Friday, March 1, 2019

"मागेल त्याला अन्न" योजनेत घुबडी येथे वंचित आदिवासींना शिधा पत्रिकेचे वाटप-प्रत्येक खेड्यात मोहीम राबविणार -किशोर तिवारी

"मागेल त्याला अन्न" योजनेत घुबडी येथे वंचित आदिवासींना शिधा पत्रिकेचे वाटप-प्रत्येक खेड्यात मोहीम राबविणार -किशोर तिवारी 
दिनांक -२ मार्च.२०१९ 

यवतमाळ जिल्ह्यातील अतिदुर्गम बारडतांडा पारधी बेड्यातुन महाराष्ट्र सरकारची प्रत्येक गरीबाला अन्न देणारी 'मागेल त्याला अन्न ' योजनेचा शुभारंभ झाल्यानंतर केळापूर तालुक्यातील येथे जिल्हा पुरवडा विभागामार्फत कोदोरी ,सुकंडी , चनाक्का ,रूढा ,खैरी ,वळवाट , धरमगोटा ,कारेगाव ,दर्यापुर , हिवरी ,पिंपळशेंडा पिठापोंगरी येथील अन्नापासून वंचित असणाऱ्या सर्व आदीवासी ,शेतकरी व शेतमजुरांचा 'मागेल त्याला अन्न ' योजनेचा कॅम्प आयोजीत करण्यात आला होता ,यावेळी जिल्हा पुरवडा अधिकारी शालीग्राम भराडी यांच्या नेतृत्वात पुरवडा नियंत्रक भारती सोनटक्के अन्न पुरवडा विभागाच्या सर्व चमूने रुख्मा किष्टु मडावी,भागुबाई मडावी ,बेबी सोन्या दडांजे,बयनाबाई  कुमरे, सविता शन्कर ,तुकीबाई दशरथ सर्व खैरी पोड ,अजंना महादेव तोडसाम,रूख्मा अयया दडांजे,विजया विठठल वाघाडे  ,काजल महादेव कोवे ,नर्मदा मुनेश्वर, रूख्मा अयया दडांजे सर्व घुबडी ,जिजा किसन वेटटी,लचुमबाई लच्मा व पार्वता जयवंत तोडसाम रा कारेगाव ब यान या कार्यक्रमात शिधावाटप पत्रिका शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी  यांच्या हस्ते देण्यात आल्या . 

आदीवासी नेते अंकित नैताम ,सरपंच पूजा कोवे ,जिल्हा परीषद सदयस गजानन बेजंकीवार ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गंगारेड्डी क्यातमवार ,भाजप नेते शिवारेड्डी पाटील येलटीवार ,नरेन्द्ररेड्डी अर्लीकर ,मायाताई बारहाते ,गजानन बोदूरवार ,डॉ दिलीप रेड्डी कुंटावार धनंजय झीलपिलवार ,किशोर रासमवार ,भूमण्णा सरलावार ,जितु मडावी ,वसंतराव कुरवते  ,हनमंतु कोवे ,लक्ष्मण कुरवते ,महादेव मामीडवार ,नरसय्या नागुलवार ,रमेश कोपुलवार .गंगाराम तांडेकर व पुनाजी टापरे  उपस्थित होते . 
यावेळी किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशाची माहीती देतांना विदर्भ व मराठवाड्यात एकही खेड्यातील शेतकरी व शेतमजूर अन्नापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रत्येक ब्लॉक स्तरावर 'मागेल त्याला अन्न ' योजनेचा एक भाग म्हणून अन्न सुरक्षा मेळावे आयोजीत करण्यात येणार आहेत . जिल्ह्यात पॉस मशीन लावल्यावर व आधार लिंकिंग करून महाराष्ट्र सरकारने अन्न सुरक्षा योजनांतर्गत नागरी पुरवडा विभागामार्फत सर्व गरीबांना देण्यात येणारे अन्न खुल्या बाजारात काळा बाजार करून विकणाऱ्या माफियांचा बंदोबस्त करण्याच्या मोहीमेमुळे आता 'मागेल त्याला अन्न ' व ज्या गरीबातल्या गरीब कुटूंबाना अंत्योदय योजना लागु करावी ह्या प्रधान सचिव महेश पाठक यांच्या सर्व जिल्हा पुरवडा अधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशावर हा  अंत्योदयचे अन्न खुल्या बाजारात काळा बाजार करून विकणाऱ्या माफियां दुकानदाराने सरकार महाराष्ट्रात अंत्योदय योजनाच गुंडाळत आहे अशा बातम्या प्रसारीत केल्यामुळें अन्न सुरक्षा  बंद करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही तसेच ही योजना विस्तारीत करीत असल्याची माहीती  किशोर तिवारी यांनी यावेळी दिली .
मागील तीन वर्षात शेतकरी मिशनने  १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त पश्चिम विदर्भ व  मराठवाड्यात ७० लाखावर सात बारा असणाऱ्या शेतकरी कुटुंबाना सरसकट २ रु किलो गहु व ३ रु किलो तांदुळ देणारी अन्न सुरक्षा योजना लागु केल्यानंतर आता ग्रामीण पश्चिम  विदर्भ व  मराठवाड्यात १०० टक्के अन्न सुरक्षा देण्यात आली असुन खेड्यातील एकही कुटुंब अन्नापासुन वंचित राहणार नाही याची हमी देण्यात आली आहे .महाराष्ट्रात अंत्योदय अन्न सुरक्षा योजनां प्रेत्येकाच्या घरापर्यंत नेण्याची  ग्वाही तिवारी यांनी यावेळी  दिली . 
======================================================

No comments: