२६ व २७ मे पीककर्ज मेळाव्यामध्ये हजारो शेतकऱ्यांच्या सहभाग-सहकारी बँका व सोसायटीच्या निल शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँका देणार पीककर्ज -किशोर तिवारी
दिनांक २५ मे २०१८
त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पाटण व पाटणबोरीला स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा पाटणबोरी , बँक ऑफ महाराष्ट्र पहापळ व स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा पारवा येथे भेट दिली त्यावेळी पंचायत समिती सदयस सुहासभाऊ पारवेकर ,रुपेश कातमवार ,अर्जुन आत्राम उपस्थित होते यावेळी कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी केली .
त्याच प्रमाणे २७ मे दुपारी राळेगाव तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सावरखेड व इलाहाबाद बँक शाखा झाडगाव त्यानंतर सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मौदा येथे भेट दिली यावेळी नोडल अधिकारी जिल्हा परिषद डेप्युटी सि ओ मोहोड साहेब ,सामाजिक कार्यकर्ते अशोक बाबु केवटे ,विजयभाऊ आदमने ,विजयभाऊ तेलंगे ,वासूभाऊ बोकीलवार ,राळेगाव तालुक्याचे तहसीलदार हेमंत गांगुर्डे ,गटविकास अधिकारी खेडकर ,तालुका कृषी अधिकारी पाठकसाहेब सोबत होते .
यावर्षी सरकारने ऐतिहासिक पीककर्जमाफी दिल्यांनतर यवतमाळ जिल्ह्यातील बँकांना सुमारे हजार कोटी रुपये जमा केल्यानंतरही सरकार बँका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनांचा पालन करीत नसुन या खरीप हंगामात दोन हजार कोटीच्या वर पीककर्ज वाटप करण्याचे लक्ष पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी २६-२७ मेला 'अर्ज द्या व पीककर्ज घ्या ' मोहिमेअंतर्गत यामध्ये सरकारी बँकांनी कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी न लावणे ,सरकारने कर्जमाफीची रक्कम जमा केल्यांनंतरही नव्याने पीककर्ज न देणे ,दुष्काळ घोषीत केल्यांनंतरही थकीत पिक कर्जाचे पुनर्वसन न करणे,पीकविमा व अनुदानाची मदत पीककर्ज खात्यात जबरीने जमा करणे अशा प्रचंड तक्रारीची दखल दूर करण्यासाठी बळीराजा चेतना अभियाना अंतर्गत आयोजित करण्यात आले होते यावेळी ज्या बँका शेतकऱ्यांना वेळेवर पीककर्ज देणार नाहीत त्या बँकांवर कारवाई करण्याच्या सूचनाही सरकारने देण्यात आल्या .
--------------------------------------------------------
-----------------------
----------
No comments:
Post a Comment