पीक कर्जमाफीचा जीआर: अडचणीच्या आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी जाचक अटी रद्द करा -शेतकरी मिशनचे मागणी
दिनांक -२९ जून २०१७
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमारें ३४ हजार कोटी रुपयांची ऐतिहासिक कर्ज माफी, सरकारने छत्रपती शिवाजी शेतकरी स्वाभिमान योजनेचा शासन निर्णय दि. २८ जून २०१७ रोजी काढल्यावर ज्यामध्ये मस्तवाल सनदी अधिकाऱ्यांनी पाने पुसण्याकरीता निराशाजनक आणी जाचक कठोर अटी लावल्या असुन शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी जोरदार आक्षेप घेत घेऊन त्याची टीका केली आहे कारण महाराष्ट्रातील कृषी संकट संबंधात आणि पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील १४ जिल्ह्यांतील कोरडवाहू दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या समस्येचे निराकरण होत नसुन जास्तीत अडचणीचे शेतकरी वंचित ठेवण्याचा प्रयन्त असल्याचा आरोप त्यांनी केला आहे . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करून शेतकर्यांच्या आत्महत्येच्या शेतकर्यांच्या आत्महत्यां रोखण्यासाठी भरीव सूचनांसुद्धा केल्या आहेत .
तिवारी म्हणाले की जीआरच्या १ च्या टप्प्यावरील तरतुदी मध्ये प्रमाणे १ लाख पन्नास हजारापेक्षा रुपयांपेक्षा कमी असलेले सरसकट माफ करण्यात आले मात्र रु.१ लाख पन्नास हजाराचे संपूर्ण कर्ज माफ केले तरी जाचक अटीमुळे ७/१२ कोरा होत असल्याचे तात्काळ भरण्याची अट सत्य समोर येत आहे थकीत रक्कम १ लाख पन्नास हजारापेक्षा जास्त असल्यास उर्वरीत रक्कम भरण्याची अट लादण्यात आली आहे यामध्ये सनदी अधिकाऱ्यांची नाकारात्मक व संवेदनशून्यता दिसत हा मूद्दा बँक आणि लाभार्थी शेतक-यांना त्यांच्या संबंधित खात्यामध्ये रू . १. ५ लाखांच्या कर्जाच्या फायद्यांमुळे पुनर्रचनेचे निर्णय बँकांनी घेण्यास सरकारने करार करावा अशी मागणी तिवारी यांनी केली आहे ,
७/१२ मध्ये संयुक्त कुटुंबाच्या सवांचे नावे आहेत मात्र एकच व्यक्ती शेती करीत असेल मात्र इतर व्यक्ती आयकर नौकरी अटीमुळे कर्जमाफीसाठी पात्र नसतील तर शेतीकरणाऱ्या व्यक्ती कर्जमाफीचा लाभ देण्याची मागणी शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी
आरबीआयने ज्या शेतकर्यांना कर्जमाफी देण्यात आलेली आहे त्या सर्व शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज देण्याची मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येत असलेले प्रोत्साहन २५ हजारावरून दीड लाखापर्यंत आणी बँकानीं व सूक्ष्म वित्तीय ( मायक्रो फायनान्स ) कंपन्यांनी दिलेल्या स्वयं मदत गटांच्या कृषीकर्जही समाविष्ट करण्याची मागणी तिवारी यांनी केली आहे ,
गेल्या वर्षीच्या बॅंकेने १५ ऑगस्टपर्यंत पर्यंत पीक कर्ज वितरित केले असल्याने १५ ऑगस्ट २०१६ पर्यंत थकीत पीक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश करावा अशी मागणी तिवारी यांनी केली आहे ,
No comments:
Post a Comment