आचारसंहितेच्या नावावर दुष्काळग्रस्त ग्रामीण जनतेला मदतीपासून वंचित ठेऊ नका -किशोर तिवारी
दिनांक -१२ मार्च २०१९
येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचा अतिरेक करीत अधिकारी दुष्काळग्रस्त विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी व शेत मजुरांना अन्न सुरक्षा ,आरोग्य सुरक्षा ,रोजगार ,पाणी ,चारा व नवीन पिककर्ज इत्यादी मदत व पुनर्वसनाच्या कामावर बंधने टाकणाऱ्या व निवडणुकीचे काम समोर करून दुष्काळग्रस्त विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी व शेत मजुरांचे हाल करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत देत उच्चं न्यायालयाच्या निर्णयानंतर मदत व पुनर्वसनाच्या कामाना आदर्श आचारसंहितेचा नावावर निवडणूक आयोग रोखु शकत नसल्याने कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज मुख्य निवडणूक आयुक्तांशी चर्चा केल्यावर दिले .
अनेक दुष्काळग्रस्त विदर्भ व मराठवाड्यातील जिल्ह्यात दुष्काळग्रस्त शेतकरी व शेत मजुरांचे पाणी व चारा तसेच मजुरीसाठी हाल होत असल्याच्या तक्रारी आल्यावर मदत व पुनर्वसनाच्या कामाना आदर्श आचारसंहितेचा नावावर का रोखत आहात अशी विचारणा केल्यावर मस्तवाल कामचोर अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाचे कारण समोर केल्यामुळे किशोर तिवारी यांनी हा वाद निवडणूक आयोगापुढे नेल्यानतंर निणर्य झालेले सर्व मदत व पुनर्वसनाच्या कामाना आचारसंहितेचा नावावर अधिकाऱ्यांची नावे द्यावी त्यांना तात्काळ निलंबित करण्यात येणार असल्याची माहीती देण्यात आल्याचे तिवारी यांनी स्पष्ट केले .
चारा व पाणी नसल्यामुळें विदर्भ व मराठवाड्यातील जिल्ह्यात दुष्काळग्रस्त शेतकरी व शेत मजुरांना जनावरे मातीमोल किमतीत विकावी लागत असुन अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचा नावावर डोळे झाक करीत असल्याच्या प्रचंड तक्रारीं येत मात्र सारे राजकीय पक्ष निवडणुकीमध्ये गुंतले असुन दुष्काळग्रस्त शेतकरी व शेत मजुरांना वाऱ्यावर सोडले आहे त्यातच रोजगार हमी योजनेची कामेच उपलब्ध नसल्यामुळे प्रचंड उपासमार होत असल्याची खंत किशोर तिवारी यांनी व्यक्त केली .
=================================================
No comments:
Post a Comment