Thursday, March 28, 2019

सरकारविरोधी सनदी अधिकाऱ्यांनी तुरीची व हरभऱ्याची नाफेड खरेदीचे महाराष्ट्रात केले तीनतेरा -किशोर तिवारी

सरकारविरोधी सनदी अधिकाऱ्यांनी तुरीची व हरभऱ्याची नाफेड खरेदीचे महाराष्ट्रात केले तीनतेरा -किशोर तिवारी 
दिनांक - २८ मार्च २०१९
महाराष्ट्रातील नाफेडची तूर व हरभऱ्याची हमीभावात खरेदीला जबाबदार असलेल्या पणन विभागाच्या मागील आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांचे स्वीयसचिव असलेल्या मस्तवाल अधिकाऱ्याने आपला  फडणवीस सरकारला शेतकऱ्यांच्या नाराजीला लोकसभेच्या तोंडावर समोर जावे यासाठी खरेदीला दोन महिने विलंब केला असुन या दरम्यान लगतच्या तेलंगणा सरकारने जानेवारीपासुन विक्रमी कोणतीही अट न लावता केली असुन महाराष्ट्रातील सारेच व्यापारी महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे तुरीवर प्रति क्वि.सरासरी १००० रुपये तर हरभऱ्यावर प्रति क्वि.सरासरी ९०० रुपये हमीभावापेक्षा कमी देत खरेदी करून तेलंगणामध्ये विकत असल्याने विदर्भ व मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कापुस सोयाबीनच्या नापिकीनंतर जगण्याचा आधार असलेले तूर व हरभऱ्याचे भाव नाफेडची सरकारी खरेदी  सुरु न झाल्यामुळे अधिकच अडचणींमध्ये आल्याचे दुःख  शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते  व महाराष्ट्राच्या कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष  किशोर तिवारी यांनी व्यक्त केले . 
मागील वर्षीच्या नाफेडच्या खरेदी केलेल्या तूर व हरभऱ्याचे अनेक महीने न देणे सरकारने जाहीर केलेला बोनस आपले सरकारविरोधी धोरण राबवून शेतकऱ्यांना वंचित ठेवणे हे सारे उदयोग खरेदीला जबाबदार असलेल्या पणन विभागाच्या महासंचालकांनी यावर्षी आपल्या नाकर्तेपणाचा कळसच गाठला आहे मात्र नाकामी पश्चिम महाराष्ट्राच्या पणन मंत्र्यामुळेच   तुरी बाजारात रु ४६५० तर हरभरा रु ३४५० दराने विकला जात आहे सरकारने तुरीचा हमीभाव रु ५६५० तर हरभऱ्याचा हमीभाव रु ४४५० प्रति क्वि. घोषीत केल्यांनतर सरकारच्या नाफेड या खरेदीकरणाऱ्या एजन्सीने महाराष्ट्रात खरेदी सुरु न केल्यामुळे शेतकऱ्यांचे तुरीवर प्रति क्वि.सरासरी १००० रुपये तर हरभऱ्यावर प्रति क्वि.सरासरी ९०० रुपये नुकसान होत आहे असा आरोप शेतकरी   किशोर तिवारी यांनी केला आहे .  
सध्या सनदी अधिकारीच राज्यकर्ते झाले असुन मोदींचे स्वप्न  शेतकऱ्यांचे  उत्पन्न दुपट्ट नाहीतर अर्धे करण्याचा उद्योग  विरोधीपक्षांकडून सुपारी  घेऊन ऐन  लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी  हा अन्याय लोकप्रतिनिधी का सहन करीत आहेत असा सवाल करीत सारेच्या सारे निवडणूक निधीसाठी व्यापाऱ्यांच्या दारावर लोटांगण टाकीत आहेत काय असा सवालही किशोर तिवारी यांनी केला आहे . 
सिंचन, वीजपुरवठा, ग्रामीण रोजगार, योग्य बाजार आणि पतपुरवठा यासारख्या क्षेत्रामध्ये पद्धतशीर संस्थात्मक  नियोजन गुंतलेले नाही. संस्थात्मक वित्तपुरवठा पुरेसा उपलब्ध नाही आणि सरकारद्वारा निर्धारित किमान खरेदीची  किंमत सर्वात गरीब व अडचणीच्या  शेतकर्यांपर्यंत पोचत नाही. मध्यम शेतकरी आणि शेतकर्यांचा आर्थिक शोषण रोखण्यासाठी होणारे सर्व प्रयन्त  दलालांचा पोषण करण्यासाठीच चालविण्यात येत असल्याचा अनुभव येत असल्याचा गंभीर आरोपच शेतकरी मिशनने करीत   या कृषी मालाच्या खरेदीच्या पद्धतीवर किशोर तिवारी प्रश्न उपस्थित केले असुन यावर शेतकऱ्यांच्या कृषीमालाला रास्त भाव व बाजाराकडुन होणारी लुट रोखण्यासाठी तात्काळ सुधारणेची मागणी तिवारी यांनी केली आहे  .
शेतकरी मिशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी  सरकारच्या वतीने  शेतकऱ्यांच्या आर्थिक  स्थिती सुधारण्याकरीता तसेच पंतप्रधानांच्या २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्ट करण्यासाठी सुरु असलेल्या प्रमुख कार्यक्रमात पंतप्रधान  पीक विमा योजना,  पंतप्रधान सिचाई योजना ,राष्ट्रीय  बाजार हस्तक्षेप मोहिम, वीज, पत ,जैव-संसाधने पुर्नजिवित करण्यासाठी होत असलेल्या  योजनां राष्ट्रीय कार्यक्रम जसे  सुधारित बियाणे या योजनांचे स्वागत करीत शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्यांच्या पार्श्वभुमीवर कर्जबाजारीपणा व कापुस ,सोयाबीन व तुरीच्या तोटक्या व प्रचंड तोट्यात नेणाऱ्या शेतीचा हवाला देत हमीभावाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी लाऊन धरली आहे . जोपर्यंत सरकार  लागवड खर्च अधिक ५०% टक्के नफा अशा  हमीभावाचे कवच शेतकऱ्यांना देणार नाही व बँकांची दरवाजे सक्तीने  सर्व शेतकऱ्यांना खुली करणार नाही तोपर्यंत शेतकरी आत्महत्या थांबणार नाही असा स्पष्ट इशारा किशोर तिवारी यांनी आपल्या निवेदनात दिला आहे 

==============================================================

Tuesday, March 26, 2019

भारताचे कृषीसंकट दूर करण्यासाठी नितीन गडकरी यांच्या केंद्रात महत्वाच्या भूमिकेची देशाला गरज ! किशोर तिवारी


भारताचे कृषीसंकट दूर करण्यासाठी नितीन गडकरी  यांच्या केंद्रात महत्वाच्या भूमिकेची   देशाला गरज ! किशोर तिवारी


नागपूर, देि २७ मार्च २०१९, 
जगात शेतकरी आत्महत्याग्रस्त भागाने चर्चेत असलेल्या   विदर्भातील खेड्यातुन आजही परंपरागत व आधुनिक शेती करणारे शेतकरी व सफल उद्योजक मोदी सरकारचे विकासाचे प्रतीक  नागपूर लोकसभा मतदारसंघाचे  भाजपचे खासदार नितीन गडकरी त्यांच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्ट करण्यासाठी ,पर्यावरण रक्षणातून कृषीमधून इंधनाची निर्मिती ,शेतकऱ्यांना बियाणे व पीकपद्धती निवडण्याच्या अधिकारावर स्पष्ट भुमिका ,अधिकाऱ्यांना आपली जागा दाखवत विकासाची कामे करण्याचा विक्रम करणाऱ्या नितीन गडकरींच्या विरोधात धर्म व जातीच्या आधारावर मते गोळा करण्याचा चालवलेला उठाठेव संताप जनक असून राजकीय पक्षांनी उमेदवाराच्या जातीच्या नावाने मते मागून विदर्भातील शेतकरी - शेतमजुरांचे व बेरोजगारांचे नुकसान करू नये, असे आवाहन विदर्भ मराठवाड्यातील हवालदिल शेतकरी शेतमजूर व आदिवासी यांच्या साठी विगत तीन दशकांपासून सातत्याने लढणारे जन आंदोलक नेते किशोर तिवारी, अध्यक्ष- विदर्भ जनआंदोलन समिती , यांनी केले आहे. ते आज एका पत्रकात म्हटले आहे . 
ज्या नितीन गडकरी यांच्या अहोरात्र मेहनतीने देशात रस्ते व जल वाहतूक क्षेत्रात झालेल्या क्रांतिकारक विकासा च्या कामाची खुद काँग्रेस नेत्या सोनियाजी गांधी व लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मुक्त कंठाने तारीफ केली, नागपुरात गेल्या पाच वर्षात गडकरी - फडणवीस यांचा विकासाचा झंझावात, याचे भान न ठेवता गडकरी रुपी सर्व समावेशक- विकास पुरुष लोकनेत्याला धर्म व जातीच्या बंधनात कसे अडकविणार ? असा सवाल किशोर तिवारी यांनी राजकीय नेत्यांना केला असून गडकरी यांना भाजपा विरोधासाठी विरोध, तोही चक्क जाती भेदाच्या किळसवाण्या प्रकाराने, हा प्रकार विदर्भातील जनता कधी माफ करणार नाही. यामुळे राजकीय नेत्यांच्या संकुचित मानसिकतेचे प्रदर्शन होत असून शेतकरी, शेतमजूर , आदिवासी व बेरोजगार आदींच्या साठी गडकरी यांच्या लढ्याला खिळ बसत असल्याने नेत्यांनी संकुचित मनोवृत्ती सोडावी, असा विचार तिवारी यांनी व्यक्त केला आहे. 
नागपुरात नव्यानेच जाती पातीचे राजकारण गेल्या दोन तीन महिन्यांत सुरू झाले असून, उमेदवारा चे नाव जाहीर झाल्या पासून सोशल मीडिया व वर्तमान पत्रात धर्म व जाती विशिष्ट एकोपा जुळवून, गडकरी यांचे मताधिक्य कमी करून, त्यांची राष्ट्रीय पातळीवर उंचाविणारी प्रतिमा मलिन करण्याच्या प्रयत्नात, संकुचित मानसिकतेचे मुठ भर जातीवादी नेते भिडले आहेत. रालोआ ला बहुमत न मिळाल्यास पंतप्रधान पदासाठी संपूर्ण देश ज्यांचा उल्लेख करीत आहेत व ज्यांच्या मुळे महाराष्ट्र राज्याला एक सुवर्ण संधी मिळण्याचा योग जुळत असताना, गडकरी यांना जाती पातीच्या राजकारणात राजकीय व जाती पातीचे मुठभर पोटभरू नेते कसे काय अडकवू शकतात ? असा सवाल तिवारी यांनी केला आहे.
विदर्भ मरावाड्यातील शेतकरी - शेतमजूर हवालदिल झाला आहे. ज्या नितीन गडकरी यांनी कधीही धर्म वा जातीचे राजकारण केले नाही , अश्या सर्वमान्य नेत्याला राष्ट्रीय पातळीवर सर्वोच्च पदावर विराजमान करून, खऱ्या अर्थाने विदर्भ मराठवाडयातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन जाती व धर्म विसरून गडकरी यांना पाच लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून देण्याची गरज तिवारी यांनी व्यक्त केली आहे. 
 राजकीय नेत्यांनी हा आपला उपद्व्याप त्वरित बंद करावा, या साठी चांगल्या कार्यकर्त्याला बळीचा बकरा करू नये, जनता कधी माफ करणार नाही, असे मत तिवारी यांनी व्यक्त केले. 
इतिहास बघा - नितीन गडकरी यांनी  कधी जाती विरोध किंवा धर्म विरोध केला का ? नागपूर मनपात बहुजन  समाजाची ५० पेक्षा जास्त नगरसेवक गडकरी यांच्या प्रयत्नाने निवडून यावेत, ज्या बहुजन समाजाचा राजकीय नेते वास्ता देत आहेत , त्या बहुजन समाजाची ६५  पेक्षा जास्त आमदार आणि आठ पेक्षा जास्त खासदार चक्क सर्वसाधारण मतदारसंघातून निवडून आणण्यात गडकरी यांचा सिंहाचा वाटा असताना, फक्त जाती धर्माच्या नावावर मते गठ्ठा करण्यासाठी समाजाचा दुरुपयोग व्हावा, ही एक फार मोठी विडंबना आहे. 
ज्या गडकरी यांनी विदर्भ मराठवाड्यातील लाखो रुग्णासाठी आरोग्य मिशन सतत चालवून ८ लाख पेक्षा मोती बिंदू ऑपरेशन, अपंग कल्याण, कर्करोग व  क्षय रोग निदान उपचार शिबिरे आणि सिकल्सेल या दुर्धर आजाराने ग्रस्त हजारो रुग्णाची केलेली अव्याहत सेवा तसेच नागपूरात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान आणून उल्लेखनीय काम केले. त्याचे सातत्य कायम राहील या साठी सर्वांनी धर्म व जात विसरून काम करणे गरजेचे असताना काही मुठभर राजकीय नेत्यांनी गडकरी का विरोध करण्यासाठी धर्म व जातीचे राजकारण करणे क्लेश दायी आहे.  विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व बेरोजगार यांचे भल्या साठी गडकरी यांना पाठबळ द्यावे, जेणे करून महाराष्ट्राला गडकरी यांच्या अथक प्रयत्नाने मिळालेले राष्ट्रीय पातळी वरील नेतृत्व अधिक दैदित्यमान होवू शकेल, अशी आशा तिवारी यांनी व्यक्त केली आहे.
************
किशोर तिवारी, 
अध्यक्ष, 
विदर्भ जनआंदोलन समिती
९४२२१०८८४६
kishortiwari@gmail.com

Monday, March 25, 2019

कृषी संकटावर तोडगा द्या अन्यथा महाराष्ट्रातील २६ लोकसभा मतदारसंघांत शेतकरी व मजुरांची मते मिळणार नाहीत -किशोर तिवारी

कृषी संकटावर तोडगा  द्या अन्यथा  महाराष्ट्रातील २६ लोकसभा मतदारसंघांत शेतकरी व  मजुरांची मते मिळणार नाहीत -किशोर तिवारी 
दिनांक -२५ मार्च २०१९
राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीप्रमाणे महाराष्ट्रातही शेतकरी व शेतमजूर वर्ग पारडे फिरवू शकताे. महाराष्ट्रातील शेतकरीबहुल २४ ते २६ मतदारसंघांत शेतकऱ्यांची मते निर्णायक ठरणार असे भाकीत शेतकरी नेते किशोर तिवारी व्यक्त केले असुन, शेतकरी व शेतमजुरांना जातीच्या समीकरणात ठेवणाऱ्या राजकीय पक्षांना २०१९ राष्ट्रीय निवडणुकीमध्ये जर कृषी समस्यांचे मूळ कारण शेतीमालाचा भाव ,बँकांचे पतपुरवडा धोरण ,नगदी व डाळीच्या तसेच तेलांच्या पिकांना देशात भावाचे कवच ,ग्रामीण भागात रोजगाराचे निर्मिती करणारे उपाय यावर देणाऱ्या राजकीय पक्षांनाच ग्रामीण भागात मतदार होणार अशी असा विश्वास तिवारी यांनी प्रगट केला आहे . 
येत्या निवडणुकीमध्ये शेतीमालाला हमीभाव, शेतकऱ्यांसाठी सन्मान योजना, कर्जमाफी हे केंद्र व राज्य सरकारच्या प्रचारातील महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत. स्वामीनाथन समितीच्या शिफारशीनुसार शेतीमालाला हमीभाव देऊ, असे आश्वासन २०१४ च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले होते. प्रत्यक्षात ४ वर्षांनंतर मोदींनी शेतीमालाच्या हमीभावाची घोषणा केली. परंतु त्यात उत्पादन खर्चाचे अपुरे धरलेले निकष आणि तो भाव मिळावा यासाठी आवश्यक यंत्रणेचा अभाव यामुळे शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ झालाच नाही.  याकडे लक्ष देण्याची विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे . 
बुलेट-मेट्रो ट्रेन, बालाकोट स्ट्राइकचा ग्रामीण मतदानावर मोठा परिणाम होईल, असे सरकारला वाटत आहे. मात्र, त्याचा प्रभाव शहरी भागातच असेल. मी मराठवाडा-विदर्भातील ५ हजार खेड्यांच्या संपर्कात आहे. शेतकऱ्यांत प्रचंड नाराजी आहे ही नाराजी दूर करण्यात राजकीय पक्ष यशस्वी झाले नाहीतर २४ ते २६ मतदारसंघात याचा धडा शेतकरी शिकवल्याशिवाय राहणार नाहीत कारण सरकारचा फोकसच शहरी मतदार असल्याने त्यांनी शेतकऱ्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे असा समज ग्रामीण भागात आहे  त्याचा प्रत्यय या निवडणुकीत निश्चित येईल कारण शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अनेक योजना आणल्या. दुष्काळ व शेतकऱ्यांच्या रेटा वाढल्यानंतर कर्जमाफी द्यावी लागली. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालेला नाही, यावर गंभीरपाने विचार करण्याची गरज तिवारी यांनी व्यक्त केली. 
=============================================================

Thursday, March 21, 2019

शिवसेनेच्या मुख्यपत्राने भाजपच्या कुबड्या घेतल्यावर वलग्ना करणे अकालनीय - किशोर तिवारी

शिवसेनेच्या मुख्यपत्राने भाजपच्या कुबड्या घेतल्यावर वलग्ना करणे  अकालनीय - किशोर तिवारी 
दिनांक -२२ मार्च २०१९
एकीकडे महाराष्ट्रात भाजपसोबत लोकसभेच्या निवडणुकीसाठी युती केल्यावर दिनांक २१ मार्चचा सामनामध्ये शिवसेनेप्रमुख यांच्या तोंडात आपले विष सोडणाऱ्या संजय राऊत यांनी गोव्याच्या राजकारणावर व नितीन गडकरी यांनी नवीन मुख्यमंत्रीपदाचा पदभार सहज चर्चेने प्रमोद सावंत यांच्याकडे दिल्यावर व त्यांनी एकाच दिवसात बहुमत सिद्ध केल्यावर सामनामध्ये  अग्रलेख लिहून भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नव्याने असंतोष भरला आहे हे सगळा उपद्रव उद्धव ठाकरे यांची संयमी व सवेंदनशील प्रतिमेला बारामतीच्या सल्ल्याने संजय राऊत सतत मलीन करीत असल्यामुळे शिवसेना प्रमुखांनी या मातोश्रीच्या चाणक्याला लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत विश्राम देण्याचा सल्ला विदर्भातील शेतकरी नेते व उद्धव ठाकरे यांचे जुने मित्र किशोर तिवारी यांनी दिला आहे . 
दिनांक २१ मार्चच्या सामनाच्या  अग्रलेखात संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या तोंडात टाकून म्हटले आहे की "एकीकडे  मनोहर पर्रीकर यांचे पार्थिव अनंतात विलीन झाले, पण त्यांच्या देहाची राख गोमंतकच्या भूमीत विलीन होण्याआधीच सत्ता-खुर्चीचा लाजीरवाणा खेळ सुरू झाला व अखेर हपापलेल्या बोक्याप्रमाणे आपापला वाटा घेऊन हा खेळ सोमवारी मध्यरात्रीनंतर संपला. गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून सोमवारी मध्यरात्री प्रमोद सावंत यांनी शपथ घेतली, तर विजय सरदेसाई व सुदिन ढवळीकर हे दोन उपमुख्यमंत्री म्हणून नेमले जाणार आहेत. लोकशाहीचा हा खेळखंडोबाच म्हणावा लागेल. पर्रीकरांच्या चितेची आग विझेपर्यंत तरी थांबायला हवे होते."  असे म्हटले व सोबतच असांसदीय भाषेमध्ये भाजपला जाहीरपणे शिव्या देण्यात आल्या आहेत असे मित्रपक्ष व त्यांचे असे अनाहूत मित्रपक्ष प्रेम निवडणुकीच्या वेळेस शिवसेनेच्या अनेक  निष्क्रिय खासदार वारंवार लादून उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या कुबड्या घेऊन उभे केले त्यांना निवडणूक कठीण करीत आहे कारण विदर्भ मराठवाड्यात अनेक ठिकाणी खासदारांना वारंवार उभे केल्याने प्रचंड असंतोष आहे  त्यातच हा शहाणपणा घातक असल्याचे  सत्य या मातोश्रीच्या चाणक्यांना कोण सांगणार  असा सवाल किशोर तिवारी यांनी केला आहे . 
डिसेंबर महीन्यात पंढरपूर येथे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना 'चौकीदार चोर आहे'  असे बोला असा सल्ला सुद्धा याच मातोश्रीच्या चाणक्यांनी दिला होता त्यामुळेच युती झाल्यावर   'शिवसेना चोरावर मोर' आहे का? असा सवाल  विरोधकांनी केला . मागील पाच वर्षात  शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या तोंडात अनेक अकालनीय भाजपविरोधी  विषयावर विष ओतणारे शब्द टाकून अग्रलेख लिहण्याचा गोरखधंद्याने केंद्रात व राज्यात शिवसैनिकांची जनतेची कामे करण्यास प्रचंड अडचणी आल्या त्यातून शिवसैनिकांमध्ये असंतोष आहे मात्र जमिनीच्या कार्यकर्त्यांची काळजी नसलेल्या मुंबईत वातानुकूल खोलीत सुपारी घेऊन काड्या करणाऱ्या  मातोश्रीच्या चाणक्यांना कसे समजणार असा सवालही किशोर तिवारी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना केला आहे . 
=====================================================================


Wednesday, March 20, 2019

निवडणुकीच्या धामधुमीत दुष्काळग्रस्त जनता पाणी, चारा ,काम व मदतीपासून वंचित-किशोर तिवारी

निवडणुकीच्या धामधुमीत  दुष्काळग्रस्त जनता पाणी, चारा ,काम व  मदतीपासून वंचित-किशोर तिवारी 
दिनांक -२०  मार्च २०१९
लोकसभा निवडणुकीच्या नावावर अधिकारी कर्मचारी दुष्काळग्रस्त विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी व शेत मजुरांना पिण्याचे पानी,गुरांना चारा ,अन्न सुरक्षा ,आरोग्य सुरक्षा ,रोजगार  व नवीन पिककर्ज इत्यादी मदत व रोजगार हमीची कामे नीवडणुकीचे काम समोर करून उपल्बध करून देण्यास टाळाटाळ करीत असुन या विषयीच्या प्रचंड तक्रारी  विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी व शेतमजूर करीत असुन अधिकारी व कर्मचारी आदर्श आचारसंहितेचा नावावर लोकप्रतिनिधींचे एकात नसल्यामुळे  उच्चं न्यायालयाच्या निर्णयानंतर मदत व पुनर्वसनाच्या कामाना आदर्श आचारसंहितेचा नावावर निवडणूक आयोग रोखु शकत नसल्याने कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी  आज मुख्य निवडणूक आयुक्तांना चर्चा दुष्काळापेक्षा निवडणूक  महत्वाची असल्यास दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात पुढे ठकळण्याची मागणी केली आहे ,जर  दुष्काळग्रस्त विदर्भ व मराठवाड्यातील जिल्ह्यात दुष्काळग्रस्त  शेतकरी व शेत मजुरांचे पाणी व चारा तसेच मजुरीसाठी हाल होत असल्याच्या तक्रारी येत असल्यास आपण उच्चं न्यायालयात धाव घेणार असल्याची माहीतीही किशोर तिवारी यांनी यावेळी दिली . 
यापुर्वी मदत व पुनर्वसनाच्या कामाना आदर्श आचारसंहितेचा नावावर का रोखत आहात अशी विचारणा केल्यावर मस्तवाल कामचोर अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाचे कारण समोर केल्यामुळे किशोर तिवारी यांनी हा वाद निवडणूक आयोगापुढे नेल्यानतंर निणर्य झालेले सर्व  मदत व पुनर्वसनाच्या कामाना व पाणी ,चारा ,रोजगार हमी योजनेची कामे  आचारसंहितेचा नावावर रोखणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे द्यावी त्यांना तात्काळ निलंबित करण्यात येणार असल्याची माहीती दिली होती मात्र आजपर्यंत कोणालाही निवडणूक आयुक्तांनी निर्देश दिले   नसल्याचे किशोर तिवारी यांनी स्पष्ट केले . 

चारा व पाणी नसल्यामुळें विदर्भ व मराठवाड्यातील जिल्ह्यात दुष्काळग्रस्त  शेतकरी व शेत मजुरांना जनावरे मातीमोल किमतीत विकावी लागत असुन अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचा नावावर डोळे झाक करीत असल्याच्या प्रचंड तक्रारीं येत मात्र सारे राजकीय पक्ष निवडणुकीमध्ये गुंतले असुन दुष्काळग्रस्त  शेतकरी व शेत मजुरांना वाऱ्यावर सोडले आहे त्यातच रोजगार हमी योजनेची कामेच उपलब्ध नसल्यामुळे प्रचंड उपासमार होत असल्याची खंत किशोर तिवारी यांनी व्यक्त केली . 
=================================================

Saturday, March 16, 2019

Parties should not take Farmers for Granted: Kishore Tiwari-TIMES OF INDIA

Parties should not take Farmers for Granted: Kishore Tiwari-TIMES OF INDIA

TNN | Mar 17, 2019, 04.21 AM IST
Nagpur: Kishore Tiwari, farm activist and chairman of Vasantrao Naik Sheti Swavalamban Mission, has warned all political parties not to take farmers for granted in the coming Lok Sabha elections.
The dryland farmer of Vidarbha and Marathwada would vote only for that party which comes out with a clear agenda on agrarian issues, he said.
Tiwari, who is engaged in drawing attention of the governments for the last three decades to farmers’ woes, said there is a perception that the BJP governments at the Centre and the state were more focused on urban-oriented Smart Cities, bullet train and Metro rail projects and not bothered about the unending farm crisis that forces thousands of farmers to commit suicide every year.
Tiwari acknowledged Modi government’s launching of Pradhan Mantri Kisan Samman Nidhi through which small farmers with less than 2-hectare holding would get Rs6,000 a year, of which first instalment of Rs2,000 has already been transferred as a relief.
But he said it was time to address core issues like granting special aid to those taking to non-chemical organic farming and helping cause of environment. There is a need to shift to an easy five-year farm credit cycle granting 70% of prevailing price of land holding, he said.

“Only a party coming out with out-of-the-box solutions and permanent remedies for the crisis on farm front would get the vote. No farmer of Vidarbha and Marathwada is likely to vote blindly without ensuring benefits accruing to him from the elections,” said Tiwari.
==========================================

ग्रामीण जनतेच्या मागण्यावर भाजपने भूमिका स्पष्ट करावी- मोदींच्या नावावर निष्क्रिय खासदारांनी निवडणूक जिंकण्याचे स्वप्न पहाणे चुकीचे -किशोर तिवारी

ग्रामीण जनतेच्या  मागण्यावर भाजपने भूमिका स्पष्ट करावी- मोदींच्या नावावर निष्क्रिय खासदारांनी निवडणूक जिंकण्याचे स्वप्न पहाणे चुकीचे   -किशोर तिवारी 
दिनांक -१६ मार्च २०१९
भाजप सरकारच्या विकासाचा बिंदू शहरीकरणावर व स्मार्ट सिटी ,बुलेट ट्रेन ,मेट्रो ट्रेनवर  एकत्रित झाला होता अशी ओरड होत आहे त्यातच  ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या पुनर्जिवीत करण्यासाठी कोरडवाहू शेतकऱ्यांच्या शेतीचा लागवडीचा खर्च कमी करण्यासाठी सरळ अनुदान ,शेतीमालाचा भाव ,सर्व शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज विनाशर्त पंचवार्षिक तत्वावर जमिनीच्या किमतीच्या ७० टक्के देण्यात यावे , अन्नाची शेती करण्यासाठी पीकपद्धती बदलण्यासाठी सुधारणावादी धोरणे राबविण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार कमी पडल्याची प्रचंड ओरड शेतकरी व शेतमजूर  असल्याने भाजपने   ग्रामीण अर्थनीती स्पष्ट करावी अशी मागणी कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे . 
सध्या भाजपला पर्याय नसल्याने वारंवार निष्क्रिय खासदार त्यातच गेली पाच वर्ष दररोज सकाळ   संध्याकाळ केंद्र व राज्य सरकारला शिव्या देणाऱ्या त्यातच सरकारमध्ये  सत्ता लुटणाऱ्या पक्षाच्या पक्षाला कोणत्याही भविष्याचा विचार करता जाती व धर्माच्या नावावर डोळ्याला पट्टीबांधून मतदान करतील असा अहंकार व विश्वास ठेवणे धोक्याचे असल्याचे मत किशोर तिवारी यांनी व्यक्त केले आहे . 
किशोर तिवारी हे विदर्भातील कोरडवाहू आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या हिताकरिता मागील ३० वर्षांपासून चळवळ करीत आहेत त्यांनी ग्रामीण विदर्भ मराठवाडयातील शेतकरी -शेतमजुरांचे प्रमुख आर्थिक प्रश्न सतत रेटले आहेत .सतत ग्रामीण जनतेच्या समस्या व शेतकरी आत्महत्या या प्रश्न्नावर सतत रान उठवीत  २००८च्या राष्ट्रीय कर्जमाफीनंतर त्यांनी २००९मध्ये काँग्रेसला पाठिंबा दिला होता मात्र काँग्रेसने हमीभाव ,पतपुरवडा ,ग्रामीण रोजगार ,पीकपद्धतीमध्ये बदल यासारख्या प्रमुख मागण्या नाकारल्यामुळे २०१४मध्ये भाजपला पाठिंबा दिला होता मात्र स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी ,पिककर्जमाफी ,ग्रामीण रोजगार ,पतपुरवडाधोरण याबाबत शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होत नसुन यावर प्रामाणिक प्रयन्त करण्याची  आवश्यकता असतांनाही राजकीय पक्ष जातीय समीकरण मांडत असल्याची खंत व्यक्त केली शिवसेनेने मागील ५ वर्ष सतत विरोधी पक्षाची भूमिका घेत मुद्देसूद संघर्ष केला मात्र आता शेतीमालाचा भाव ,सातबारा कोरा करून सर्व शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज यावर भाजपकडून दिलेल्या आश्वासनाची माहीती मतदारांना देण्याची गरज असुन पर्याय नसल्याने लोक आपणास निवडणून देतील हा समज चुकीचा असल्याचे मत किशोर तिवारी यांनी व्यक्त केले आहे . 

"आपणास शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने मंत्रिपद देऊन सल्ले देण्यास  नियुक्त केले मात्र शेतीचे सर्व सल्ले सरकारला रासायनिक कीटकनाशक ,जैविक बियाणे व कृषी व आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचं देतात अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली .  खुली  अर्थव्यवस्था स्वीकारणाऱ्या भारतात विश्व व्यापार संघटनेच्या करारानुसार सर्व सरळ वा इतर मार्गाने देण्यात शेत असलेले अनुदानात कपात करणाऱ्या सरकारने यावर्षी  नगदी अनुदान देण्याची ऐतिहासिक सुरवात केली असुन आता याला सकारात्मक टोकाला घेऊन जाणे अत्यन्त गरजेचे असुन मात्र सर्व राजकीय पक्ष मूळ प्रश्नाला  हात लावावा यासाठी निवडणुकीच्या वेळेस सत्तेचा तुकडा न पाहता तळमळीने प्रयन्त करणे काळाची गरज असल्याचे मत   किशोर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केले आहे  . 
 . 
=====================================================

Thursday, March 14, 2019

विदर्भ मराठवाड्याचे कोरडवाहू दुष्काळग्रस्त शेतकरी -शेतमजुर ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या मागण्या पूर्णकरणाऱ्या पक्षांच्या सोबत राहतील -किशोर तिवारी

विदर्भ मराठवाड्याचे  शेतकरी -शेतमजुर ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या मागण्या पूर्णकरणाऱ्या पक्षांच्या सोबत राहतील -किशोर तिवारी 
दिनांक -१४ मार्च २०१९
आज विदर्भ मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या पुनर्जिवीत करण्यासाठी कोरडवाहू शेतकऱ्यांच्या शेतीचा लागवडीचा खर्च कमी करण्यासाठी सरळ अनुदान ,शेतीमालाचा भाव ,सर्व शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज विनाशर्त पंचवार्षिक तत्वावर जमिनीच्या किमतीच्या ७० टक्के देण्यात यावे , ७० टक्के प्रदूषण रासायनिक शेतीमुळे होत असुन हरीत क्रांतीच्या नावावर मातीच्या कणाकणात व पाण्याच्या प्रत्येक थेंबात विष ओतणाऱ्या रासायनिक कीटकनाशक व खतांमुळे झाले असुन जगात मूठभर भांडवलदार देशानी पर्यावरणाचे व जीवसृष्टीचे अतोनात नुकसान कमी करण्यासाठी अन्नाची शेती करण्यासाठी पीकपद्धती बदलण्याची प्रमुख मागणी तसेच ग्रामीण शेतमजूर महिला बचत गटांची शेतकऱ्यांना देण्यात आल्यासारखी कर्जमाफी देण्याची प्रमुख मागण्या भाजपसह कोणत्याही राजकीय पक्षाने निवणुकीनंतरची आपली ग्रामीण अर्थनीती स्पष्ट न केल्याने कोणत्याही पक्षाने विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी व शेतमजुरांच्या मतांची जातीच्या आधारावर आपली अधिकारशाही दाखविणें चुकीचे ठरणार असुन आता भाजपसह सर्व प्रमुख पक्षांनी आपले धोरण जाहीर करावे अशी मागणी कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे . 
किशोर तिवारी हे विदर्भातील कोरडवाहू आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या हिताकरिता मागील ३० वर्षांपासून चळवळ करीत आहेत त्यांनी ग्रामीण विदर्भ मराठवाडयातील शेतकरी -शेतमजुरांचे प्रमुख आर्थिक प्रश्न सतत रेटले आहेत .सतत ग्रामीण जनतेच्या समस्या व शेतकरी आत्महत्या या प्रश्न्नावर सतत रान उठवीत  २००८च्या राष्ट्रीय कर्जमाफीनंतर त्यांनी २००९मध्ये काँग्रेसला पाठिंबा दिला होता मात्र काँग्रेसने हमीभाव ,पतपुरवडा ,ग्रामीण रोजगार ,पीकपद्धतीमध्ये बदल यासारख्या प्रमुख मागण्या नाकारल्यामुळे २०१४मध्ये भाजपला पाठिंबा दिला होता मात्र स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी ,पिककर्जमाफी ,ग्रामीण रोजगार ,पतपुरवडाधोरण याबाबत शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होत नसुन यावर प्रामाणिक प्रयन्त करण्याची  आवश्यकता असतांनाही राजकीय पक्ष जातीय समीकरण मांडत असल्याची खंत व्यक्त केली शिवसेनेने मागील ५ वर्ष सतत विरोधी पक्षाची भूमिका घेत मुद्देसूद संघर्ष केला मात्र आता शेतीमालाचा भाव ,सातबारा कोरा करून सर्व शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज यावर भाजपकडून दिलेल्या आश्वासनाची माहीती मतदारांना देण्याची गरज असुन पर्याय नसल्याने लोक आपणास निवडणून देतील हा समज चुकीचा असल्याचे मत किशोर तिवारी यांनी व्यक्त केले आहे . 

"आपणास शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने मंत्रिपद देऊन सल्ले देण्यास  नियुक्त केले मात्र शेतीचे सर्व सल्ले सरकारला रासायनिक कीटकनाशक ,जैविक बियाणे व कृषी व आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचं देतात अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली .  खुली  अर्थव्यवस्था स्वीकारणाऱ्या भारतात विश्व व्यापार संघटनेच्या करारानुसार सर्व सरळ वा इतर मार्गाने देण्यात शेत असलेले अनुदानात कपात करणाऱ्या सरकारने यावर्षी  ऐतिहासिक सुरवात केली असुन आता याला सकारात्मक टोकाला घेऊन जाणे अत्यन्त गरजेचे असुन मात्र सर्व राजकीय पक्ष मूळ प्रश्नाला  हात लावावा यासाठी निवडणुकीच्या वेळेस सत्तेचा तुकडा न पाहता तळमळीने प्रयन्त करणे काळाची गरज असल्याचे मत   किशोर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केले आहे  . 
 विदर्भ व मराठवाड्याच्या कोरडवाहू शेतकऱ्यांना २ हेक्टर ची मर्यादा न ठेवता सिक्कम प्रमाणे धान्य ,डाळ व तेलबियाणे तसेच नैसर्गिक शेतीसाठी  सरसकट देण्याची मागणी  व सरकारने  तेलंगाणा सरकारप्रमाणे रयतबंधू योजनेसारखी सरसकट संपुर्ण जमीनधारणेच्या नुसार प्रेतिहेक्टरी प्रति हंगाम रु ६००० रोजगार हमी योजनेच्या मदतीने द्यावी या  मागणीवर आपण भाजप काँग्रेससह सर्व पक्षांशी चर्चा करणार असल्याची माहीती  किशोर तिवारी यांनी यावेळी दिली  . 

========================================================

Monday, March 11, 2019

आचारसंहितेच्या नावावर दुष्काळग्रस्त ग्रामीण जनतेला मदतीपासून वंचित ठेऊ नका -किशोर तिवारी

आचारसंहितेच्या नावावर दुष्काळग्रस्त ग्रामीण जनतेला मदतीपासून वंचित ठेऊ नका -किशोर तिवारी 
दिनांक -१२ मार्च २०१९
येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचा अतिरेक  करीत अधिकारी दुष्काळग्रस्त विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी व शेत मजुरांना अन्न सुरक्षा ,आरोग्य सुरक्षा ,रोजगार ,पाणी ,चारा व नवीन पिककर्ज इत्यादी मदत व पुनर्वसनाच्या कामावर बंधने टाकणाऱ्या व निवडणुकीचे काम समोर करून दुष्काळग्रस्त विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी व शेत मजुरांचे हाल करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत देत उच्चं न्यायालयाच्या निर्णयानंतर मदत व पुनर्वसनाच्या कामाना आदर्श आचारसंहितेचा नावावर निवडणूक आयोग रोखु शकत नसल्याने कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी  आज मुख्य निवडणूक आयुक्तांशी चर्चा केल्यावर दिले . 
अनेक दुष्काळग्रस्त विदर्भ व मराठवाड्यातील जिल्ह्यात दुष्काळग्रस्त  शेतकरी व शेत मजुरांचे पाणी व चारा तसेच मजुरीसाठी हाल होत असल्याच्या तक्रारी आल्यावर मदत व पुनर्वसनाच्या कामाना आदर्श आचारसंहितेचा नावावर का रोखत आहात अशी विचारणा केल्यावर मस्तवाल कामचोर अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाचे कारण समोर केल्यामुळे किशोर तिवारी यांनी हा वाद निवडणूक आयोगापुढे नेल्यानतंर निणर्य झालेले सर्व  मदत व पुनर्वसनाच्या कामाना आचारसंहितेचा नावावर अधिकाऱ्यांची नावे द्यावी त्यांना तात्काळ निलंबित करण्यात येणार असल्याची माहीती देण्यात आल्याचे तिवारी यांनी स्पष्ट केले . 

चारा व पाणी नसल्यामुळें विदर्भ व मराठवाड्यातील जिल्ह्यात दुष्काळग्रस्त  शेतकरी व शेत मजुरांना जनावरे मातीमोल किमतीत विकावी लागत असुन अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचा नावावर डोळे झाक करीत असल्याच्या प्रचंड तक्रारीं येत मात्र सारे राजकीय पक्ष निवडणुकीमध्ये गुंतले असुन दुष्काळग्रस्त  शेतकरी व शेत मजुरांना वाऱ्यावर सोडले आहे त्यातच रोजगार हमी योजनेची कामेच उपलब्ध नसल्यामुळे प्रचंड उपासमार होत असल्याची खंत किशोर तिवारी यांनी व्यक्त केली . 
=================================================

Friday, March 8, 2019

यवतमाळच्या वाघाडी नदीसाठी ९८५ कोटींची पुनरुज्जीवन योजना सिंचन क्षेत्रासाठी एक क्रांतीकारक पाऊल -किशोर तिवारी

यवतमाळच्या वाघाडी नदीसाठी ९८५ कोटींची पुनरुज्जीवन योजना सिंचन क्षेत्रासाठी एक  क्रांतीकारक पाऊल -किशोर तिवारी 
दिनांक ९ मार्च २०१९
शाश्वत शेतीसाठी सिंचन आवश्यक आहे. त्यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री ना हंसराज अहिर यांच्या सतत पाठपुराव्याने व माजी खासदार विजय दर्डा  पुढाकाराने  महाराष्ट्र  शासनाने नदी पुनरुज्जीवनाचा सात वर्षीय प्रकल्प हाती घेतला घेऊन  त्याची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यातील वाघाडी नदीपासून करण्यात येणार येत असुन नुकतेच  वाघाडी पुनरुज्जीवनाच्या ९८५ कोटींच्या प्रकल्प आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निधी उपलब्ध करून दिला असुन  या प्रकल्पातून नदी काठावरील ३० हजार शेतकऱ्यांचे उत्पन्न पाचपट होणार असुन या नदी पुनरुज्जीवनाच्या प्रकल्प एक कृषी क्षेत्रातील ऐतिहासिक पाऊल असुन यामुळे वाघाडी प्रकल्प वाघाडी नदी  बारमाही वाहती करण्यास क्रांतिकारक असल्याचे मत शेतकरी नेते किशोर तिवारी म्हटले आहे . 
चांगल्याकामाचे कौतुक झालेच पाहीजे त्याचवेळी चुकीच्या निर्णयावर कानउघाडणी केलीच पाहीजे अशी आपली भूमिका आहे कारण यवतमाळ जिल्ह्यातील वाघाडी ही महत्त्वाची नदी यवतमाळ, कळंब, घाटंजी तालुक्यातून वाहते. पैनगंगेची उपनदी असलेली वाघाडी पुढे गोदावरी नदीला जाऊन मिळते. उन्हाळ्यातील चार महिने आणि इतरही काही महिन्यांत ही नदी कोरडी पडते. ती बारमाही वाहती राहावी यासाठी इशा फाउंडेशनने काही दिवसांपूर्वी सर्व्हे करून पुनरुज्जीवनाचा आराखडा शासनास सादर केला होता ,ईशा फाउंडेशनचे सद्गुरू जग्गी वासुुदेव यांनी देशभरात ‘रॅली फॉर रिव्हर’ प्रकल्प सुरू केला आहे. त्या अंतर्गतच वाघाडीचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे व  प्रकल्प आराखडा  सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या उपस्थितीत राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सादर करण्यात आला होता . केंद्रीय गृहराज्यमंत्री ना हंसराज अहिर यांच्या सतत पाठपुराव्याने व माजी खासदार विजय दर्डा  पुढाकाराने  शासनाने प्रकल्पाला हिरवी झेंडी दाखविली असून आता कामही सुरु झाल्याचे किशोर तिवारी म्हटले आहे . 
सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी भारतातील नद्यांच्या शोचनीय अवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी १६ राज्यांमधून ९,३०० किमीची रॅली काढून ‘रॅली फॉर रिव्हर’ मोहीम २०१७ सप्टेंबरमध्ये सुरू केली. त्यानंतर त्यांनी नद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या योजनेचा आराखडा पंतप्रधानांना सादर केला. त्यानंतर ज्या सहा राज्यांनी या मोहिमेअंतर्गत नदी पुनरुज्जीवनाचे सामंजस्य करार केले होते त्यात महाराष्ट्र पहिले राज्य होते यासाठी किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे अभनंदन केले आहे .  या प्रकल्पामध्ये  वाघाडी नदीच्या काठावर  परिसरात झाडांची संख्या वाढविणार येणार आहे  यात प्रामुख्याने फळझाडे लावली जाणार सोबतच नदी काठावरील गावांमध्ये जनजागृती करन्यात येणार आहे  व नदी काठावरील शेतकºयांना सेंद्रिय शेतीसाठी प्रवृत्त केले जाणार आहे व पारंपरिक पिकांपेक्षा फळशेती, सामूहिक शेती करण्यास प्रवृत्त करणार सोबतच शेतकरी उत्पादन संस्था स्थापन करून फळांची विक्री केली जाणार आहे यासाठी पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती मिशनचे अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी संपुर्ण सहकार्य सद्गुरू जग्गी वासुदेव यांना देण्याचे आश्वासन दिले असल्याची माहीती किशोर तिवरो यांनी दिली . 

Wednesday, March 6, 2019

तुरीची व हरभऱ्याची  हमीभावापेक्षा कमी भावात विक्री -शेतकरी मिशनने नाफेडच्या खरेदीकरीता दिल्ली गाठली  
दिनांक - ६ मार्च २०१९
एकीकडे केंद्रीय सरकार अर्थसंकल्पात  शेतकऱ्यांसाठी व देशातील
कृषी संकटाला समाप्त करण्याचा सुतोवात केल्यांनतर यावर मोठ्याप्रमाणात चर्चेला ऊत आला आहे मात्र विदर्भ व मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कापुस सोयाबीनच्या नापिकीनंतर जगण्याचा आधार असलेले तूर व हरभऱ्याचे भाव नाफेडची सरकारी खरेदी  सुरु न झाल्यामुळे सध्या तुरी बाजारात रु ४८५० तर हरभरा रु ३७५० दराने विकला जात आहे सरकारने तुरीचा हमीभाव रु ५६५० तर हरभऱ्याचा हमीभाव रु ४४५० प्रति क्वि. घोषीत केल्यांनतर सरकारच्या नाफेड या खरेदीकरणाऱ्या एजन्सीने महाराष्ट्रात खरेदी सुरु न केल्यामुळे शेतकऱ्यांचे तुरीवर प्रति क्वि.सरासरी ८०० रुपये तर हरभऱ्यावर प्रति क्वि.सरासरी ७०० रुपये नुकसान होत असुन राज्यातील जबाबदार अधिकारी यांच्या उदासीन धोरणामुळे ही परीस्थिती निर्माण झाली आहे असा आरोप शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते  व महाराष्ट्राच्या कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष  किशोर तिवारी यांनी केलं असुन आता ७ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दाद मागणार असल्याची माहीती किशोर तिवारी यांनी दिली .  

केंद्र सरकारच्या नाफेड या तुर खरेदी करणाऱ्या संस्थेने एकही खरेदी केंद्र सुरु न केल्याने आर्थिक अडचणी असणारे शेतकरी सरासरी ४ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलने विकत असुन हीच तुर नाफेडला ५६५० रुपयाला  हमीभावात विकण्यासाठी व्यापारी नोंदणी करीत आहेत असाच प्रकार हरभऱ्यात होत आहे  हा सर्व  प्रकार शेतकऱ्यांचे  उत्पन्न दुपट्ट नाहीतर अर्धे करणारा असुन लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा अन्याय लोकप्रतिनिधी का सहन करीत आहेत असा सवाल करीत सारेच्या सारे निवडणूक निधीसाठी व्यापाऱ्यांच्या दारावर लोटांगण टाकीत आहेत काय असा सवालही तिवारी यांनी केला आहे . 
सिंचन, वीजपुरवठा, ग्रामीण रोजगार, योग्य बाजार आणि पतपुरवठा यासारख्या क्षेत्रामध्ये पद्धतशीर संस्थात्मक  नियोजन गुंतलेले नाही. संस्थात्मक वित्तपुरवठा पुरेसा उपलब्ध नाही आणि सरकारद्वारा निर्धारित किमान खरेदीची  किंमत सर्वात गरीब व अडचणीच्या  शेतकर्यांपर्यंत पोचत नाही. मध्यम शेतकरी आणि शेतकर्यांचा आर्थिक शोषण रोखण्यासाठी होणारे सर्व प्रयन्त  दलालांचा पोषण करण्यासाठीच चालविण्यात येत असल्याचा अनुभव येत असल्याचा गंभीर आरोपच शेतकरी मिशनने करीत   या कृषी मालाच्या खरेदीच्या पद्धतीवर किशोर तिवारी प्रश्न उपस्थित केले असुन यावर शेतकऱ्यांच्या कृषीमालाला रास्त भाव व बाजाराकडुन होणारी लुट रोखण्यासाठी तात्काळ सुधारणेची मागणी तिवारी यांनी केली आहे  .
शेतकरी मिशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी  सरकारच्या वतीने  शेतकऱ्यांच्या आर्थिक  स्थिती सुधारण्याकरीता तसेच पंतप्रधानांच्या २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्ट करण्यासाठी सुरु असलेल्या प्रमुख कार्यक्रमात पंतप्रधान  पीक विमा योजना,  पंतप्रधान सिचाई योजना ,राष्ट्रीय  बाजार हस्तक्षेप मोहिम, वीज, पत ,जैव-संसाधने पुर्नजिवित करण्यासाठी होत असलेल्या  योजनां राष्ट्रीय कार्यक्रम जसे  सुधारित बियाणे या योजनांचे स्वागत करीत शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्यांच्या पार्श्वभुमीवर कर्जबाजारीपणा व कापुस ,सोयाबीन व तुरीच्या तोटक्या व प्रचंड तोट्यात नेणाऱ्या शेतीचा हवाला देत हमीभावाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी लाऊन धरली आहे . जोपर्यंत सरकार  लागवड खर्च अधिक ५०% टक्के नफा अशा  हमीभावाचे कवच शेतकऱ्यांना देणार नाही व बँकांची दरवाजे सक्ती सर्व शेतकऱ्यांना खुली करणार नाही तोपर्यंत शेतकरी आत्महत्या थांबणार नाही असा स्पष्ट इशारा किशोर तिवारी यांनी आपल्या निवेदनात दिला आहे 
महाराष्ट्राच्या विदर्भ व मराठवाड्याच्या आत्महत्याग्रस्त कोरडवाहु शेतकऱ्यांच्या कापुस ,तूर ,सोयाबीन या नगदी पिकांच्या उत्पादकांना आर्थिक संकटातुन वाचविण्यासाठी व त्यांच्या होत असलेल्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रा. एम.एस. स्वामिनाथन  यांच्या अध्यक्षतेखाली  राष्ट्रीय शेतकरी आयोगाच्या अहवालाच्या हमीभावाच्या शिफारशींवर ज्यामध्ये लागवड खर्च अधिक ५०% टक्के नफा असा निश्चित करण्याचा फार्मुला दिला होता त्याप्रमाणे हमीभाव देणे  तसेच  ब्रिटिशकालीन कृषी पिककर्ज वाटप बंद करून पंचवार्षिक  पत पुरवडा धोरण तात्काळ राबविणे काळाची गरज असतांना नीती निर्धारण करणाऱ्या संस्था यावर गंभीर नाहीत अशी खंत तिवारी व्यक्त केली . 
==============================================================

Saturday, March 2, 2019

अर्ली येथील पुरग्रस्तांचा व प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रलंबित प्रश्न निकाली लावणार -किशोर तिवारी यांची " गाव मुक्काम " कार्यक्रमात माहीती

अर्ली येथील पुरग्रस्तांचा व प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रलंबित प्रश्न निकाली लावणार -किशोर तिवारी यांची " गाव मुक्काम " कार्यक्रमात माहीती 
दिनांक -३ मार्च २०१९
यवतमाळ जिल्ह्यातील अर्ली येथील १०५ कुटुंबाचा २००७ पासुन प्रलंबित असलेला  पुनर्वसनाचा गंभीर प्रश्न कायम स्वरूपी पट्टे देऊन व त्यावर घरकुल वसाहत निर्माण करून येत्या पावसाळ्यापूर्वी निकाली काढू असे ठोस आश्वासन कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मशीनचे अध्यक्ष किशोर तिवारी अर्ली येथील गाव मुक्काम कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजीत सरकार आपल्यादारी कार्यक्रमात दिली .अर्ली येथील सरपंच पूजा कोवे  यांनी यावेळी पुरग्रस्तांचा वतीने हा विषय मांडला व या भागातील लोकनेते शिवारेड्डी येलट्टीवार ,अर्लीचे नरेंद रेड्डी या लावून धरल्यावर आपण या पुरग्रस्तांची परिस्थिती प्रतक्ष्य पाहल्यावर निर्णय घेणार असे सांगुन मागील १२वर्षांपासून ज्या आठवडी  बाजाराच्या शेड मध्ये हे सर्व लोक राहत आहेत त्या ठिकाणी प्रत्येक घराला भेट दिल्यानंतर आपणास शासनाचा प्रतिनिधी म्हणून लाज वाटत असुन येत्या ४ महीन्यात आपण स्थानीय लोकप्रतिनिधी व सरळ मुख्यमंत्रीच्या कार्यालयामार्फत सोडविणार असे स्पष्ट केल्यावर गावकऱ्यांनी तिवारी यांची सुटका केली . यावेळी आदीवासी नेते अंकित नैताम ,सरपंच पूजा कोवे ,जिल्हा परीषद सदयस गजानन बेजंकीवार ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गंगारेड्डी क्यातमवार ,भाजप नेते शिवारेड्डी पाटील येलटीवार ,नरेन्द्ररेड्डी अर्लीकर ,मायाताई बारहाते ,गजानन बोदूरवार ,डॉ दिलीप रेड्डी कुंटावार धनंजय झीलपिलवार ,किशोर रासमवार ,भूमण्णा सरलावार ,जितु मडावी ,वसंतराव कुरवते  ,हनमंतु कोवे ,लक्ष्मण कुरवते ,महादेव मामीडवार ,नरसय्या नागुलवार ,रमेश कोपुलवार .गंगाराम तांडेकर व पुनाजी टापरे  उपस्थित होते . 
प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रलंबित प्रश्न निकाली
मागील अनेक वर्षांपासून अर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व तेथील वसाहत सम्पूर्ण निकामी झाली असुन प्रचंड प्रमाणात दुरुस्तीचे काम आहे ,किशोर तिवारी यांच्या पाठपुराव्याने आता येत्या दोन महिन्यात दुरुस्तीचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मडावी यांनी दिली . अर्ली येथे फक्त एकच डॉक्टर असल्यामुळे आणी ते सुद्धा यवतमाळवरून येणे जाणे करतात त्यामुळे दोन डॉक्टर तात्काळ देण्याची मागणी यावेळी भाजप नेते शिवारेड्डी पाटील येलटीवार ,नरेन्द्ररेड्डी अर्लीकर यांनी केली मात्र अर्लीला डॉक्टर येतच नसल्याची माहीती यावेळी देण्यात आल्यावर आपण डॉक्टरांचा प्रश्न्न निकाली काढण्याचे आश्वासन किशोर तिवारी यांनी यावेळी दिले . 
वंचितांना अन्न 
अर्ली येथे ३० कुटूंबाना विभक्त झाल्यामुळे अन्न मिळत नसल्यामुळे तक्रार आल्यावर पुढील महिन्यापासून अन्न मिळणार अशी हमी किशोर तिवारी यावेळी तिवारी दिली ,संपूर्ण अर्ली गावात घाणीचे साम्राज्य असुन ग्रामसेवक कलेक्टरच्या पदाची परीक्षा देण्यात गुतंला असुन गट विकास अधिकारी एकदाही गावात आल्या आल्याची तक्रार सरपंच पुजा कोवे यांनी यावेळी केली त्यावर पंचायत समिती आपणच निवडली मात्र सभापतींनी लक्ष देण्याची विनंती करणार अशी माहीती किशोर तिवारी यांनी दिली . 
वन्यप्राणी ,अर्ली आंतरराज्य पुल व टिप्पेश्वर अभयारण्यासाठी  अर्ली-कोरेगाव (बंडल )गेट 
अर्ली वरून नांदेड तेलंगाणा आंतरराज्य बॅरेज -कम -पुलाचे काम लवकरच नितीन गडकरी यांचे मार्फत मार्गी लावण्याचे तसेच हा पूल झाल्यावर टिप्पेश्वर अभयारण्यासाठी  अर्ली-कोरेगाव (बंडल )गेट प्रस्तावीत करण्याचे तसेच वन्यप्राण्यांच्या शेतीला व नागरीकांना होत असलेल्या प्रचंड पिकांच्या व जीवितांचा मुद्दा यावेळी  शिवारेड्डी पाटील येलटीवार ,नरेन्द्ररेड्डी अर्लीकर यांनी उपस्थित केल्यावर आपली संपुर्ण बाजु नवीन वन्यप्राण्यांच्या शेतीला व नागरीकांना होत असलेल्या प्रचंड पिकांच्या व जीवितांचा नुकसान भरपाईसाठी तयार करण्यात येत असलेल्या कायदामध्ये करण्याचे आश्वासन किशोर तिवारी यांनी या वेळी दिले . नेहमीप्रमाणे संपूर्ण कार्यक्रमाला पांढरकवडा येथील सनदी अति जिल्हाधिकारी सौ भुवनेश्वरीदेवी यांनी कार्यक्रमाला आपली अनुपस्थिती नोंदविली व याची लिखीत तक्रार किशोर तिवारी यांनी मुख्यसचिव यांना सादर केली . 
===========================================================

Friday, March 1, 2019

"मागेल त्याला अन्न" योजनेत घुबडी येथे वंचित आदिवासींना शिधा पत्रिकेचे वाटप-प्रत्येक खेड्यात मोहीम राबविणार -किशोर तिवारी

"मागेल त्याला अन्न" योजनेत घुबडी येथे वंचित आदिवासींना शिधा पत्रिकेचे वाटप-प्रत्येक खेड्यात मोहीम राबविणार -किशोर तिवारी 
दिनांक -२ मार्च.२०१९ 

यवतमाळ जिल्ह्यातील अतिदुर्गम बारडतांडा पारधी बेड्यातुन महाराष्ट्र सरकारची प्रत्येक गरीबाला अन्न देणारी 'मागेल त्याला अन्न ' योजनेचा शुभारंभ झाल्यानंतर केळापूर तालुक्यातील येथे जिल्हा पुरवडा विभागामार्फत कोदोरी ,सुकंडी , चनाक्का ,रूढा ,खैरी ,वळवाट , धरमगोटा ,कारेगाव ,दर्यापुर , हिवरी ,पिंपळशेंडा पिठापोंगरी येथील अन्नापासून वंचित असणाऱ्या सर्व आदीवासी ,शेतकरी व शेतमजुरांचा 'मागेल त्याला अन्न ' योजनेचा कॅम्प आयोजीत करण्यात आला होता ,यावेळी जिल्हा पुरवडा अधिकारी शालीग्राम भराडी यांच्या नेतृत्वात पुरवडा नियंत्रक भारती सोनटक्के अन्न पुरवडा विभागाच्या सर्व चमूने रुख्मा किष्टु मडावी,भागुबाई मडावी ,बेबी सोन्या दडांजे,बयनाबाई  कुमरे, सविता शन्कर ,तुकीबाई दशरथ सर्व खैरी पोड ,अजंना महादेव तोडसाम,रूख्मा अयया दडांजे,विजया विठठल वाघाडे  ,काजल महादेव कोवे ,नर्मदा मुनेश्वर, रूख्मा अयया दडांजे सर्व घुबडी ,जिजा किसन वेटटी,लचुमबाई लच्मा व पार्वता जयवंत तोडसाम रा कारेगाव ब यान या कार्यक्रमात शिधावाटप पत्रिका शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी  यांच्या हस्ते देण्यात आल्या . 

आदीवासी नेते अंकित नैताम ,सरपंच पूजा कोवे ,जिल्हा परीषद सदयस गजानन बेजंकीवार ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गंगारेड्डी क्यातमवार ,भाजप नेते शिवारेड्डी पाटील येलटीवार ,नरेन्द्ररेड्डी अर्लीकर ,मायाताई बारहाते ,गजानन बोदूरवार ,डॉ दिलीप रेड्डी कुंटावार धनंजय झीलपिलवार ,किशोर रासमवार ,भूमण्णा सरलावार ,जितु मडावी ,वसंतराव कुरवते  ,हनमंतु कोवे ,लक्ष्मण कुरवते ,महादेव मामीडवार ,नरसय्या नागुलवार ,रमेश कोपुलवार .गंगाराम तांडेकर व पुनाजी टापरे  उपस्थित होते . 
यावेळी किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशाची माहीती देतांना विदर्भ व मराठवाड्यात एकही खेड्यातील शेतकरी व शेतमजूर अन्नापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रत्येक ब्लॉक स्तरावर 'मागेल त्याला अन्न ' योजनेचा एक भाग म्हणून अन्न सुरक्षा मेळावे आयोजीत करण्यात येणार आहेत . जिल्ह्यात पॉस मशीन लावल्यावर व आधार लिंकिंग करून महाराष्ट्र सरकारने अन्न सुरक्षा योजनांतर्गत नागरी पुरवडा विभागामार्फत सर्व गरीबांना देण्यात येणारे अन्न खुल्या बाजारात काळा बाजार करून विकणाऱ्या माफियांचा बंदोबस्त करण्याच्या मोहीमेमुळे आता 'मागेल त्याला अन्न ' व ज्या गरीबातल्या गरीब कुटूंबाना अंत्योदय योजना लागु करावी ह्या प्रधान सचिव महेश पाठक यांच्या सर्व जिल्हा पुरवडा अधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशावर हा  अंत्योदयचे अन्न खुल्या बाजारात काळा बाजार करून विकणाऱ्या माफियां दुकानदाराने सरकार महाराष्ट्रात अंत्योदय योजनाच गुंडाळत आहे अशा बातम्या प्रसारीत केल्यामुळें अन्न सुरक्षा  बंद करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही तसेच ही योजना विस्तारीत करीत असल्याची माहीती  किशोर तिवारी यांनी यावेळी दिली .
मागील तीन वर्षात शेतकरी मिशनने  १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त पश्चिम विदर्भ व  मराठवाड्यात ७० लाखावर सात बारा असणाऱ्या शेतकरी कुटुंबाना सरसकट २ रु किलो गहु व ३ रु किलो तांदुळ देणारी अन्न सुरक्षा योजना लागु केल्यानंतर आता ग्रामीण पश्चिम  विदर्भ व  मराठवाड्यात १०० टक्के अन्न सुरक्षा देण्यात आली असुन खेड्यातील एकही कुटुंब अन्नापासुन वंचित राहणार नाही याची हमी देण्यात आली आहे .महाराष्ट्रात अंत्योदय अन्न सुरक्षा योजनां प्रेत्येकाच्या घरापर्यंत नेण्याची  ग्वाही तिवारी यांनी यावेळी  दिली . 
======================================================