Tuesday, November 6, 2018

अवनी मृत्यू: केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांची भुमिका शेतकरी व आदीवासी विरोधी -किशोर तिवारी

अवनी मृत्यू:  केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांची भुमिका शेतकरी व आदीवासी विरोधी -किशोर तिवारी 

दिनांक -६ नोव्हेंबर २०१८

https://vidarbhatimes.blogspot.com/2018/11/blog-post_6.html
ज्या अवनी T १ वाघिणीने १३ जणांचा जीव घेतला होता. मागील २ वर्षांपासून वन खाते तिला जेरबंद करण्याचा प्रयत्न करत होते, पांढरकवडा वन विभागात  वाघांची १०च्या  संख्यापेक्षा  अधिक आहे. तेथील जंगलांची क्षमता संपली आहे. जंगलात काही नसल्याने ते बाहेर पडत आहेत. या  मागील २ वर्षांत अवनीला ५ वेळा ट्रँक्विलाइज़ करण्यात आले. पण ती शांत झाली नाही. ग्रामस्थांना त्या दिवशी ती  दिसली. वाघिणीच्या हल्ल्यात कोणताही व्यक्ती मारला जाऊ नये म्हणून विषेय चमू त्या ठिकाणी  त्या वेळी गेली असता वनअधिकाऱ्यांनी तिच्या दिशेने ट्रँक्विलाइज डार्टने निशाणा साधला होता  परंतु, यामुळे ती आणखीनच उत्तेजित झाली आणि चमूच्या  वाहनावर ती झेपावली व त्यांनी स्वरक्षणार्थ तिच्यावर गोळी झाडली त्यानं तिचा अपघाती मृत्यू झाला हि वस्तूथिती  असतांना त्यावर होत असलेला वाद दुभाग्यपूर्ण असुन यामध्ये  केंद्रीय मंत्री मनेका गांधी आघाडीवर आहेत त्यांना देण्यात येत असलेली माहीती पूर्णपणे चुकीची असल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वन विभागात मागील ३० वर्षापासून आदीवासी व शेतकऱ्यांच्या मदतीने वन्य व  वन्यजीव रक्षक चळवळ चालविणारे किशोर तिवारी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्या वाघिणीच्या मृत्यूवर दुःख व्यक्त करतांना केलेली सरकारवर  टीका शेतकरी व आदीवासी विरोधी असल्याची खंत व्यक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशा आगाऊ मंत्र्यांना आवर घालण्याची विनंती केली आहे . 

यापुर्वी यवतमाळ येथील पांढकवडा वन विभागात अवनी या वाघिणीने दहशत माजविल्यानंतर राळेगाव केळापुर तालुक्यातील ७० आदीवासी बहुल खेड्यात सुमारे १ लाखावर निष्पाप शेतकरी व आदीवासी सतत दहशतीला  जगत होते एक एक करीत या वाघिणीने १३ लोकांचा जीव घेतला मात्र यामुळे या परीसरातील  जनजीवन जवळ जवळ संपले होते  सतत होणारी उपासमार शेती व्यवसाय ठप्प झाला होता वन खात्याच्या अधिकाऱ्यांवर व महसूल अधिकाऱ्यांवर प्रचंड असंतोष वाढला होता अनेक वेळा आंदोलन सुद्धा हिंसक झाले त्यांनतर वन अधिकाऱ्यांनी गेल्या दोन वर्षांपासून पकडण्यासाठी मात्र दिल्ली मुंबई पुण्याला बसलेल्या  वन्यजीव कार्यकत्यांनी उच्चंन्यायालयात वारंवार   वनखात्याविरोधात  जनहित याचिका दाखल करून ही मोहीम बंद पाडली आता भारताच्या सर्व न्यायालयाने वनअधिकाऱ्यांनी राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाच्या (एनटीसीए) मार्गदर्शिकेनुसार  निर्णय  घेण्याचे आदेश दिलें त्याही आदेशाला वारंवार दिल्ली मुंबई पुण्याला बसलेल्या  वन्यजीव कार्यकत्यांनी रोखण्याचा प्रयन्त सतत केला मात्र निर्दोष  ७० आदीवासी बहुल खेड्यात सुमारे १ लाखावर मूळ वन्यप्रेमी व  वन्यजीव रक्षक आदिवासींचा जीव वाचविण्यासाठी ही मोहीम सुरु केली यासाठी  तीन मोठे पिंजरे, ५०० वन कर्मचारी आणि खासगी कर्मचाऱ्यांची फौज या ठिकाणी होती. वाघिणीचा शोध घेण्यासाठी पॅरामिटर आणि इटालियन कुत्रेही आणण्यात आले होते. असे असले तरीही या वाघिणीला पकडण्यात यश येत  नव्हते. अखेर अवनीला  शोध चमूवर हल्ला केल्यानंतर खात्मा करण्यात आला एकीकडे  राळेगाव केळापुर तालुक्यातील ७० आदीवासी बहुल खेड्यात सुमारे १ लाखावर निष्पाप शेतकरी व आदीवासी मागील दोन वर्षांनंतर दिवाळी साजरी करीत आहेत त्याचवेळी  दिल्ली मुंबईच्या  राजकीय वर्तुळातही अनेक वन्यप्रेमी  वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेवर तोंडसुख घेत आहेत यामध्ये  केंद्रीय मंत्री मनेका गांधी आघाडीवर आहेत त्यांना देण्यात येत असलेली माहीती पूर्णपणे चुकीची असल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वन विभागात मागील ३० वर्षापासून आदीवासी व शेतकऱ्यांच्या मदतीने वन्य व  वन्यजीव रक्षक चळवळ चालविणारे किशोर तिवारी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्या वाघिणीच्या मृत्यूवर दुःख व्यक्त करतांना केलेली सरकारवर  टीका शेतकरी व आदीवासी विरोधी असल्याची खंत व्यक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशा आगाऊ मंत्र्यांना आवर घालण्याची विनंती केली आहे . 
सध्या पांढरकवडा वन विभागात वाघांची संख्या प्रत्येक वर्षी वाढतच आहे जवळच्या टिप्पेश्वर अभयारण्यमध्ये यावर्षी ४ वाघिणी बाहेर आली आहेत . झरी केळापुर मारेगाव वणी राळेगाव येथे सध्या ९ वाघिणीचा आपल्या मुलांसह क्षेत्रासाठी लढा सुरु आहे त्यातच चंद्रपूर जिल्हातून आलेल्या वाघिणीच्या वणी कोळसा खदानीच्या परीसरात हैदौस सुरु झाला आहे यामुळे  अवनी  वाघिणीच्या मेल्याने हा वाद संपणारा नसुन यापरीसरातील सुमारे ५ लाखावर ग्रामीण जनतेच्या जीविताचा प्रश्न उभा झाला आहे यासाठी वन्यजीव कार्यकत्यांनी ,मनेका गांधींसारख्या नेत्यांनी एकात्मिक आदीवासी व शेतकरी वाचवा कार्यक्रम लागू करण्यासाठी बसावे लागेल फक्त दिल्ली मुंबई पुण्याला  बसुन प्रेस नोट काढणे व विदेशी पैशाने उच्चं वा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याने हा प्रश्न पुन्हा पुन्हा समोर येणार अशी भीतीसुद्धा किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे . 
दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी  विनम्रपणे मनेका गांधी दिलेल्या प्रत्युत्तराचे किशोर तिवारी यांनी जोरदारसमर्थन केले असुन दोन महिन्यांपूर्वी मनेका गांधीं यांनी यवतमाळला तथाकथित योग गुरूला भेटण्यासाठी आल्याहोत्या त्यावेळी भारताच्या महिला व बालकल्याण विभागाच्या मंऱ्यांनी  वाघिणीच्या हल्ल्यात मृत झालेल्या महिलांचा कुटुबांची उपासमारी तोंड देत असलेल्या आदीवासी व शेतकऱ्यांची विचारपूस केली असती तर वाद उपस्थित झाला नसता आता हा वाद वन्यप्राणी प्रेमी नेहमीप्रमाणे या घटनेच्या विरोधात उच्चं वा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याने तसेच राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाच्या (एनटीसीए) चौकशी सुद्धा पूर्ण झाली नाही इतके काय  पोस्टमार्टम रीपोर्ट सुद्धा आलेला नसतांना अवनीला बेशुद्ध करण्याऐवजी थेट ठार करण्यात आले असे आरोप करणे पूर्वग्रह दूषित ठेवण्याचा प्रकार असल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे . 
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी  बिर्ला आणि अंबानी यांच्या उद्योगांसाठीच अवनी वाघिणीची शिकार केल्याचा आरोप एक प्रकारची दिवाळखोरी असल्याची टीका सुद्धा तिवारी यांनी केली  . वन्य कायद्यानुसार एखादा वन्य प्राणी हिंसक झाला तर त्याला बेशुद्ध करून पकडणं अवघड झाल्यावर उच्चं वा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बेशुद्ध करण्याऐवजी थेट ठार आले  यात बिर्ला आणि अंबानी यांच्या उद्योगांसाठी केल्याचा आरोप टाईम पास असल्याचा व मेलेल्या १३ आदीवासी व शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार असल्याची टीका तिवारी यांनी केली 
===============================================================================

No comments: