Saturday, November 10, 2018

वन्यप्राणीग्रस्त शेतकऱ्यांच्या बोराटी येथे ११ नोव्हेंबरला मेळावा :सरकारला अवनीपिडीत मागणार जगण्याचा अधिकार

वन्यप्राणीग्रस्त शेतकऱ्यांच्या बोराटी येथे ११ नोव्हेंबरला  मेळावा :सरकारला अवनीपिडीत मागणार जगण्याचा अधिकार 
दिनांक -१० नोव्हेंबर २०१८
एकीकडे संपुर्ण महाराष्ट्रात टी १ अवनी वाघाणीचा खात्मा करतांना नियमांचा पालन केला नाही यावर वन्यप्रेमी वाद करीत असतांना राजकीय नेते आप आपल्या परीने राजकारण करण्यात गुंतले असतांना ज्या भागात टी १ अवनी वाघाणीने १३ेजीव घतले होते त्या निष्पाप उपासमारीला तोंड देत असलेल्या कुटुंबाच्या लहान लहान मुलांसोबत "आमची आई आमचे बाबा परत द्या " असे फलक लाऊन तसेच या परीसरातील सराटी लोणी बंदर सावरगाव वरंध घुबडहेटी  सुभानहेटी  झाडगाव मोहदा जिरामीरा वाढोणा झोटिंगधरा काहीगाव कासार चिखलदरा कृष्णापूर खेमकुंड पळसकुंड परीसरातील शेकडो वन्यप्राणीग्रस्त शेतकरी सुद्धा मागील दोन वर्षांपासून त्यांचा शेतीचा रोजगार हिरावुन गेल्याने आपला जीवन जगण्याचा अधिकार मिळविण्यासाठी सरकारला मागणीपत्र देणार आहेत . मानव वन्यप्राणी ह्या प्रश्न्नावर समाधानकारक तोडगा या  मेळाव्यात निघावा यासाठी  पालकमंत्री ना . मदन येरावार , सहपालकमंत्री ना संजय राठोड ,आमदार डॉ अशोक उईके माजी मंत्री प्रा वसंतराव पुरके,शिवाजीराव मोघे ,जिल्ह्यातील अवनी वाघीणीचा बंदोबस्त करावा यासाठी सभागृहात वा सभागृहाबाहेर आवाज उठविणारे सर्व  खासदार व  आमदार ,यवतमाळ जिल्ह्यातील सन्माननीय   आमदार  व जिल्हा परीषद ,पंचायत समिति सदयस ,अवनीग्रस्त गावाचे सरपंच वनविभागाचे सर्व अधिकारी . महसूल विभागाचे सर्व अधिकारी कृषी विभागाचे सर्व अधिकारी ग्रामीण विकास विभागाचे अधिकारी  पोलीस विभागाचे अधिकारी तसेच यांना केळापूर व राळेगाव विभागाचे वाघग्रस्त खेड्यात काम करणारे सर्व   वन्यप्राणीग्रस्त शेतकरी व अवनीच्या मृत्यूमुळे दुःख झालेल्या व वन्यप्राण्यांसाठी काम करणाऱ्या सर्व आदरणीय समाज सेवकांनाही सादर आमंत्रित करण्यात आल्याची माहीती या वन्यप्राणीग्रस्त शेतकरी मेळाव्याचे संयोजक किशोर तिवारी यांनी दिली . 
या वन्यप्राणीग्रस्त शेतकरी मेळाव्यामध्ये वनामध्ये राहणाऱ्या ग्रामीण जनतेच्या प्रमुख मागण्यांमध्ये अवनी वाघाणीनें ज्या १३ निष्पाप आदिवासी व शेतकरी -शेत मजुरांचा बळी  घेतला त्या कुटूंबाच्या लोकांना सरकारी नौकरी तसेच अवनीग्रस्त खेड्यात सरसकट प्रति कुटुंब दोन लाख रुपयाची नुकसान भरपाई देण्यात यावी वन्यप्राण्यामुळे पिकाची नुकसान भरपाई देण्याचे निकष बदलून सरसकट  प्रति हेक्टरी ५० हजार देण्याचा कायदा करण्यात यावा जर वन्यप्राणी जगाला अन्न देणाऱ्या बळीराजापेक्षा महत्वाचा असेल तर आमचे सर्व शेत सरकारने ५ पट्टीच्या दराने घ्यावी व आमच्या सर्वाना ज्या शहरात चाकरमाने व विदेशी पैशावर वन्यजीव प्रेम करणारे  एन जी ओ चे  कार्यकर्ते वातानुकूल घरात राहतात त्या ठिकाणी पुनर्वसन करावे खुशालपणे मनेका पध्यतीने देश चालवावा अशी विनंती अवनीग्रस्त भागाचे कार्यकर्ते विजय तेलंगे यांनी केली आहे . 
सध्या संपुर्ण विदर्भात हजारो रोही डुक्कर यांचे कळपच्या कळप सर्व उभे पीक नष्ट करीत आहे त्यांच्या मागे येणारे वाघ यांचा हैदौस अनेक शेतकऱ्यांना शेतीमधून पलायन करण्यास लावत आहे ,मागील दशकात लाखो हेक्टर वरील पिकाची हानी झाली आहे ,शेकडो जीव गेले आहेत मात्र शहरात राहणारे चाकरमाने व विदेशी पैशावर वन्यजीव प्रेम करणारे  एन जी ओ चे  कार्यकर्ते  व त्यांच्या नेत्या मनेका गांधी वन्यप्राण्यामुळे होत असलेली प्रचंड प्राणहानी व पिकांचे हजारो -कोटींचे नुकसान यावर एक शब्दही बोलत नाहीत  . कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला जात नाही मानव-वन्यप्राणी संघर्ष टोकाला गेला आहे आज संपूर्ण विदर्भात शेकडो वाघिणीचा आपल्या मुलांसह क्षेत्रासाठी लढा करीत आहेत एकीकडे विदर्भ प्रदेश जगात वाघ प्रदेश    म्हणून ओळखला जात आहे त्याचवेळी  अवनी  वाघिणीच्या मेल्याने उपस्थित झालेला वाद आर्थिक  संकटात वन्यप्राण्यांचे हित जपणाऱ्या त्यांची संख्या विक्रमी वाढविणाऱ्या वनखात्याचा ,आदिवासींच्या तसेच शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा तसेच उपमान करणारा असल्याचे दुःख किशोर तिवारी व्यक्त केले आहे . 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments: