Tuesday, November 1, 2022

मोरबी रोपवे पूल या अपूर्ण प्रकल्पाच्या उदघाटनाच्या लगीनघाई मुळे १५० चे वर निरपराधांचे बळी - मोरबी रोपवे पूल कोसळल्याची जबाबदारी घेत राजीनामा द्या -शिवसेनेची पंतप्रधान मोदींना माग

मोरबी रोपवे पूल या अपूर्ण प्रकल्पाच्या उदघाटनाच्या लगीनघाई मुळे १५० चे वर निरपराधांचे बळी - मोरबी रोपवे पूल कोसळल्याची जबाबदारी घेत राजीनामा द्या -शिवसेनेची पंतप्रधान मोदींना मागणी

दिनांक -१ नोव्हेंबर २०२२

मोठ्या प्रमाणावर मेगा प्रसिद्धीच्या 'अवाजवी घाई' साठी सत्ताधारी भाजपच्या गुजरात सरकारच्या अति उत्साहामुळे मोरबी रोपवे पूल कोसळण्याच्या दुर्देवी घटना घडली आहे. अनिवार्य सुरक्षा चाचणी आणि प्रोटोकॉल पूर्ण न करता, वापरण्यासाठी योग्य नसलेल्या अपूर्ण, अर्ध-पूर्ण प्रकल्पांचे निवडणुकीच्या तोंडावर स्वस्त  प्रसिद्धी या कारणाने अतिशय घाईत  उद्घाटन करण्यात आले असल्याचे आता निष्पन्न झाले आहे. आता या दुर्घटनेची नैतिक जवाबदारी घेत राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे  राष्ट्रीय प्रवक्ते किशोर तिवारी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याना खुले पत्र लिहून केली  आहे.

मोरबी रोपवे पूल कोसळण्याच्या दुर्देवी घटनेमुळे संपूर्ण देश तसेच जग व्यथित झाले आहे, ज्यामध्ये महिला आणि लहान मुलांसह सुमारे १५० निष्पाप लोकांचा मृत्यू झाला होता, ज्याने देशाला हादरवून सोडले आहे, अशी दुर्भाग्यपुर्ण तांत्रीक दोषामुळे व प्रशासकीय कामात  शासनाच्या दबावामुळे गेल्या ९ वर्षात झालेली सर्वात दुर्भाग्य पूर्ण घटना अत्यंत जड अंतःकरणाने मी जेव्हा त्याचा बारकाईने अभ्यास आणि विश्लेषण करतो तेव्हा सर्वजण या वस्तुस्थितीशी सहमत आहेत की हे मुख्यतः भाजपा च्या सरकारची, अधिकाऱ्यांची शैली, खुजा दृष्टीकोन आणि मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धीच्या 'अवाजवी घाई' साठी सत्ताधारी भाजपच्या लोकांच्या अति उत्साहामुळे मोरबी रोपवे पूल कोसळण्याच्या दुर्देवी घटना घडली आहे. अनिवार्य सुरक्षा चाचणी आणि प्रोटोकॉल न बाळगता, वापरण्यासाठी योग्य नसलेल्या अपूर्ण, अर्ध-पूर्ण प्रकल्पांचे निवडणुकीच्या तोंडावर स्वस्त  प्रसिद्धी या कारणाने अतिशय घाईत  उद्घाटन करण्यात आले असल्याचे आता निष्पन्न झाले आहे. या दुर्घटनेची नैतिक जवाबदारी घेत राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे  राष्ट्रीय प्रवक्ते किशोर तिवारी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याना खुले खरमरीत पत्र लिहून केली  आहे.

मोरबी येथील दुर्दैवी घटने नंतर  तुम्ही स्वतः आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी नेहमीची निवडणूक व्यस्तता चालू ठेवली. ज्यामुळे तुमच्या राज्यातील आणि संपूर्ण भारतातील लोक संतप्त झाले आहेत. पंतप्रधान महोदय, दिवंगत पूर्व पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी यांनी सार्वजनिक जीवनातील सर्वोच्च नैतिकता आणि जबाबदारीचे समर्थन करत , रेल्वे अपघातात १४० लोकांचा मृत्यू झाला होता तेव्हा राजीनामा दिला होता,आता अशाच उदाहरणाची अपेक्षा करता येईल का? असा सवाल किशोर तिवारी यांनी आपल्या पत्रात केला आहे.

आपल्या खुल्या पत्रात किशोर तिवारी यांनी म्हटले आहे की "जड अंतःकरणाने मी जेव्हा त्याचा बारकाईने अभ्यास आणि विश्लेषण करतो तेव्हा तुम्ही या वस्तुस्थितीशी सहमत व्हाल की हे मुख्यतः तुमच्या सरकारची, अधिकाऱ्यांची शैली आणि दृष्टीकोन आणि मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धीच्या 'अवाजवी घाई'साठी सत्ताधारी भाजपच्या लोकांच्या अतिउत्साहामुळे आहे. अनिवार्य सुरक्षा-आणि प्रोटोकॉल न बाळगता, वापरण्यासाठी योग्य नसलेल्या अपूर्ण, अर्ध-पूर्ण प्रकल्पांचे विशेषत ज्या विधानसभा/स्थानिक निवडणुका होणार आहेत, त्यामुळे प्रसिद्धी हव्यासा पोटी हा प्रकार व निर्दोष नागरिकांचे सदोष मनुष्यवध करून निवडणुकांमध्ये मते मिळवीण्यासाठी या अर्धवट प्रकल्पांचे उद्घाटन केले  आणि जनतेला मूर्ख बनवण्यासाठी जनतेचा शेकडो कोटी रुपयांचा पैसा प्रचारात उडवला जातो, अशी अनेक उदाहरणे आहेत.अशी उदघाटणे हे संबंधित स्थानिक किंवा इतर सक्षम प्राधिकारी/अधिकारी यांच्याकडून पूर्णत्वाचे प्रमाणपत्र, फिटनेस प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, चाचणी प्रमाणपत्रे इत्यादींशिवाय केले जातात असे प्रकार अतिशय गंभीर आहे. मोरबी रोपवे पुलाची दुर्घटना हे असेच एक दुर्दैवी ज्वलंत उदाहरण आहे, जेथे संबंधित वैधानिक मंजुरी मिळण्यापूर्वीच मंत्र्यांनी तो वापरण्यासाठी खुला करण्यास कंत्राटदारांना भाग पाडले होते. अशा प्रकारे  गेल्या ९ वर्षांत संपूर्ण भारतात किती "अपूर्ण" रस्ते/महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन झाले, लोकांची दिशाभूल करण्यासाठी सार्वजनिक खर्चाने प्रचंड जाहिराती व अवास्तव प्रसिद्धी करून किती पैसा उधळला यावर श्वेत पत्रिका काढण्याची मागणी शिवसेनेने केली आहे

किशोर तिवारी आपल्या पत्रात पुढे म्हणतात की गुजरातमधील खूप गाजावाजा केलेल्या सी-प्लेन प्रकल्पाचे भवितव्य काय झाले आहे ? आणि "उड्डाण"  योजनेंतर्गत भारतातील १०० ठिकाणी सुरू फ्लाईट पैकी आज एकही फ्लाइट कार्यरत नाही. उड्डाण क्षेत्रातील कंपन्यां आज पूर्णपणे डबघाईस आल्या असून त्यांचा अनुभव कटू आहे की हे सर्व खराब नियोजन, वॉटरफ्रंट लँडिंग पॉईंटपासून ते गंतव्यस्थाने पर्यंतच्या पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे अनेक तलाव/नद्या/जलाशय दुर्गम टेकड्या, जंगल इत्यादींमध्ये असल्याने मोरबी सारख्या दुर्घटना होण्यासाठी मार्ग मोकळा करण्यात आला आहे.*

*असेच दुसरे उदाहरण पहा, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी, तुमच्या पुढाकाराने घाईघाईने नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन केले, जे त्यावेळी एकूण ८६ किलोमीटरपैकी केवळ ७ किलोमीटरच्या सीताबर्डी-विमानतळाच्या भागात पूर्ण झाले होते, ९० टक्के काम आज पर्यंत अपूर्ण आहे, हा सुद्धा  प्रकल्पाच्या उद्घाटनाचे श्रेय घेण्यात आले असा केविलवाणा प्रकार असुन आज अर्धेही पूर्ण झाले नाही. काम पूर्ण न करताच  उद्‌घाटन करून नागपूर मेट्रो ला या अर्धवट अवस्थेत मेट्रो चालविण्यास भाग पाडून मेट्रो चे आणि सार्वजनिक निधीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे, त्याचे श्रेय घेण्याची नैतिकता कोणती? अशी टीका त्यांनी केली आहे.

असाच प्रकार घाईघाईने सुरू झालेल्या "वंदे भारत एक्स्प्रेस" गाड्यांच्या स्थितीचा विचार करायला हव्या, छोट्या मोठ्या टक्कर झाल्यानंतर, रेल्वे सुरक्षा आयोगाकडून सुरक्षिततेच्या चाचण्या अद्याप पूर्ण करायच्या आहेत कारण  गुरांच्या छोट्याशा टक्करांमध्येही या वंदे भारत रेल गाड्यांना मोठा झटका बसला आहे.

नवे मिंधे महाराष्ट्र सरकार देखील अर्धवट पूर्ण झालेल्या मुंबई-नागपूर सुपर एक्स्प्रेस समृद्धी मार्गाचा उद्घाटन करण्याचा विचार करत आहे, जेणेकरून ते स्थानीय निवडणुकीत भाजपाला फायदा करून घेवू असे सांगण्यात येते परंतु सर्व सुरक्षा तपासण्या पूर्ण झाल्या आहेत का, कृपया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुष्टी करूनच उदघाटनाची परवानगी द्यावी अन्यथा अति वेगवान प्रकल्प आहे , हे दाखविण्याचे नादात मोरबी सारखी  घटना घडू नये अशी मागणी किशोर तिवारी यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी याना खुले पत्र लिहून केली  आहे.

आपल्या पत्रात तिवारी पुढे म्हणतात की "पंतप्रधान महोदय, महाराष्ट्रात जे काही पूर्ण नाही ते प्रकल्प आता घाई गर्दीत उद्घाटनासाठी तयार केले जात आहे, कृपया शिंदे-फडणवीस यांना मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि अशाच इतर प्रकल्पांचे ताबडतोब उद्घाटन करण्याचा सल्ला द्या, जेणेकरून त्यांनी ४ महिन्यात उच्च काम केल्याबद्दल क्रेडिटचा ते दावा करू शकतील . मात्र आता लोकलज्जाखातर, नैतिकता आणि सदाचार विसरून या सर्व प्रकारावर आपण तोंड उघडाव, अशी मी अपेक्षा करू शकतो का ? असा सवाल किशोर तिवारी यांनी या पत्रात केला आहे.

🔥🔥🔥
================