Monday, May 21, 2018

कापसाच्या तंत्रज्ञानाच्या वाद :भारत सरकारने कापसाच्या बियाणांच्या तंत्रज्ञानावर चर्चा करावी -किशोर तिवारी

कापसाच्या तंत्रज्ञानाच्या वाद :भारत सरकारने कापसाच्या बियाणांच्या  तंत्रज्ञानावर चर्चा करावी  -किशोर तिवारी 
दिनांक -२१ मे  २०१८ 
शेतकऱ्याच्या सर्वांगीण विकासाच्या नावावर अमेरीकेच्या मोनसँट्रो तंत्रज्ञानावर एकाधिकार असणाऱ्या कंपनीचे वकीलपत्र घेऊन तंत्रज्ञान स्वातंत्र्याच्या नावावर जे शेतकरी नेते बी टी तंत्रज्ञानाच्या विरोध करतील त्यांना  झाेडून काढण्यात येईल या शेतकरी संघटनेच्या अध्यक्ष अनिल घनवट व  अॅड. वामनराव चटप, नेत्यांनी केलेल्या घोषणेचा  कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी तीव्र आक्षेप घेतला  असुन  मागीलवर्षी महाराष्ट्राच्या सुमारे ४० लाख हेक्टर वरील बिटी कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सध्या बी जि ३ म्हणून तणनाशक निरोधक चोर बी टी बियाणे बोंडअळीचे नियंत्रण करण्यास असमर्थ असल्यामुळे  कापसाच्या बियाणांचा त्यासोबतच विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हातील हवालदील शेतकऱ्यांचा अस्तित्वाचा प्रश्नच निर्माण झाला असुन  आज  एकमेव नगदी कापसाच्या पिकाला पर्याय दिसत नसल्यामुळे हा विषय राष्ट्रीय चर्चेनेच  सुटेल नेत्यांना झाेडून सुटणार नाही असा सल्ला सुद्धा तिवारी यांनी दिला आहे . 
  .
भारतामध्ये  बीटी कापूस जो ९५ टक्के क्षेत्रावर लागवडीखाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या स्वातंत्र्याच्या नावावर  अमेरीकेच्या मोनसँट्रो कंपनीचे सारे कापूस उत्पादक शेतकरी आज गुलाम झाले आहेत व  देशातील बियाण्याच्या खासगी कंपन्यांची पाच हजार कोटी रुपयांची उलाढाल निव्वळ कापूस बियाण्याची आहे आणी ही उलाढाल  सर्व प्रकारच्या बियाणांच्या बाजारात ३० टक्के आहे मात्र  कापसाचे क्षेत्र फक्त सात टक्के असले तरी बियाणे निर्मिती, विक्री यामध्ये कापूस बियाण्याचा सिंहाचा वाटा आहे. सध्या  जनुकीय पद्धतीने अभियांत्रित केलेले बीटी कापूस हे देशातील एकमेव पीक आहे. कापूस बियाणे निर्मिती म्हणून एक मोठा आर्थिक उलाढालीचा व्यवसाय बनला आहे. जो व्यवसाय २००२ मध्ये म्हणजे बीटी वाण येण्यापूर्वी केवळ ४५० कोटी रुपयांचा होता. तो आता २०१७ मध्ये पाच  हजार कोटीच्या वर गेलामुळे बियाणे कंपन्या अार्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या की शेतकरी असा सवालही किशोर तिवारी यांनी माजी अामदार अॅड. वामनराव चटप यांना केला आहे . 
राज्यात ४५ कंपन्यांचे सुमारे ५०० जातींच्या बिटी बियाणांचे सुमारे दीड ते पावणेदोन लाख पाकिटे विकली जातात. सुमारे ४० लाख हेक्टरमध्ये कपाशीचे उत्पादन घेतले जात आहे. मोन्सॅन्टो कंपनीचा २००२ मध्ये बोलगार्ड १ व नंतर बोलगार्ड २ हा जीन कपाशीच्या पिकांमध्ये वापरण्यात आला. त्यामुळे अमेरिकन बोंडआळी व लष्करी आळीचा उपद्रव कमी होऊन कपाशीच्या पिकांत वाढ  झाली. उत्पादन वाढले. पण आता हे तंत्रज्ञान जुने झाले असून त्यावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. या अळीची प्रतिकारक्षमता वाढली असून ती बिटी बियाणांना प्रतिसाद देत  नसून नवीन बोलगार्ड ३ हे तंत्रज्ञान बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यास असमर्थ असल्यामुळे   आता  देशी वाणाची निर्मिती करणे हा एकमेव पर्याय उरला आहे यावर खुली चर्चा अपेक्षित आहे मात्र धोरण व कालबद्ध कार्यक्रम नसल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी हताश झाले आहेत त्यामुळे  कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शाश्वत पर्याय देण्याची विनंती तिवारी यांनी केली आहे . 
देशात कापसाच्या देशीवाणाच्या बियाणांचा समुळ उच्चाटन झाल्यामुळे  कपाशीच्या पिकांत  आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली असून नशिबावर पीक सोडून देण्याची वेळ  कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर येण्याची भीती तिवारी यांनी व्यक्त केली आहे 
==============================================================

No comments: