भारताचे कृषीसंकट दूर करण्यासाठी नितीन गडकरी यांच्या केंद्रात महत्वाच्या भूमिकेची देशाला गरज ! किशोर तिवारी
नागपूर, देि २७ मार्च २०१९,
जगात शेतकरी आत्महत्याग्रस्त भागाने चर्चेत असलेल्या विदर्भातील खेड्यातुन आजही परंपरागत व आधुनिक शेती करणारे शेतकरी व सफल उद्योजक मोदी सरकारचे विकासाचे प्रतीक नागपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार नितीन गडकरी त्यांच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्ट करण्यासाठी ,पर्यावरण रक्षणातून कृषीमधून इंधनाची निर्मिती ,शेतकऱ्यांना बियाणे व पीकपद्धती निवडण्याच्या अधिकारावर स्पष्ट भुमिका ,अधिकाऱ्यांना आपली जागा दाखवत विकासाची कामे करण्याचा विक्रम करणाऱ्या नितीन गडकरींच्या विरोधात धर्म व जातीच्या आधारावर मते गोळा करण्याचा चालवलेला उठाठेव संताप जनक असून राजकीय पक्षांनी उमेदवाराच्या जातीच्या नावाने मते मागून विदर्भातील शेतकरी - शेतमजुरांचे व बेरोजगारांचे नुकसान करू नये, असे आवाहन विदर्भ मराठवाड्यातील हवालदिल शेतकरी शेतमजूर व आदिवासी यांच्या साठी विगत तीन दशकांपासून सातत्याने लढणारे जन आंदोलक नेते किशोर तिवारी, अध्यक्ष- विदर्भ जनआंदोलन समिती , यांनी केले आहे. ते आज एका पत्रकात म्हटले आहे .
ज्या नितीन गडकरी यांच्या अहोरात्र मेहनतीने देशात रस्ते व जल वाहतूक क्षेत्रात झालेल्या क्रांतिकारक विकासा च्या कामाची खुद काँग्रेस नेत्या सोनियाजी गांधी व लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मुक्त कंठाने तारीफ केली, नागपुरात गेल्या पाच वर्षात गडकरी - फडणवीस यांचा विकासाचा झंझावात, याचे भान न ठेवता गडकरी रुपी सर्व समावेशक- विकास पुरुष लोकनेत्याला धर्म व जातीच्या बंधनात कसे अडकविणार ? असा सवाल किशोर तिवारी यांनी राजकीय नेत्यांना केला असून गडकरी यांना भाजपा विरोधासाठी विरोध, तोही चक्क जाती भेदाच्या किळसवाण्या प्रकाराने, हा प्रकार विदर्भातील जनता कधी माफ करणार नाही. यामुळे राजकीय नेत्यांच्या संकुचित मानसिकतेचे प्रदर्शन होत असून शेतकरी, शेतमजूर , आदिवासी व बेरोजगार आदींच्या साठी गडकरी यांच्या लढ्याला खिळ बसत असल्याने नेत्यांनी संकुचित मनोवृत्ती सोडावी, असा विचार तिवारी यांनी व्यक्त केला आहे.
नागपुरात नव्यानेच जाती पातीचे राजकारण गेल्या दोन तीन महिन्यांत सुरू झाले असून, उमेदवारा चे नाव जाहीर झाल्या पासून सोशल मीडिया व वर्तमान पत्रात धर्म व जाती विशिष्ट एकोपा जुळवून, गडकरी यांचे मताधिक्य कमी करून, त्यांची राष्ट्रीय पातळीवर उंचाविणारी प्रतिमा मलिन करण्याच्या प्रयत्नात, संकुचित मानसिकतेचे मुठ भर जातीवादी नेते भिडले आहेत. रालोआ ला बहुमत न मिळाल्यास पंतप्रधान पदासाठी संपूर्ण देश ज्यांचा उल्लेख करीत आहेत व ज्यांच्या मुळे महाराष्ट्र राज्याला एक सुवर्ण संधी मिळण्याचा योग जुळत असताना, गडकरी यांना जाती पातीच्या राजकारणात राजकीय व जाती पातीचे मुठभर पोटभरू नेते कसे काय अडकवू शकतात ? असा सवाल तिवारी यांनी केला आहे.
विदर्भ मरावाड्यातील शेतकरी - शेतमजूर हवालदिल झाला आहे. ज्या नितीन गडकरी यांनी कधीही धर्म वा जातीचे राजकारण केले नाही , अश्या सर्वमान्य नेत्याला राष्ट्रीय पातळीवर सर्वोच्च पदावर विराजमान करून, खऱ्या अर्थाने विदर्भ मराठवाडयातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन जाती व धर्म विसरून गडकरी यांना पाच लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून देण्याची गरज तिवारी यांनी व्यक्त केली आहे.
राजकीय नेत्यांनी हा आपला उपद्व्याप त्वरित बंद करावा, या साठी चांगल्या कार्यकर्त्याला बळीचा बकरा करू नये, जनता कधी माफ करणार नाही, असे मत तिवारी यांनी व्यक्त केले.
इतिहास बघा - नितीन गडकरी यांनी कधी जाती विरोध किंवा धर्म विरोध केला का ? नागपूर मनपात बहुजन समाजाची ५० पेक्षा जास्त नगरसेवक गडकरी यांच्या प्रयत्नाने निवडून यावेत, ज्या बहुजन समाजाचा राजकीय नेते वास्ता देत आहेत , त्या बहुजन समाजाची ६५ पेक्षा जास्त आमदार आणि आठ पेक्षा जास्त खासदार चक्क सर्वसाधारण मतदारसंघातून निवडून आणण्यात गडकरी यांचा सिंहाचा वाटा असताना, फक्त जाती धर्माच्या नावावर मते गठ्ठा करण्यासाठी समाजाचा दुरुपयोग व्हावा, ही एक फार मोठी विडंबना आहे.
ज्या गडकरी यांनी विदर्भ मराठवाड्यातील लाखो रुग्णासाठी आरोग्य मिशन सतत चालवून ८ लाख पेक्षा मोती बिंदू ऑपरेशन, अपंग कल्याण, कर्करोग व क्षय रोग निदान उपचार शिबिरे आणि सिकल्सेल या दुर्धर आजाराने ग्रस्त हजारो रुग्णाची केलेली अव्याहत सेवा तसेच नागपूरात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान आणून उल्लेखनीय काम केले. त्याचे सातत्य कायम राहील या साठी सर्वांनी धर्म व जात विसरून काम करणे गरजेचे असताना काही मुठभर राजकीय नेत्यांनी गडकरी का विरोध करण्यासाठी धर्म व जातीचे राजकारण करणे क्लेश दायी आहे. विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व बेरोजगार यांचे भल्या साठी गडकरी यांना पाठबळ द्यावे, जेणे करून महाराष्ट्राला गडकरी यांच्या अथक प्रयत्नाने मिळालेले राष्ट्रीय पातळी वरील नेतृत्व अधिक दैदित्यमान होवू शकेल, अशी आशा तिवारी यांनी व्यक्त केली आहे.
************
किशोर तिवारी,
अध्यक्ष,
विदर्भ जनआंदोलन समिती
९४२२१०८८४६
kishortiwari@gmail.com
No comments:
Post a Comment