दुबार पेरणीचे संकट : मागील दोन दिवसात यवतमाळ जिल्यात 'बियाणे व पीककर्ज' वंचित आणखी तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या:हजारो एकर जमीन पाडीत राहणार
यवतमाळ :२१ जुलै २०१४
यवतमाळ :२१ जुलै २०१४
विदर्भात दुष्काळाचे सावट अधिक तीव्र होत असतानाच मागील काही दिवसांनी वरुणराजाने कृपा केली आहे . मात्र, जवळपास महिनाभर पावसाने दगा दिल्याने दुष्काळाचा सामना करणाऱ्या विदर्भातील शेतकऱ्यांवर पहिली तर अनेक ठिकाणी दुबार -तिबार पेरणी वाया गेल्यानंतर पुन्हा पेरणी करण्याची वेळ आली मात्र या शेतकऱ्यांना पेरणीसाठी बियाणे व लागवडीसाठी पतपुरवठा नसल्यामुळे मागील दोन दिवसात एकट्या यवतमाळ जील्यातच तीन हवालदील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे घटना समोर आल्या आहेत यामध्ये ब्राह्मणवाडा (पूर्व) चे वासुदेव आत्माराम नेवारे (५५) ,जवळा (इजारा )चे सागर मुरके (२०) तर कळसपुरचे गणपतराव द्गमल यांचा समावेश आहे ह्या आत्महत्या महाराष्ट्रातील नाकर्त्यां सरकारच्या उदासीन धोरणामुळे होत असुन यवतमाळच्या कृषीखात्याने सुमारे ३ लाख हेक्टरमध्ये दुबारपेरणी दिल्यावरही बियाणे -मदत तातडीने न मिळाल्यामुळे व बँकांनी पिककर्ज देणे तर सोडा सक्तीची वसुली सुरु केल्यामुळे होत असल्याचा आरोप विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केला आहे .
नेर तालुक्यातील ब्राह्मणवाडा (पूर्व) येथे रविवारी दुबार पेरणीच्या संकटाने वासुदेव आत्माराम नेवारे (५५) याने गळफास लावून आत्महत्या केली, पावसाने दडी मारल्यामुळे १५ दिवसांपूर्वी पेरलेले बियाणे उगवले नाही. दुबार पेरणीसाठी त्याने मांगलादेवी येथील एका बँकेकडे कर्जासाठी अर्ज केला. मात्र तांत्रिक कारणाने बँकेने असर्मथता दर्शविली. आता पेरणी कशी करायची या चिंतेने त्याने गावालगतच्या टेकडीजवळच्या मंदिर बांधकामाच्या गजाला दोर बांधून गळफास लावला. त्याच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी आहे तर शनिवारी कळसपुरचे गणपतराव द्गमल यांनी बँकेचे कर्ज व दुष्काळाच्या धास्तीने व जवळा (इजारा )चे सागर मुरके (२०) आता दुबार पेरणी कशी करावी या चिंतेने आत्महत्या केल्याच्या संतापजनक घटना घडल्या आहेत ,मुख्यमंत्री आपली खुर्ची वाचविण्यात पूर्णवेळ दिल्लीवारी करण्यात व्यस्त आहेत तर विरोधक राजतिलकाच्या तयारीत लागले आहेत यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत अशीच परिस्थिती राहिलीतर विदर्भात हजारो हेक्टर जमीन शेतकऱ्यांना पडीत ठेवावी लागेल तरी सर्व दुबार पेरणी पिडीत कर्जबाजारी शेतकऱ्यांना तात्काळ बियाणे ,आर्थिक मदत व नव्याने पिक कर्ज देण्याची गरज आहे अशी मागणी तिवारी यांनी पुन्हा एकदा केली आहे .
अशीच अवस्था शेजारच्या तेलंगणा आणि आंध्रप्रदेशमध्ये झाल्यावर या दोन्ही राज्यांनी तीन हेक्टपर्यंत १२ हजार प्रती हेक्टर प्रमाणे मदत २४ जूनला दिली. शिवाय १ लाखापर्यंतचे कोरडवाहू शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ केले आहे. महाराष्ट्रातील नाकर्त्यां सरकारने संपूर्ण अहवाल आल्यावर मदतीचा निर्णय घेऊ अशी भूमिका घेतल्याने यावर्षी पीक कर्जापासून वंचित शेतकऱ्यांना पेरणी करणे शक्य हतो नसून सध्या गावात सावकार तर सोडा पण किराणा दुकानदारही शेतकऱ्यांना उधार देत नाही व या आत्महत्या यामुळेच होत असल्याचा आरोप सुद्धा तिवारी यांनी केला आहे . या सर्व हवालदिल झालेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांना सरकारी मदत, बियाणे व नवीन कर्ज मिळाले नाही तर शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे लोण विदर्भात पसरण्याची भीती समितीचे प्रमुख किशोर तिवारी यांनी व्यक्त केली.
विदर्भात सरकारी आकडय़ानुसार आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ५६ झाली आहे. सरकार शेतकऱ्यांच्या दारावर जाऊन तात्काळ मदत करण्याचे औचित्य दाखवतच नाही. गेल्या तीन वषार्ंपासून दुष्काळाचे सावट असल्यामुळे ९० टक्के शेतकऱ्यांना बँकांची दारे बंद झाली आहेत. शेतकऱ्यांना कोणीच पैसे देत नाही. जिल्हा सहकारी बँका सक्तीची वसुली करीत आहेत. बँका पुनर्वसन तर सोडा पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारत आहे. कापूस व धान उत्पादक शेतक ऱ्यांवर गेल्यावर्षी भाव पडल्यामुळे गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले. त्याबाबतची आकडेवारी शासनाला सादर केली आहे. विदर्भातील ७० ते ८० टक्के शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीनच्या बोगस बियाण्यामुळे दुबार पेरणी करावी लागली. गेल्या महिन्याभरापासून पाऊस नसल्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांसमोर मोठी चिंता आहे. यामुळे कृषी संकट अधिकच गंभीर झाले आहे. २००६ प्रमाणे प्रत्येक ८ तासाला एक याप्रमाणे शेतक ऱ्यांच्या आत्महत्येच्या वार्ता समोर येत आहेत, याकडे समितीने सरकारचे लक्ष वेधले आहे.
हवालादिल झालेल्या शेतक ऱ्यांना सरकारकडून कुठलीच मदत मिळत नाही. शेतकऱ्यांची फारच बिकट परिस्थती निर्माण झाली असून १० हजार हेक्टरवरील शेती पीक घेण्याच्या योग्य राहिली नाही. सहकारी बँकेचा पतपुरवठा नाबार्डने बंद केला असून सरकारी बँकानी नियम सक्तीचे करून पीक कर्ज वाटप रोखले आहे.
गेल्या वर्षी शेतक ऱ्यांच्या तुरी, सोयाबीन व कापसाला जगामध्ये चांगला भाव असताना विदर्भात मात्र भाव मिळाला नाही. विदर्भातील कृषी संकटाची गंभीरता लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी विदर्भात आणि मराठवाडय़ाचा दौरा करून शेतकऱ्यांची खरी परिस्थिती जाणून घ्यावी, असेही जनआंदोलन समितीने म्हटले आहे.
No comments:
Post a Comment