Sunday, January 13, 2019

पंचायत समिती घाटंजीच्या भ्र्ष्टाचाराची सी . आय. डी . मार्फत चौकशी होणार -किशोर तिवारी यांची टिटवी येथील "सरकार आपल्या दारी " कार्यक्रमात घोषणा

पंचायत समिती घाटंजीच्या भ्र्ष्टाचाराची सी . आय. डी . मार्फत चौकशी होणार -किशोर तिवारी यांची टिटवी येथील "सरकार आपल्या  दारी " कार्यक्रमात घोषणा 
दिनांक १२ जानेवारी २०१९
यवतमाळ जिल्हातील घाटंजी तालुक्यातील पंचायत समितीमार्फत १४ वित्त आयोग व पेसा निधीची कामे ग्रामसभांना अंधारात ठेऊन व शासनाच्या धोरण व नियमांना धाब्यावर ठेऊन केवळ कागदावर लाखो रुपयाची कामे गट विकास अधिकारी व लोकप्रतिनिधींनी केल्याच्या तक्रारीची गंभीर दखल टिटवी येथे आयोजीत सरकार आपल्या दारी कार्यक्रमात घेत कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना सादर करून सी . आय. डी . मार्फत तात्काळ चौकशी  करण्याचे आवडेश देण्याची घोषणा केली . 
११ जानेवारीला घाटंजी तालुक्यातील टिटवी येथे आयोजित सरकार आपल्या दारी कार्यक्रमात मेजदा हिवरधरा येरंडगाव तरोडा इंजाळा पार्डी जांब पंगडी उदरणी कोळी बु शरद नागेझरी या गावातील ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांनी गट विकास अधिकारी घाटंजी यांनी १४ वित्त आयोगाचा निधी ग्राम विकास आराखडा निर्माण न करता तसेच शिक्षण आरोग्य २५ टक्के बालविकास १० टक्के तसेच मागासवर्गीय ग्रामीण भागात १५ टक्के प्रशासकीय १० टक्के इतर फक्त १० टक्के खर्च करणे त्याच प्रमाणे पेसा गावातील पेसा निधी आदिवासींसाठी तसेच कला संस्कृती लोकजागरण  वन उपज तथा कौशल विकासावर करणे आवश्यक असतांना सारे नियम धाब्यावर ठेऊन ग्रामसेवकांच्या मर्जीने पदाधिकाऱ्यांनी केल्याची गंभीर तक्रार केली त्यावेळी गट विकास अधिकारी तसेच ग्राम विकास विभागाचे अधिकारी उपस्थित नव्हते त्यामुळे तिवारी यांनी या प्रकरणाची माहीती सरळ मुख्यमंत्र्यांना दिली व त्यांनी पोलीसात तक्रार दाखल करा व सी . आय. डी . मार्फत चौकशीअशा सूचना दिल्यावर पंचायत समिती घाटंजीच्या भ्र्ष्टाचाराची सी . आय. डी . मार्फत चौकशी होणार अशी घोषणा केली . 
पोलीस १४ वित्त आयोगाच्या तसेच पेसामधील रोजगार हमीच्या कामाची गावनिहाय चौकशी करतील तसेच या कामांचे लिलाव निविदा कामाचे मुल्याकंन व निधीचा वापर देय घेणाऱ्यांची सर्व हिशोब घेतील तसेच भ्र्ष्टाचार करणाऱ्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आश्वासन किशोर तिवारी यांनी दिल्यावर ग्रामवासीयांचा रोष कमी झाला . 
टिटवी येथील सरकार आपल्या दारी कार्यक्रमात पंचायत समिती सभापती काळंदीबाई आत्राम  शेतकरी नेते सुनिलभाऊ राऊत  ,भाजपानेते विठ्ठलराव लालसरे , शेतकरी नेते सुरेशभाऊ बोलेनवार  प्रेमभाऊ चव्हाण  जिल्हापरिषद सदस्य सविता मोहनभाऊ जाधव  ,  कोलाम नेते माधवराव टेकाम अंकित नैताम    उपस्थित होते . 
============================================================

No comments: