संपूर्ण विदर्भ व मराठवाड्यात दुष्काळाचे भीषण संकट - सरकारी मदत ,बियाणे ,कर्जमाफी व खावटीसाठी १२ जुलै रोजी उपोषण सत्याग्रह
८ जुलै २०१४
७ व जुलै मान्सूनचे पुन्हा आगमन होणार मायबाप सरकार पर्यायी बियाणे देणार व लगतच्या तेलंगणा राज्य प्रमाणे तात्काळ मदत जाहीर करणार ,थकित कर्ज माफ करणार ,खावटी वाटप मागील दोन वर्षापासून सतत दुष्काळ पडत असल्यामुळे नव्याने देणार या साऱ्या आशा आता निराशेत बदलत असून ज्या महाराष्ट्रात कोरडवाहु क्षेत्रातील जून महिन्यात ७, ११, १७ व २४ तारखेला पावसाने हजेरी लावल्यावर शेतकर्यांनी केलेली कापसाची, सोयाबीनची सुमारे २० लाख हेक्टारातील पेरणी आता पूर्णपणे मोडल्या व दुबार पेरणीची वेळ जात असुन आता विदर्भ व मराठवाड्यात दुष्कालाचे भीषण संकट उभे राहिले मात्र राज्य सरकार वा केंद्र सरकारने साधी देखील न दिल्यामुळे येत्या १२ जुलै रोजी दुष्कालाचा प्रचंड फटका बसलेल्या यवतमाळ जिल्यात शेतकरी नेते किशोर तिवारी यांच्या नेतृवात शेकडो शेतकरी पांढरकवडा येथे उपोषण सत्याग्रह करणार आहेत . सर्व शेतकऱ्यांना सरकारी मदत ,बियाणे ,कर्जमाफी व संपुर्ण वीज बिल माफी सह सर्व आदिवास्याना नवीन खावटी ह्या मागण्या सरकार समोर रेटण्यात येथील अशी माहीती विदर्भ जन आंदोलन समीतीचे सचिव मोहन जाधव यांनी दिली .
संपूर्ण विदर्भ व मराठवाडा दुष्काळाचा सामना करीत असुन पिण्याच्या पाण्याचेही भीषण संकट निर्माण झाले आहे . हजारो शेतकऱ्यांनी दुबार पेरणीसाठी बियाणे घेण्यासाठी घरचे सोने गहाण ठेऊन बँकेकडून पिक कर्ज काढले आहे आणी ते सुद्धा वाया गेले आहे लगतच्या तेलंगाना सरकारने तात्काळ हेक्टरी दहा हजार रुपये मदत ,सर्व सोने गहाण ठेऊन घेतलेले कर्ज माफ केले असुन मात्र महाराष्ट्र सरकार झोपा काढत आहे त्यांना जागे करण्यासाठी हे सांकेतिक उपोषण सत्याग्रह आयोजीत करण्यात आले असुन सरकारने या भीषण दुष्काळाच्या काळात सरकार जागे झाले नाहीतर शेतकरी हल्लाबोल आंदोलन सुरू करतील अशी घोषणा किशोर तिवारी यांनी यावेळी केली आहे .
आपण राज्य सरकार व केंद्र सरकारला २० जूनला पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रात सरासरी सुरवातीला ७ जूनला काही भागात ३७ मिमी पाऊस बरसताच शेतकर्यांनी पेरणीच्या कामाला प्रारंभ केला २० जून पर्यंत ३०लाख हेक्टरवर पेरणी करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक २० लाख हेक्टरक्षेत्र कपाशीच्या लागवडीचे आहे तर ८ लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली. २ लाख हेक्टरवर इतर लागवड करण्यात आली यामध्ये तुरी ज्वारी आणि मूग, उडीदाच्या क्षेत्राचा समावेश आहे मात्र आता पेरणीनंतर पाऊस नसल्याने पेरणी करणारे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. महाराष्ट्राच्या २० लाखाहेक्टरवरील कोरडवाहू क्षेत्रातील दुबार पेरणीचे संकट आले असून सरकारने शेतकऱ्यांना आता बियाणे वाटप करावे व नव्याने कर्ज द्यावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांना केली होती मात्र सरकारने आज पर्यंत दमडीही मदत म्हणून दिली नाही या उलट अधिकारी पेरणी झाली नाही वा फार कमी झाली अशी माहीती सरकारला देत आहेत सहकारी व सरकारी बँकांनी फक्त १०% शेतकऱ्यांना कर्ज दीले आहे आता सावकार व कृषीकेंद्रचालकही एक पैशाची उधारी देत नसुन लोकनेते मात्र आमदार होण्यासाठी फिरत आहेत यांचे गावामधून शेतकऱ्यांनी हकालपट्टी करावी असे आवाहन किशोर तिवारी केले आहे.
.संपुर्ण महाराष्ट्रात पाण्याचे संकट आणीबाणीचे स्वरूप घेऊन समोर येत मात्र आघाडी सरकार व मुख्यमंत्री खुर्चीचे व निवडणुकीचे राजकारण करण्यात व्यस्त आहेत तर शेतकरी चिंतेने व दुबार पेरणीच्या धक्क्याने आत्महत्या करीत हा प्रकार तर फारच किळसवाना या नेत्या आपली नाही तर सरकार व प्रशासनाची पत जिवंत ठेवण्यासाठी सवेन्दनशीलता दाखऊन शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा ,अशी आग्रही विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे.
मृग नक्षत्रात हमखास पाऊस बरसतो, या आशेवर शेतकर्यांनी धूळ पेरणी केली. रोहिणी नक्षत्राच्या सुरुवातीला पेरणी करण्यात आली. महागडे कपाशीचे बियाणे टोपण्यात आले. ज्यांच्याकडे ओलिताची सोय होती त्यांनी स्प्रिंकलरद्वारे ओलित करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारनियमनाने ओलितही पुरेपूर करता आले नाही अशा स्थितीत महागडे बियाणे उद्ध्वस्त झाले आहे. पुन्हा दुबार पेरणी करावी लागणार आहे,मायबाप सरकारने निवडणुकीच्या तोंडावर तरी कोरडवाहू क्षेत्रातील कापूस उत्पादक शेतकर्यांना मदत करावी अशी कळकळीची विनंती किशोर तिवारी मुख्यमंत्र्यांना केली आहे
पावसाळ्याची पाणी देणारे सर्व नक्षत्र व जून-जुली महिना कोरडेच जात आहेत त्यामुळे शेतजमीन अजूनही कोरडीच आहे. काही भागात १७ तारखेला महाराष्ट्रात पाऊस पडला व आता पाऊस जोर धारणार म्हणून काही शेतकर्यांनी या अपुर्या पावसाच्या ओलातच बियाणे टाकले आणी तेव्हापासून पावसानेच दडी मारली आज जुन संपला तरी पाऊस आलेला नाही . सध्या दररोजच आभाळत ढग येतात. परंतु पाऊस मात्र कोसळत नाही. ज्यांनी पेरण्या केल्या, त्यांच्यावर आता दुबार पेरणीचे संकट आले आहे. पावसाच्या या लहरीपणामुळे यावर्षीचा खरीफ हंगाम बुडणार हे निश्चित झाले आहे. एकीकडे बियाण्यांचा तुटवडा आहे. त्यामुळे बोगस बियाण्यांचा बाजारात प्रवेश झाला आहे. अस्सल बियाण्यांचे भाव चढत आहे. या चक्रव्यूहात बळीराजा भरडला जात आहे मात्र सरकार झोपले आहे ,असा आरोप किशोर तिवारी लावला आहे.
ऑक्टोबर महिन्यात निवडणुका आहेत व आज अडचणीत आले आहेत तरी सरकारने आपली जबाबदारी विसरली असली तरी मतदानासाठी तरी सर्व शेतकऱ्यांना सरकारी मदत ,बियाणे ,कर्जमाफी व संपुर्ण वीज बिल माफी सह सर्व आदिवास्याना नवीन खावटी वाटप सुरु करावे अशी मागणी तिवारी केली आहे
No comments:
Post a Comment