Tuesday, July 1, 2014

कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या दुबार पेरणीच्या संकटाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार अंधारात :कृषीआयूक्त उमाकांत दांगट यांचेशी बियाणे व पीक कर्ज मागणीबाबत किशोर तिवारी यांची चर्चा


कापूस  उत्पादक शेतकर्‍यांच्या  दुबार पेरणीच्या संकटाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार अंधारात :कृषीआयूक्त उमाकांत दांगट  यांचेशी  बियाणे व पीक कर्ज मागणीबाबत किशोर तिवारी यांची चर्चा 
विदर्भ -१  जुलै २०१४ :
मान्सूनचे आगमन झाल्यानंतरही सपूर्ण जून महिना कोरडा गेल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रात फक्त ३ टक्केच पेरणी झाली असल्याचे निवेदन नाशिक येथे विदर्भातील व मराठवाड्यातील २० लाख हेक्टर मध्ये जुन महीन्यात तीन  टप्प्यात पेरणी केलेले शेतकरी महाराष्ट्रात येतात कि नाही असा सवाल विदर्भ जनांदोलन समीतीचे शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी उप मुख्यमंत्र्यांना केला  आहे . महाराष्ट्रात जुन महिन्यात ७,११,१७ व २४ तारखेला पावसाने हजेरी लावल्यावर शेतकऱ्यांनी कापसाची पेरणी केली आहे व  कोरडवाहु शेतकऱ्यांची संपुर्ण पेरणी मोडली आहे व त्यांना दुबार पेरणी आता करावी लागेल मात्र सरकारने कृषीविभागाच्या अहवालावर पेरणी झालीच नाही अशी भुमिका घेत असल्यामुळे शेतकरी हवालदिल होऊन आत्महत्या करीत आहेत तरी महाराष्ट्राच्या २० लाखाहेक्टरवरील कोरडवाहू क्षेत्रातील दुबार पेरणीचे संकट आले  असून सरकारने शेतकऱ्यांना आता बियाणे वाटप करावे व नव्याने कर्ज द्यावे अशी मागणी विदर्भ जनांदोलन समीतीचे शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी सरकारला  केली आहे
महाराष्ट्राचे कृषीआयुक्त उमाकांत दांगट यांचेशी आज चर्चा करून विदर्भातील वर्धा ,यवतमाळ ,वाशीम तर मराठवाड्यातील नांदेड ,परभणी सह खानदेश व उत्तर महाराष्ट्रातील संपूर्ण धूल पेरणी व  जुन महिन्यातील १७ व २४ तारखेला झालेली कापसाची पेरणी मोडली असुन आता जर कापसाचे आगमन ७ जुलै नंतर होणार असेल तर कोरडवाहु शेतकर्यांना पर्यायी कमी पाण्याचे पिक घेण्यासाठी तुर ,बाजरी ,कठाणी ज्वारीचे बियाणे वाटप सुरु करावे व खत -मजुरी इतर खर्चासाठी  विषेय अनुदान मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे 

संपूर्ण विदर्भ व मराठवाडा दुष्कालाचाच सामना करीत असुन मान्सूनच्या पावसाची ही भीषण तूट चिंताजनक असुन शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बियाणे ,बँकेकडून पिक कर्ज , चारा ,पाणी व अन्नसुरक्षा अत्यंत गरजेचे असुन मात्र सरकार व प्रशासन पेरणी झालीच नाही अशी भुमिका घेत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत आहे तर बिमा कंपन्या सरसकट मदत तात्काळ मिळणार असे आमिष देऊन लोखो रुपये या उपासमारीला तोंड देत असलेल्या शेतकऱ्यांकडून जबरीने वसुल करीत आहे यावर तात्काळ उपाय योजना करा अशी विनंती महाराष्ट्राचे कृषीआयुक्त उमाकांत दांगट यांना  किशोर तिवारी यांनी केली आहे 

सुरवातीला महाराष्ट्रात सरासरी ३७ मिमी पाऊस बरसताच शेतकर्‍यांनी पेरणीच्या कामाला प्रारंभ केला गत आठ दिवसात ३०लाख हेक्टरवर पेरणी करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक २० लाख हेक्टरक्षेत्र कपाशीच्या लागवडीचे आहे तर ८ लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली. २ लाख हेक्टरवर इतर लागवड करण्यात आली यामध्ये तुरी ज्वारी आणि मूग, उडीदाच्या क्षेत्राचा समावेश आहे मात्र आता पेरणीनंतर पाऊस नसल्याने पेरणी करणारे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. महाराष्ट्राच्या २० लाखाहेक्टरवरील कोरडवाहू क्षेत्रातील दुबार पेरणीचे संकट अटळ असून सरकारने शेतकऱ्यांना आता बियाणे वाटप करावे व नव्याने कर्ज द्यावे अशी मागणी विदर्भ जनांदोलन समीतीचे शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे .संपुर्ण महाराष्ट्रात पाण्याचे संकट आणीबाणीचे स्वरूप घेऊन समोर येत मात्र आघाडी सरकार व मुख्यमंत्री खुर्चीचे व निवडणुकीचे राजकारण करण्यात व्यस्त आहेत तर शेतकरी चिंतेने व दुबार पेरणीच्या धक्क्याने आत्महत्या करीत हा प्रकार तर फारच किळसवाना या नेत्या आपली नाही तर सरकार व प्रशासनाची पत जिवंत ठेवण्यासाठी सवेन्दनशीलता दाखऊन शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा ,अशी आग्रही विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे. 
मृग नक्षत्रात हमखास पाऊस बरसतो, या आशेवर शेतकर्‍यांनी धूळ पेरणी केली. रोहिणी नक्षत्राच्या सुरुवातीला पेरणी करण्यात आली. महागडे कपाशीचे बियाणे टोपण्यात आले. ज्यांच्याकडे ओलिताची सोय होती त्यांनी स्प्रिंकलरद्वारे ओलित करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारनियमनाने ओलितही पुरेपूर करता आले नाही अशा स्थितीत महागडे बियाणे उद्ध्वस्त झाले आहे. पुन्हा दुबार पेरणी करावी लागणार आहे,मायबाप सरकारने निवडणुकीच्या तोंडावर तरी कोरडवाहू क्षेत्रातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांना मदत करावी अशी कळकळीची विनंती किशोर तिवारी मुख्यमंत्र्यांना केली आहे
पावसाळ्याची नक्षत्रे सुरू होऊन महिना लोटला. मात्र रोहिणी व मृग नक्षत्र कोरडेच गेले. त्यामुळे शेतजमीन अजूनही कोरडीच आहे. काही शेतकर्‍यांनी कोरड्यातच सरकीची टोबणी केली, परीणामी ९२ टक्के शेतकरी कोरडवाहू शेती ज्यामध्ये कापूस व सोयाबीन ही प्रमुख पिके घेतली जातात त्या शेतकर्‍यांवर संकट ओढवले.
१७ तारखेला महाराष्ट्रात पाऊस पडला व आता पाऊस जोर धारणार म्हणून काही शेतकर्‍यांनी या अपुर्‍या पावसाच्या ओलातच बियाणे टाकले आणी तेव्हापासून पावसानेच दडी मारली आज जुन संपला तरी पाऊस आलेला नाही . सध्या दररोजच आभाळत ढग येतात. परंतु पाऊस मात्र कोसळत नाही. ज्यांनी पेरण्या केल्या, त्यांच्यावर आता दुबार पेरणीचे संकट आले आहे. पावसाच्या या लहरीपणामुळे यावर्षीचा खरीफ हंगाम बुडणार हे निश्‍चित झाले आहे. एकीकडे बियाण्यांचा तुटवडा आहे. त्यामुळे बोगस बियाण्यांचा बाजारात प्रवेश झाला आहे. अस्सल बियाण्यांचे भाव चढत आहे. या चक्रव्यूहात बळीराजा भरडला जात आहे मात्र लोकनेते व सरकार झोपले आहे ,असा आरोप किशोर तिवारी लावला आहे

No comments: