Thursday, May 24, 2018

२६-२७ मेला आयोजीत 'अर्ज द्या व पीककर्ज घ्या ' मेळाव्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा -किशोर तिवारी

२६-२७ मेला आयोजीत ' अर्ज द्या व पीककर्ज घ्या ' मेळाव्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा -किशोर तिवारी       
दिनांक -२४ मे २०१८
   
      यावर्षी सरकारने ऐतिहासिक पीककर्जमाफी दिल्यांनतर यवतमाळ जिल्ह्यातील बँकांना सुमारे ११०० कोटी रुपये सरकारने जमा केल्यानंतर आता येत्या   खरीप हंगामात दोन हजार कोटीच्या वर पीककर्ज वाटप करण्याचे लक्ष निर्धारीत करण्यात आले असुन येत्या २६-२७ मेला अर्ज द्या व पीककर्ज घ्या मोहिमेचा भाग म्हणून सर्व बँकामध्ये कर्ज मेळावे आयोजित करण्यात आले असुन या दिवशी सर्व बँकामध्ये फक्त पीककर्ज वाटप करण्यात येणार असल्याने सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन  कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष  किशोर तिवारी यांनी केले आहे .

             या पीककर्ज मेळाव्यासाठी प्रशासनाकडुन नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले असुन सर्व   बँकांनी कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी लावणे ,सरकारने कर्जमाफीची रक्कम जमा  केल्यांनंतर नव्याने पीककर्ज  देणे ,दुष्काळ घोषीत केल्यांनंतर थकीत पिक कर्जाचे पुनर्वसन  करणे,पीकविमा व अनुदानाची मदत पीककर्ज खात्यात जमा केली असल्यास या सर्व तक्रारींचे तात्काळ निवारण यावेळी करण्यात येणार असल्याची माहीती   किशोर तिवारी यांनी यावेळी दिली .
      यावर्षी सरकारने शेतकऱ्यांवरील थकीत झालेले २००१ पासुन जून  २०१७ पर्यंतचे सर्व पिक कर्ज व सर्व मध्यम मुदतीचे शेतीसाठी घेतलेले दीड लाखपर्यंतचे थकीत कर्जाची रक्कम बँकांना दिले असुन आता आजच्या  हेक्टरी पत मर्यादेप्रमाणे पिक कर्ज वाटप करणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे  " मागेल त्याला पीककर्ज " योजना सुरु करण्याची व बँकांनी सरकारच्या कर्ज माफीमध्ये न आलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरकारला दिलेल्या सवलती प्रमाणे फायदा देऊन नवीन पत पुरवडा करावा व  मागील २००८च्या कृषी कर्ज माफीमध्ये बँकांनी आपले खिसे भरले मात्र शेतकऱ्यांना नवीन  पत पुरवडा सुरु केला नाही हा प्रकार यावेळी होणार नाही यासाठी सर्व प्रशासनाने शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी नवीन पिक कर्ज वाटप होणार याची जबाबदारी घ्यावी असे आवाहन तिवारी यांनी यावेळी केले . 
              ज्या शेतकऱ्यांना सहकारी सोसायट्या वा सहकारी बँक कर्जमाफी नंतर ना हरकत प्रमाणपत्र देत आहे त्यांना सरकारी बँकांनी तात्काळ पीककर्ज नव्याने द्यावे तसेच वन टाइम सेटलमेंट करनाऱ्या शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज तात्काळ देण्यात यावे . पीक कर्जमाफी मिळाल्याने निल झालेल्या शेतकऱ्यांना मध्यवर्ती  सहकारी बँक फक्त १० ते १५ हजार देणार या प्रस्तावाला शेतकरी मिशन नाराजी प्रगट करीत यासर्व नियमाप्रमाणे पिकानुसार कर्ज मिळावे ही प्रशासनाची जबाबदारी असुन या प्रश्न्नावर सहकार खात्याने तात्काळ तोडगा काढण्याची सूचना किशोर तिवारी यांनी दिली . जे बँक अधिकारी शेतकऱ्यांना वेळेवर पीककर्ज देणार नाहीत त्या सर्व  सर्व बँकांवर कारवाई करण्याच्या आदेश सरकारने दिले असल्याची माहिती किशोर तिवारी यावेळी दिली   . 
                महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ मधील ऐतिहासिक कृषी कर्जमाफीची   वन टाइम सेटलमेंट करण्याची ३० मार्चची मुदतही आता ३० जून २०१८ पर्यंत वाढविण्याच्या निर्णयाचा सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा घेत  नव्याने पिक कर्ज घेण्याची संधी मिळणार असल्याने  वन टाइम सेटलमेंट वा सातबारा कोरा झालेल्या  महाराष्ट्राच्या विदर्भ व मराठवाड्याच्या आत्महत्याग्रस्त कोरडवाहु शेतकऱ्यांच्या मधुन सुमारे ९० टक्के शेतकरी नव्या पिक कर्ज घेण्यास पात्र होणार आहेत व नवीन पिककर्ज घेणे हा या शेतकऱ्यांचा अधिकार असुन बँका टाळाटाळ करीत असल्याचा तक्रारी आल्या  आहेत तरी सर्व   बँकांना नव्याने पीक कर्ज देणे गरजेचे असल्याचे   तिवारी यांनी यावेळी सांगीतले . 

=====================================================================

No comments: