मतही तिवारी व्यक्त केले आहे . 
गेल्या वर्षांच्या कीटकनाशक विषबाधेमुळे ४३ शेतकरी व शेतमजुरांच्या मृत्यूमध्ये  ग्लायफोसेट या तणनाशकाच्या मिश्र वापराला  अप्रत्यक्षपणे दोषी ठरविले गेले होते .एच.टी. कापूस बियाण्यांचा वापर वाढला असल्यामुळे बोंडअळीच्या हल्ल्या पुन्हा होणार अशी भीती पसरली आहे अशातच यवतमाळ येथील कृषी विभागाच्या जिल्हा कार्यालयाने गुणवत्ता नियंत्रण राज्य संचालकांना ग्लायफोसेट वापरण्यास बंदी टाकण्याच्या प्रस्ताव सादर केल्याने शेतकरी बुचकाळ्यात पडला असल्याची खंतही तिवारी यांनी व्यक्त केली आहे . 
एचटी कापसाच्या बियाणे राजरोसपणे  महाराष्ट्रात गुजरात, तेलंगाना आणि आंध्र प्रदेशमध्ये तस्करी होते एचटी बियाण्यांच्या तस्करीची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एक विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापनाही केली आहे. आंतरराज्यीय चौकशीसाठी सीबीआयकडे विनंती पाठविण्यात आली आहे मात्र सालाबादप्रमाणे  अमेरिकेच्या मोन्सँटो कंपनीकडून सरकारची कोणतीही परवानगी नसतांना उपलब्ध झालेले एचटी कापसाच्या बियाणे विकल्या जात असल्याच्या तक्रारी मोठयाप्रमाणात येत असल्याने सरकारने या गंभीर विषयावर कडक कारवाईची मागणी सुद्धा किशोर तिवारी केली आहे . 
========================================================================

.


No comments: