शिवसेनेच्या मुख्यपत्राने भाजपच्या कुबड्या घेतल्यावर वलग्ना करणे अकालनीय - किशोर तिवारी
दिनांक -२२ मार्च २०१९
एकीकडे महाराष्ट्रात भाजपसोबत लोकसभेच्या निवडणुकीसाठी युती केल्यावर दिनांक २१ मार्चचा सामनामध्ये शिवसेनेप्रमुख यांच्या तोंडात आपले विष सोडणाऱ्या संजय राऊत यांनी गोव्याच्या राजकारणावर व नितीन गडकरी यांनी नवीन मुख्यमंत्रीपदाचा पदभार सहज चर्चेने प्रमोद सावंत यांच्याकडे दिल्यावर व त्यांनी एकाच दिवसात बहुमत सिद्ध केल्यावर सामनामध्ये अग्रलेख लिहून भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नव्याने असंतोष भरला आहे हे सगळा उपद्रव उद्धव ठाकरे यांची संयमी व सवेंदनशील प्रतिमेला बारामतीच्या सल्ल्याने संजय राऊत सतत मलीन करीत असल्यामुळे शिवसेना प्रमुखांनी या मातोश्रीच्या चाणक्याला लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत विश्राम देण्याचा सल्ला विदर्भातील शेतकरी नेते व उद्धव ठाकरे यांचे जुने मित्र किशोर तिवारी यांनी दिला आहे .
दिनांक २१ मार्चच्या सामनाच्या अग्रलेखात संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या तोंडात टाकून म्हटले आहे की "एकीकडे मनोहर पर्रीकर यांचे पार्थिव अनंतात विलीन झाले, पण त्यांच्या देहाची राख गोमंतकच्या भूमीत विलीन होण्याआधीच सत्ता-खुर्चीचा लाजीरवाणा खेळ सुरू झाला व अखेर हपापलेल्या बोक्याप्रमाणे आपापला वाटा घेऊन हा खेळ सोमवारी मध्यरात्रीनंतर संपला. गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून सोमवारी मध्यरात्री प्रमोद सावंत यांनी शपथ घेतली, तर विजय सरदेसाई व सुदिन ढवळीकर हे दोन उपमुख्यमंत्री म्हणून नेमले जाणार आहेत. लोकशाहीचा हा खेळखंडोबाच म्हणावा लागेल. पर्रीकरांच्या चितेची आग विझेपर्यंत तरी थांबायला हवे होते." असे म्हटले व सोबतच असांसदीय भाषेमध्ये भाजपला जाहीरपणे शिव्या देण्यात आल्या आहेत असे मित्रपक्ष व त्यांचे असे अनाहूत मित्रपक्ष प्रेम निवडणुकीच्या वेळेस शिवसेनेच्या अनेक निष्क्रिय खासदार वारंवार लादून उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या कुबड्या घेऊन उभे केले त्यांना निवडणूक कठीण करीत आहे कारण विदर्भ मराठवाड्यात अनेक ठिकाणी खासदारांना वारंवार उभे केल्याने प्रचंड असंतोष आहे त्यातच हा शहाणपणा घातक असल्याचे सत्य या मातोश्रीच्या चाणक्यांना कोण सांगणार असा सवाल किशोर तिवारी यांनी केला आहे .
डिसेंबर महीन्यात पंढरपूर येथे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना 'चौकीदार चोर आहे' असे बोला असा सल्ला सुद्धा याच मातोश्रीच्या चाणक्यांनी दिला होता त्यामुळेच युती झाल्यावर 'शिवसेना चोरावर मोर' आहे का? असा सवाल विरोधकांनी केला . मागील पाच वर्षात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या तोंडात अनेक अकालनीय भाजपविरोधी विषयावर विष ओतणारे शब्द टाकून अग्रलेख लिहण्याचा गोरखधंद्याने केंद्रात व राज्यात शिवसैनिकांची जनतेची कामे करण्यास प्रचंड अडचणी आल्या त्यातून शिवसैनिकांमध्ये असंतोष आहे मात्र जमिनीच्या कार्यकर्त्यांची काळजी नसलेल्या मुंबईत वातानुकूल खोलीत सुपारी घेऊन काड्या करणाऱ्या मातोश्रीच्या चाणक्यांना कसे समजणार असा सवालही किशोर तिवारी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना केला आहे .
=====================================================================
No comments:
Post a Comment