Friday, December 27, 2024

विदर्भातील कृषी संकटाची दखल घेउन दिलासा देणारे पहिले भारतीय पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग -किशोर तिवारी

विदर्भातील कृषी संकटाची दखल घेउन दिलासा देणारे  पहिले भारतीय पंतप्रधान  डॉ.मनमोहन सिंग -किशोर तिवारी 

दिनांक - २७ डिसेंबर २०२४

२००४ मध्ये तत्कालीन भारत सरकारने स्वस्त कापसाच्या आयाती परवानगी दिल्यामुळे कापसाचे दार भारतात प्रचंड प्रमाणात पडले व त्याच वर्षी बोण्डअळी ने अख्खे कापसाचे पीक नष्ट केल्यामुळे ऑगस्ट २००४ पासुन    पश्चिम विदर्भातील कापूस उत्पादक शेतकरी अचानक उद्विग्न झाले व पश्चिम विदर्भात  कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना प्रचंड प्रमाणात  सुरुवात झाली ,दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या राष्ट्रीय स्तरावर येऊ लागल्या तेंव्हा  जुलै  २००५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पश्चिम विदर्भ कोरडवाहू शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नवर तोडगा काढण्यासाठी तत्कालीन राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांना पश्चिम विदर्भात भेट देण्यास सांगितले व त्यांनी भेट दिल्यावर आपला अहवाल दिला त्यांनी गंभीर दखल घेत योजना आगोगाची संपूर्ण टीम २००६च्या सुरवातीला पाठविली व उपाय योजनेसाठी संपूर्ण कार्यक्रम आखला त्यानंतर ३० जून २००६ ला  यवतमाळ आणि वर्धा या सर्वात जास्त कापूस शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त भेट देणारे  भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान असलेले स्वर्गीय डॉ. मनमोहन सिंग यांनी शेती संकटाच्या मुख्य मुद्द्यांवर चर्चा केली आणि नंतर १ जुले २००६ ला नागपूर येथील राजभवनात ४४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे ऐतिहासिक 'विदर्भ मदत पॅकेज' जाहीर केले होते . परंतु त्यावेळच्या महाराष्ट्राच्या सरकारच्या  भ्रष्टाचारामुळे ते पूर्णपणे अयशस्वी झाले होते.मात्र   आता इतिहासात  विदर्भातील कृषी संकटाची दखल घेणारे आणि त्यावर उपाययोजना करणारे पहिले भारतीय पंतप्रधान स्व. डॉ. मनमोहन सिंग सतत आठवणीत राहतील अशी श्रद्धांजली देत  विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर आणणारे शेतकरी कार्यकर्ते किशोर तिवारी  यांनी आज स्व. डॉ. मनमोहन सिंग यांच्या आठवणीला उजाळा दिला 

पहिल्या राष्ट्रीय कृषी कर्जमाफीचे जनक  डॉ. मनमोहन सिंग 

२००६मध्ये जेव्हा राज्य सरकार विदर्भातील मदत पॅकेज लागू करण्यात अपयशी ठरले ज्यामुळे मोठा सिंचन घोटाळा झाला, तेव्हा पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणे हे मोठे आव्हान होते. स्व. डॉ. मनमोहन सिंग यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय मार्च २००८ मध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर  कृषी  कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला व २००९ मध्ये केंद्रात शेतकऱ्यांनी डॉ मनमोहन सिंग यांचे सरकार निवडून दिले  विदर्भातील कापूस उत्पादक  शेतकरी नेहमीच त्यांचे ऋणी राहतील ,ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो अशी प्रभूस विनंती   किशोर तिवारी यांनी केली 

====================================================