Thursday, November 8, 2018

रिलायन्सला वनखात्याची हजारो एकर वाटपाचे पाप आघाडी सरकारचे: खदानी व उद्योगासाठी अवनी टी १ वाघिणीचा खात्मा हा आरोप बिनबुडाच्या

रिलायन्सला वनखात्याची  हजारो एकर  वाटपाचे पाप आघाडी सरकारचे: खदानी व उद्योगासाठी अवनी टी १ वाघिणीचा  खात्मा हा आरोप बिनबुडाच्या   
दिनांक -९ नोव्हेंबर २०१८
ज्या वाघग्रस्त भागात तसेच राळेगाव व केळापूर तालुक्याच्या ज्याभागात  अवनी टी १ वाघिणीने १३ जणांचा जीव घेतला त्याभागात वा त्याचा १०० किलोमीटर एकही खदानी वा उद्योग सुरु नाही वा एकही खदानी वा उद्योगाचा कोणताही प्रस्ताव नाही अशा राळेगाव केळापुर तालुक्यातील ७० आदीवासी बहुल खेड्यात सुमारे १ लाखावर निष्पाप शेतकरी व आदीवासी  जनजीवन जवळ जवळ संपले असतांना बिर्ला आणि अंबानी यांच्या उद्योगांसाठीच अवनी वाघिणीची खात्मा  केल्याचा आरोप २००९ मध्ये सर्व नियम धाब्यावर ठेऊन आघाडी सरकारने  ऐन निवडणुकीची आचार संहीता लागण्यापूर्व अनिल अंबानी यांच्या उद्योग समुहाला यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील चनाखा, घुबडी, निमडेली व कारेगांव या खेड्यातील हजारो  एकर जमिन फुकटात दिल्याचे तसेच ही जमिन देण्यासाठी महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्‌यमंत्री अशोक चव्हाण यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून या सर्व व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी आदिवासी व शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी एका पत्रकाव्दारे केली आहे. आज किशोर तिवारी यांनी बिर्ला अंबानी यांच्या साठी अवनी मारल्याचा आरोपावर जगाला माहिती देण्यासाठी वस्तुस्थिती दाखविणारा यवतमाळ नकाशाच प्रकाशीत केला असुन मुंबई पुण्याला  बसुन प्रेस नोट काढणे व विदेशी पैशाने उच्चं वा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे  तसेच फोटो काढण्यासाठी वाघावर छंद म्हणुन निष्पाप आदिवासी व शेतकऱ्यांच्या जिवापेक्षा नरभक्षक वाघिणीसाठी ओरड करणारे पाखंडी नेत्यांना यामुळे सत्य कळेल अशी सदभावना त्यांनी व्यक्त केली आहे . 
यासंबंधी आपल्या निवेदनात तिवारी यांनी ३१ आँगष्ट २००९ला   निघालेल्या जि. आर. हवाला देत म्हटले आहे की  यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी भागातील चनाखा, घुबडी, निमडेली व कारेगांव या गावातील अंदाजे १० कि.मी. पेक्षा जास्त लांबीच्या हजारो  एकराचा पट्टा खनिज खनन करण्यासाठी सरकारने अर्ज बोलावले होते व या अर्जाची सुनावनी २१ जुलै २००९ ला मुख्‌यमंत्र्यांनी स्वत: केली होती यामध्ये एकूण आलेल्या ३८ अर्जामधून ३० लोकांनी आपली बाजू मांडली होती व या पट्टयातील ४५० लाख टन खनिजावर आपला दावा करण्यासाठी प्रतिवाद केला होता मात्र मुख्यमंत्र्यांनी आपला आदेश क्रमांक एम एम एन - १००९/सी.आर. २९३९/ आय एन डी-९ देत असतांना  सरकारने यापैकी फक्त संचीत इस्पात, मुरली उद्योग, श्री सिमेंट, ए.सी.सी. सिमेंट, लाप्रिजी इंडिया, अंबुजा सिमेंट व रिलायन्स सिमेंट यांचाच विचार केला व इतर अर्ज खारीज केले या ७ कंपन्यांचा मुख्यमंत्र्यांनी आपल्या आदेशामध्ये ए.सी.सी., अंबुजा, श्री सिमेंट सारख्या कंपन्यांना डावलुन रिलायन्सला हा पट्टा देण्याची जी कारणे दिली आहे ती संशयास्पद होती  हा पट्टा निवडणुकीच्या तोंडावर कोणताही अनुभव नसलेल्या रिलायन्स ग्रुपला देतांना भ्रष्टाचाराचा संशय येत असल्‌याची दाट शक्यता सुद्धा  किशोर तिवारी यांनी वर्तविली होती कारण   ज्या १० कि.मी. च्या परिसरात ही नविन खान येत आहे त्याच्या  बाजूला टिपेश्वरचे अभयारण्य असून दुसरीकडे पैनगंगा नदी आहे अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी एवढे मोठे खनन करण्याची परवानगी भारत सरकारच्या  पर्यावरण व वन खात्याकडून कशी मिळणार असा सवाल सुध्दा किशोर तिवारी यांना केला होता मात्र २०१२ मध्ये केंद्राने सारा व्यवहार मान्य केला होता आज तेच नेते सध्याचा सरकारला दोष देत आहे  या पापाचे खरे धनी कोण हे समाजाने समजावे अशी विनंती  किशोर तिवारी केली आहे . 
वन्यप्राण्यामुळे विदर्भाच्या शेतकऱ्यांना शेती करणे कठीण -मागील दशकातील विदर्भातील 
सध्या संपुर्ण विदर्भात हजारो रोही डुक्कर यांचे कळपच्या कळप सर्व उभे पीक नष्ट करीत आहे त्यांच्या मागे येणारे वाघ यांचा हैदौस अनेक शेतकऱ्यांना शेतीमधून पलायन करण्यास लावत आहे ,मागील दशकात लाखो हेक्टर वरील पिकाची हानी झाली आहे ,शेकडो जीव गेले आहेत मात्र शहरात राहणारे चाकरमाने व विदेशी पैशावर वन्यजीव प्रेम करणारे पोटभरू एन जी ओ ज्या कार्यकर्त्यांवर व मनेका गांधी वन्यप्राण्यामुळे होत असलेली प्रचंड प्राणहानी व पिकांचे हजारो -कोटींचे नुकसान यावर एक शब्दही बोलत नाही . कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला जात मानव वन्यप्राणी संघर्ष टोकाला गेला आहे आज संपूर्ण विदर्भात शेकडो वाघिणीचा आपल्या मुलांसह क्षेत्रासाठी लढा करीत आहेत एकीकडे विदर्भ प्रदेश जगात वाघप्रदेश   म्हणून ओळखला जात आहे त्याचवेळी  अवनी  वाघिणीच्या मेल्याने उपस्थित झालेला वाद आर्थिक  संकटात वन्यप्राण्यांचे हित जपणाऱ्या त्यांची संख्या विक्रमी वाढविणाऱ्या वनखात्याचा ,आदिवासींच्या तसेच शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा तसेच उपमान करणारा असल्याचे दुःख किशोर तिवारी व्यक्त केले आहे . 
 ==================================================

No comments: