Wednesday, January 23, 2019

नितीन गडकरींना भाजपची पंतप्रधानपदाची धुरा देण्याचा शिवसेनेच्या युतीच्या संकेताला भाजपने गंभीरपणे घ्यावे -किशोर तिवारी

नितीन गडकरींना  भाजपची पंतप्रधानपदाची  धुरा  देण्याचा  शिवसेनेच्या  युतीच्या संकेताला भाजपने गंभीरपणे घ्यावे -किशोर तिवारी 

दिनांक -२४ जानेवारी २०१९

आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज व्यक्त करीत त्रिशंकू परिस्थितीत भाजपचे नेते नितीन गडकरी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार  असल्यास  शिवसेना गडकरींना पाठिंबा देईल, असे पक्षाचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत संकेत दिले आहेत त्यातच काँग्रेसने प्रियंका गांधी यांना सक्रिय राजकारणात आणल्यानंतर तसेच १४ पक्षाच्या महाआघाडीच्या कलकत्त्याच्या बैठकीनंतर बदललेल्या राजकीय समीकरणात मराठी राज्याची  एकमुस्त ४८ खासदार फारच महत्वाचे असुन नितीन गडकरींना  भाजपची पंतप्रधानपदाची  धुरा  देण्याचा  शिवसेनेच्या  युतीच्या संकेताला भाजपने गंभीरपणे घ्यावे अशी विनंती पुन्हा एकदा विदर्भाचे शेतकरी व आदीवासी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी भाजप  प्रमुखांना विनंती केली  आहे . शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे आपली मते शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या सल्ल्यानेच देतात म्हणून त्यांचा हा पर्याय निवडणुकीपूर्वी नितीन गडकरी यांच्याकडे प्रचाराची धुरा दिल्यास महाराष्ट्र सह सर्वच भारतात कमीतकमी २००च्या वर जागांवर याच्या भाजपला विजयश्री आणण्यास तसेच प्रचाराचा सारा फोकस शहरी - ग्रामीण विकासाचा समतोल वर केंद्रित होईल व सध्या सुरू असलेला धर्मांध व जातीय प्रचार सुद्धा कमी होईल असा विश्वास किशोर तिवारी यांनी व्यक्त केले आहे . 
यापुर्वी सुद्धा विदर्भाचे शेतकरी व आदीवासी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी संघ परीवार प्रमुखांना विनंती केली की, लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये पक्षाचे नेतृत्व, सर्वसमावेशक व देशाला सर्व क्षेत्रात विकासाकडे नेण्याकरितां तसेच  समाजाच्या सर्व वर्गाच्या क्षेत्राच्या जनतेमध्ये विश्वावासाचे व भयमुक्त वातावरण निर्मितीसाठी पक्षातील संघ परिवारातील मवाळ नेते नितीन गडकरी यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व देण्यात यावे. 
पाच राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीची धुरा जर नितीन गडकरी यांच्या हातात देण्यात आली असती तर मध्यप्रदेश व राजस्थानमध्ये भाजपाची सत्ता हमखास आली असती तसेच छत्तीसगड व तेलंगणा भाजपाची अशी दैनावस्था झाली नसती . देशाला विकासाची व युवकांना रोजगाराची आवश्यकता असतांना अतीरेकी भूमिका घेणारे,  हुकूमशाहीने पक्षाला व सरकारला चालविणारे नेते समाजाला व देशाला घातक सिद्ध होतात, हा इतिहास भारताला नवीन नाही तर त्याच्या पुनरावृत्तीची आज गरज नसल्यामुळे भाजपने आपले नेतृत्व नितीन गडकरी यांना देऊन डिसेंबर २०१२ मध्ये केलेली चूक दुरुस्त करण्याची विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे.
किशोर तिवारी यांनी  नितीन गडकरी यांच्या रूपाने एका सर्वलोकांना लोकशाही पद्धतीने घेऊन आपल्या मवाळ नेतृत्वाने देशाला कृषी सह सर्वच क्षेत्रात अभूतपूर्व कामगीरी करणारया या विश्वासाने भाजपाशी मैत्री केली. मात्र डिसेंबर २०१२ मध्ये अरविंद केजरीवाल यांच्या खांद्यावर खोट्या आरोपाची बंदुक देऊन गडकरी यांना अडचणीत आणण्यात व दुसऱ्यांदा राष्ट्रीय अध्यक्षपद व त्यामुळे देशाचे २०१४ मधील निर्विवाद मिळणारे पतंप्रधानपद हिरावुन घेण्यात आले होते. मात्र त्यावेळी नितीन गडकरी यांना भाजप नेतृत्वापासून दूर ठेवणारे सर्व  भीष्मपितामहसुद्धा सक्तीच्या रजेवर जातील,  याची त्याना कल्पना नव्हती.  आज सर्वच देशभरात २०१४ मध्ये भाजपाच्या मागे उभे राहणारे सारे सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते सरकार व संघपरिवारात चापलूस लोकांच्या गर्दीमुळे मेटाकुटीस आले आहेत. यामुळे भाजपामध्ये संवाद व लोकशाहीच्या स्थापनेकरीता नितीन गडकरींच्या हातात भाजपाचे राष्ट्रीय नेतृत्व देणे काळाची गरज आहे. नाहीतर पुन्हा एकदा  काँग्रेसची सत्ता देशात आल्याशिवाय राहणार नाही असा इशारा किशोर तिवारी यावेळी दिला आहे . 
=============================

No comments: