Saturday, January 5, 2019

अंदमान-निकोबारच्या हॅवलॉक द्वीपचे स्वातंत्र्यवीर सावरकर स्वराज द्वीप असे नाव द्या- किशोर तिवारी

अंदमान-निकोबारच्या हॅवलॉक द्वीपचे  स्वातंत्र्यवीर सावरकर स्वराज द्वीप असे नाव द्या- किशोर तिवारी 

दिनांक -६ जानेवारी २०१९
पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच अंदमान-निकोबार या द्वीपसमूहांच्या दौऱ्यावर गेले होते  त्यावेळी त्यांनी हॅवलॉक द्वीप, नील द्वीप आणि रॉस द्वीपचं नाव बदलण्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हॅवलॉक द्वीपचं नामकरणं स्वराज द्वीप असं केलं आहे तर नील द्वीपला  शहीद द्वीप  तर रॉस द्वीपचं नाव नेताजी सुभाषचंद्र द्वीप असं केलं आहे त्यावेळी त्यांनी अंदमान-निकोबारमधली  सेल्युलर जेलही पाहिली  जेव्हा देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी शहीद झालेल्या स्वातंत्र्यसेनानींची आठवण येते, तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव गौरव आणि सन्मानानं घेतलं जात भारताच्या स्वात्रंत्र्य लढ्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव  अमर आहे त्यांचा भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी कवी व लेखक ,भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदुसंघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाला तीव्र विरोध करणारे समाज क्रांतिकारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक म्हणुन केलेले कार्य अभुतपुर्व असल्याने व  स्वात्रंत्र्यपूर्वी  ब्रिटिश सरकार स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सरकारने २००४ पर्यंत त्यांच्या त्यागाचा सतत केलेला उपमान व त्यांची उपेक्षा २००४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी अंदमान एकुलते एक विमानतळाला  स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देऊन थोडंफार कमी करण्याचा प्रयन्त केला होता  मात्र त्यांना त्यांच्या त्यागाचे व मराठी माणसाचा खरा सन्मान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांचे प्रेरणास्थान असणाऱ्या स्वातंत्रवीर विनायक दामोधर सावरकर यांचे नाव हॅवलॉक द्वीपला द्यावे व हॅवलॉक द्वीपचं नामकरणं स्वातंत्रवीर  सावरकर स्वराज द्वीप  करावे अशी मागणी कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी भारत सरकारला केली आहे . 
आपल्या निवेदनात किशोर तिवारी यांनी भारत सरकारला व महाराष्ट्र सरकारला मुंबईतल्या नियोजित छत्रपती शिवाजी महाराज वा लोहपुरुष सरदार पटेल यांच्या अप्रितम पुतळ्यासारखा स्वातंत्रवीर  सावरकर स्वराज द्वीपानिर्माण करावे अशी मागणी सुद्धा केली आहे तसेच स्वातंत्रवीर  सावरकर मित्र मंडळाने आपली मागणी सरकारात व समाजात पुढे रेटावी अशी मागणी किशोर तिवारी यांनी रेटली आहे . 
ब्रिटिश सरकारने इ.स. १९१० च्या सुरवातीला .स्वातंत्रवीर  सावरकर यांच्या स्वातंत्र लढयाची  लंडनमध्ये दखल घेत सावरकरांना तात्काळ अटक केली होती  समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रांन्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली होती मात्र ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना दोन जन्मठेपांची-काळ्या पाण्याची-शिक्षा (सुमारे ५० वर्षे अंदमानच्या तुरुंगात) ठोठावण्यात आली होती . स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तेजोभंग करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना अंदमानच्या काळकोठडीत ठेवले. हरप्रकारे छळले. खड्या बेडीत टांगले. तेलाच्या घाण्याला जुंपले. नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रत काम दिले. या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य! तब्बल ११ वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते. बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली होती मात्र पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी कात रचुन त्यांचा उपमान केला हे सत्य आहे व त्याचे प्रायचित नरेंद्र मोदींनी करावे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन किशोर तिवारी यांनी केले आहे . 
अंदमानाहून सुटकेच्या आधीचे जीवन व सुटकेनंतरचे जीवन, असे सावरकरांच्या जीवनाचे दोन महत्त्वाचे भाग पडतात. पहिल्या भागात आक्रमक, क्रांतिकारी सावरकर, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान सावरकर, धगधगते लेखन करणारे सावरकर - असे त्यांचे रूप दिसते. तर त्यांच्या जीवनाच्या दुसऱ्या भागात समाजक्रांतिकारक सावरकर, हिंदू संघटक सावरकर, भाषाशुद्धी चळवळ चालवणारे व श्रेष्ठ साहित्यिक सावरकर, समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते सावरकर, विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्‍न करणारे तत्त्वज्ञ व विचारवंत सावरकर यांचा परिचय आधुनिक भारताला गरजेचे असल्याने मराठी माणसाचा ठेका घेतलेल्या पोटभरू नेत्यांनी आपल्या मागणीला पाठींबा द्यावा असे आव्हानही किशोर तिवारी यांनी केली आहे . 
=========================================================================================================================

No comments: