Sunday, June 20, 2021

प्रताप सरनाईक यांचे प्रेमपत्र - भाजपने शिवसेनेच्या फारकत घेण्याचे आत्मचिंतन करण्याची गरज -किशोर तिवारी

प्रताप सरनाईक यांचे प्रेमपत्र - भाजपने शिवसेनेच्या  फारकत  घेण्याचे आत्मचिंतन करण्याची गरज -किशोर तिवारी 

दिनांक २१ जुन २०२१ 


शिवेसना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांना लिहलेल्या पत्रामुळे भाजप -सेना युती पुन्हा होणार वा का तुटली यावर अनेक प्रतिक्रिया येत आहे मात्र केंद्रात भाजपची सत्ता तसेच देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकसुत्री काम करण्यासाठी एकवटलेली सत्ताकेंद्रे व प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस  देशात जवळपास ५५ वर्षे सत्तेत राहुन आज आपल्या जनाधारासाठी व अस्तित्वाची लढाईत गुंतला असतांना भाजपचा सर्वात जवळ असलेला सखा  शिवसेना अशा पोषक परिस्थिती मध्ये  आपल्याला का सोडून गेला यावर आत्मचिंतन न करता महाराष्ट्र भाजपाचे एकसुत्री काम लहरी सत्ता गाजविणारे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ,प्रदेश अध्यक्ष चंदा कांत पाटील व राज्यात शिवसेने वर एकही संधी न  गमावता आसुड ओढणारे राणे पितापुत्र किरीट सोमय्या आशिष शेलार कदम भातखळकर  दरेकर यांच्या कडुन आलेली प्रतिक्रिया फारच विकृत प्रकारच्या असुन यामध्ये आकस व सत्ता गमावल्यामुळे सुड काढण्याचा मनभेद दिसतो हे राज्याच्या राजकारणासाठी दुर्भाग्यपुर्ण असल्याचे मत शिवसेना कार्यकर्ते मात्र राष्ट्रीय स्तरावर मागील एका वर्षापासून माध्यमांवर बाजु मांडणारे किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे . 

मागील १८ महिन्यात  ही इतकी जुनी मैत्री का तुटली यावर सत्य परिस्थितीचे व वास्तविकतेचे आत्मचिंतन न करता ही युती मुख्यमंत्री पदावरूनच  तुटली यावर जोर देण्यात आला मात्र खरी परिस्थितीचे अवलोकन करणे अत्यंत आवश्यक झाले आहेत ते असे कीं  २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजपने आपल्या एनडीए मधील घटक पक्षांना त्यांच्या त्यांच्या राज्यात संपविण्याचा प्रयन्त सुरु केला त्यामुळेच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये युती तोडुन स्वबळावर निवडणूक लढविली मात्र पूर्ण बहुमत न आल्यामुळे व पोडापोडी न जमल्यामुळे शिवसेनेच्या घुबडया घेतल्या व सत्तेत आले मात्र २०१४ ते २०१९ च्या काळात भाजपच्या वागणुक फारच बदलेली होती त्याचा अनुभव वारंवार उद्धवजींना आला मात्र २०१९ निवडणुकीमध्ये मोदी -अमित शाह यांनी लहान भाऊ मोठा भाऊ करीत पुन्हा युती केली मात्र २०१९ मध्ये जशी एकखांबी सत्ता भाजपाला आली त्याचवेळी शिवसेनेला कट टू साईज करण्यासाठी सर्व कारस्थान रचण्यात पुन्हा सुरवात समसमान जागेच्या नांवावर १२० जागा त्यातही त्याठिकाणी बहूतेक आपले बंडखोर उभे करून कोट्यवधी रुपये फडणवीस साहेबांनी फेकले मात्र तरीही बहुमत मिळाले नाही त्यानंतरही दिलेले सारे वचन धाब्यावर ठेवत अभद्रपणे सरकार स्थापन करण्याचा लाजिरवाणा प्रयन्त देवेन्द्रजीनी केला व आपली फजीती करून  घेतली माञ मागील १८ महिन्यात आपला सखा शिवसेना ज्याच्या कुबडया घेत आपण महाराष्ट्रात अस्तिव निर्माण केले तो एकेकाळचा मोठा भाऊ दूर का गेला यावर एक दिवसही आत्मचिंतन न करता ,आपली सत्ता कशी येणार याचा प्रयन्त करणाऱ्या चिल्लर अल्पबुद्धीधारक भाजपच्या नेत्यांना कसा  कळेल कारण आज सर्वांना घेऊन चालणारे  महाजन मुंडे नाहीत तर जे समेट आणण्यात सक्षम आहेत अशा नितीन गडकरी यांना भाजपने कट टू  नागपुर केले आहे असा टोमणा किशोर   तिवारी यांनी मांडला आहे . 

आज रोज भाजप शिवसेना संबंधामह्ये  हळू हळू विष कालविणारे देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला शिवसेनेच्या युतीमध्ये रस नाही अशी प्रतिक्रिया दिली तर भाजपामध्ये देवेन्द्र टीम चे सर्वात सक्रीय किरीट सोमय्या यांनी विष कालविणारी प्रतिक्रिया दिली आता देवेंद्र टीमचे राणे पिता पुत्र प्रवीण दरेकर राम कदम आशिष शेलार अतुल भातखळकर कोणतीही आवश्यकता नसतांना मागील १८ महिन्यांपासून जशा प्रकारे एकही  संधी न गमावता ज्या प्रकारे विकृत प्रतिक्रिया देत आहेत त्याचप्रमाणे प्रतिक्रिया देतील असा विश्वास किशोर तिवारी प्रगट  केला . 

मागील दीड वर्षापासुन देवेंद्र टीमने केंद्राच्या NIA CBI  ED NCB चा वापर करून शिवसेनेला वा महाविकास आघाडीच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचा  सपाटा लावला आहे वा ज्याप्रकारे भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शिवसेनेचा "शवसेना सोनीयासेना" असा उल्लेख करतात त्यामुळे शिवसेने-भाजपा सम्बंधामध्ये दुरावा निर्माण होत  आहे मात्र या मुर्खांना महाराष्ट्रात भाजपा सोबत शिवसेना नसली तर लोकसभेत व विधानसभेत  खासदार आमदारांची मोठी घसरण होणार हे कळत नाही . शिवसेनेनी महाविकास आघाडी मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत जाऊन सत्ता स्थापन केली आहे व उध्दवजी प्रशासनाचा कोणताही अनुभव नसतांना मुख्यमंत्री म्हणुन ज्याप्रकारे या विषम विचारांच्या पक्षासोबत व भाजपच्या केन्द्र सरकार सोबत अतिशय प्रेमाने  कोरोना संकटात काम करीत आहेत त्याची नोंद जागतिक पातळीवर झाली आहे व याचा इतिहास साक्षीदार राहणार . शिवसेनेच्या या महाविकास आघाडी मध्ये  जाण्याच्या निर्णयावर मतदार कौल देतील मात्र ज्या प्रकारचे सुडाचे व व्यक्तिगत चारीत्र्य हनन बदनामी करण्याचे अत्यंत घाणेरडे प्रकार भाजपच्या  देवेंद्र टीमने केले त्याचा साक्षी सुद्धा इतिहास राहणारच असा इशारा भाजपला किशोर तिवारी यावेळी दिला . 

आपला भाजपावारी अनुभव सांगताना किशोर तिवारी म्हणाले की "मी २०१२ च्या डिसेंबर मध्ये त्यावेळचे राष्ट्रीय अध्यक्ष वं माझे १९७७ पासुन मित्र नितीन गडकरी यांच्या विनंतीला मान देऊन फक्त त्यांना पंतप्रधान पाहण्याच्या  दृष्टीने भाजपसोबत काम करणे सुरु केले मात्र माझा २०१२ ते २०१९ चा अनुभव विश्वासघातांचा राहीला व मी  लोकसभेत भाजपाची एकखांबी सत्ता आल्यानंतर त्यांच्याशी फारकत घेत कोणतीही अट वा मागणी न करता माझे १९९९ पासून चे मित्र उद्धवजी ठाकरे यांच्या  सोबत सामाजिक चळवळ करण्यासाठी सोबत काम करण्याचे ठरविले मी त्यांच्या पेक्षा थोरला असल्यामुळें त्यांच्याशी फारच अधिकाराने जवळुन चर्चा करण्याची संधी मिळाली . मला त्यांच्या बोलण्यात २०१४ ते २०१९ भाजपच्या वेळोवेळी दिलेल्या वागणुकीचा वा प्रादेशिक पक्ष कट टू साईज करण्यासाठी होत असलेल्या प्रयन्ताचा त्यांचा साक्षात्कार जाणवत होता त्यातच ऐन दिवाळीत आम्ही शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचा करारच झाला नाही अशी अकालनीय देवेंद्र घोषणेमुळे त्यात प्रचंड भर पडली मात्र  आज शिवसेनेचा प्रवास जसा  भारतात जसा बंगाल ओरीसा तेलंगाणा आंध्रप्रदेश तामिळनाडू सारख्या एकखांबी सत्ता गाजविणाऱ्या प्रादेशिक पक्षासारखा झाला त्यातच उद्धवजींना राष्ट्रवादीचे शरद पवार सारख्या भारताच्या  राजकारणातील पितामह व्यक्तीचा  आशीर्वाद मिळाला आहे मला तर असे वाटत २०२४ मध्ये सगळे हे प्रादेशिक पक्ष काँग्रेस व डावे यांना  सोबत घेऊन  उद्धवजींच्या नेतृत्वात भारताच्या सत्तेवर येतील व २०२४ ते २०२९ या काळात भारताला "भाजपा मुक्त " करून खऱ्या अर्थाने चांगले दिवस आणतील . 

किशोर तिवारी 

संपर्क -९४२२१०८८४६ 

===================================================

Thursday, June 17, 2021

सेवा किचन व आभा प्रकल्पा मार्फ़त १८ जूनला घोंसी कोलाम पोडावर कोरोना लसीकरण व खावटी वाटप कार्यक्रम

सेवा किचन व  आभा प्रकल्पा मार्फ़त १८ जूनला घोंसी कोलाम  पोडावर कोरोना  लसीकरण व खावटी वाटप कार्यक्रम 

दिनांक -१७ जुन २०२१

यवतमाळ जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात शिवसेने वतीने शेकडो कोलाम  पोडावर व पारधी बेड्यावर  तसेच आदिवासी व गरिबांच्या वस्तीत कोरोना  लसीकरण कोरोना  चाचणी व जाणीव जागरूकता अभियान "आधार उद्भवाचा " प्रकल्पात सुरू करण्यात आला आहे. दिनांक १८ जूनला घोंसी कोलाम  पोडावर कोरोना  लसीकरण व खावटी वाटप कार्यक्रम  सकाळी ११ वाजता  आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य व सेवा किचन व  आभा प्रकल्पा मार्फ़त आयोजित करण्यात आला आहे अशी माहीती शिवसेनेचे नेते किशोर तिवारी यांनी दिली .यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताच लसीकरणासाठी लोकांची गर्दी कमी झाली आहे मात्र लसीकरणासाठी मोहीम राबविण्याचे आव्हान जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ श्रीकृष्ण पांचाळ यांनी केल्यामुळे आदीवासी प्रकल्प अधिकारी व अति . जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन जिल्हा आरोग्य अधिकारी पी एस चव्हाण  तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय मडावी  तलसीलदार सुरेश केवले ,गट विकास अधिकारी सुरेश चव्हाण ,आदिवासी नेते अंकित नैताम बाबुलाल मेश्राम ,माधवराव टेकाम ,संतोष नैताम ,विक्रमसिंग धुर्वे यांच्या सहकार्याने होत आहे . 

नागपूरच्या खुशरु पोचा या रेल्वे मध्ये कर्मचारी असलेल्या व मागील २० वर्षापासुन रुग्णांना व त्यांच्या नातलगांना नागपूर प्रत्येक दवाखान्यात जेवण देण्याचा सेवा किचन या नावाने कोणतीही देणगी न घेता सुरु केलेल्या प्रकल्पाद्वारे  मागीलवर्षी १० हजारावर कुटुंबाना तीन महिने अन्नाच्या किट वाटप केले होते व त्यांच्या कामाचे कौतुक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सरळ फोन करून केली होती व महाराष्ट्र सरकारने त्यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी मागीलवर्षी पदमश्री पुरस्कारासाठी शिफारस सुद्धा केली होती .यावर्षी सुद्धा   पहिल्या टप्प्यात  २० मे रोजी सकाळी पांढरकवडा  १५०० कुटुंबांना  "अन्ना व किराणा " कीट वाटप करण्यात आले व  दुसऱ्या टप्प्यात १०००  कुटुंबांना "अन्ना व किराणा " कीट वाटप करण्यात आले आहे  हा प्रकल्प शिवसेना प्रमुख उद्धवजी  ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते नामदार  एकनाथ शिंदे ,लोकनेते आमदार संजय राठोड , खुशरू पोचा यांच्या सेवा किचन विलु पूनावाला फाउंडेशन , रोहित शेलटकर यांच्या ग्रँड मराठा फाउंडेशन,सलीम खेतानी यांच्या खेतानी फाउंडेशन,जगदंबा देवस्थान ट्रस्ट तसेच शेकडो दात्यांच्या सहकार्याने चालविला जात आहे अशी माहिती "आधार उद्भवाचा " प्रकल्पाच्या संयोजिका स्मिता तिवारी तसेच  क्रांतिवीर बिरसा मुंडा ट्रस्टचे आदिवासी नेते अंकित नैताम यांनी कळविले आहे. 

 गेल्या वर्षभरापासून कोरोना संक्रमणामुळे संपूर्ण जनजीवन, उद्योग व्यवसाय, अर्थव्यवस्थेला ग्रहण लागले असताना माझ्या कार्यालयामार्फत वर्षभरात उपाययोजना व अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या दरम्यान आलेल्या अनुभवांवरून काही व्यवस्था या दीर्घ कालावधीसाठी उपलब्ध झाल्या पाहिजेत व या संकटाचा सामना करताना कोणत्याही अडचणी समोर उभ्या राहू नयेत. भविष्यातील नियोजनाच्या दृष्टीने आरोग्याच्या सुविधांमध्ये नागपूर-विदर्भ आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने प्रयत्नही करण्यात येत आहेत. यासाठी केंद्र शासन, राज्य शासन, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, आरोग्य सेवेतील तज्ञ डॉक्टरांचे बहुमोल सहकार्यही मिळत  असल्याची माहीती किशोर तिवारी यांनी यावेळी दिली . 

===========================================================