Friday, November 30, 2018

महावितरण व सिंचन विभागाच्या नाकर्तेपणामुळे दुष्काळग्रस्त शेतकरी आत्महत्येच्या दारावर -दातोडी सायतखर्डा येथील सरकार आपल्या दारी कार्यक्रमात समोर आले सत्य

महावितरण व सिंचन विभागाच्या नाकर्तेपणामुळे  दुष्काळग्रस्त शेतकरी आत्महत्येच्या दारावर -दातोडी सायतखर्डा येथील सरकार आपल्या दारी कार्यक्रमात समोर आले सत्य 
दिनांक -२९ नोव्हेंबर २०१८
राज्यात विदर्भ मराठवाड्यातील कापूस पिकाखाली ४४ लाख हेक्टरचे क्षेत्र असून मागील वर्षी  सर्वच  ठिकाणी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता  त्यामुळे आता  कापसाचे उत्पन्न   प्रचंड प्रमाणात घटले होते यावर्षी मात्र मान्सुनने  दिलेला धोका ,पर्यावरणात झालेला प्रचंड बदल ,रासायनिक शेतीने जैविक तत्वे गमावलेली जमीन ,निकामी झालेले बी टी बियाणांचे तंत्रद्यान ,जमिनीमध्ये ओलावा रोखण्यासाठी सेंद्रिय शक्तीची क्षमता नसल्यामुळे या दशकातील सर्वात कमी कापसाचे पीक कोरडवाहु क्षेत्रात आल्यामुळे  दिवाळीपूर्वीच सर्व कापसाची उलंगवाडी झाली  असुन सरासरी कापसाचे उत्पन्न विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी व कृषी क्षेत्रातील जाणकारांनी दिलेल्या माहीती नुसार २ ते ३ क्विंटल आले  असल्याने ५० लाखावर कापूस उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा प्रचंड आर्थिक अडचणीत आले  असुन ज्यांनी धरणात  पाणी असल्यामुळे हरभरा पेरला वा कापूस विचविण्याचा प्रयन्त केला त्यांचे उभे महावितरण व सिंचन विभागाच्या नाकर्तेपणामुळे व  जुलमी कारभारामुळे बुडत असुन दुष्काळग्रस्त शेतकरी महावितरण व सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या असहकार्यामुळे लवकरच आत्महत्या सुरु करतील असा गंभीर इशारा कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा. मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांना २९ नोव्हेंबरला आर्णी तालुक्यातील दातोडी तर घाटंजी तालुक्यातील सावरगाव व सायतखर्डा येथे आयोजीत कार्यक्रमात शेकडो शेतकऱ्यांनी दिली . महावितरण व मस्तवाल अधिकारी सिंचन विभागाचे अधिकारी जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी आदेश दिल्यांनतरही कार्यक्रमाला उपस्थित नव्हते . महावितरणचे अधीक्षक अभियंता सुरेश मडावी यांनी आपले अधिकारी जनतेच्या तक्रारी ऐकण्यास तयार नाहीत असे सांगिंतल्यानांतर आम्हांस जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र दिले नसल्याचे खोटी माहीती दिली त्यांनतर ऊर्जामंत्री बावनकुळे यांना तिवारी यांनी तक्रार देत महावितरणचे अधिकारी माजले असुन दुष्काळात शेतकरी मरत असतांना घराचे बिल भरा नाहीतर वीज कपात आहेत त्याचवेळी शेतकऱ्यांना कमीतकमी अखंडित ८ तास वीज देण्याची हमी दिल्यानंतरही जेमतेम तासभरही वीज येत नाही विजेचा दाब वोल्टेज कमी असल्यामुळे दररोज शेकडो मोटारी जळत आहेत मात्र वसुली करण्यात गुंतलेले महावितरण अधिकारी शेतकऱ्यांना प्रचंड त्रास देत असल्याची गंभीर तक्रार दातोडी सावरगाव व सायतखर्डा येथे आयोजीत कार्यक्रमात शेकडो शेतकऱ्यांनी केली . 

यवतमाळ जिल्ह्यात ५ जुलै व १३ ऑगस्टला प्रचंड पाऊसामुळे सर्वच धरणे व जलाशये संपूर्ण भरलेली आहेत मात्र शेतात पहले पुरामुळे नंतर पाऊसाने दगा दिल्यामुळे दुष्काळ व नापीकीला समोर जावे लागत आहेत . मागणी आल्यास शेतकऱ्यांना पाणी सोडण्याचे आदेश पालक मंत्री मदन येरावार यांनी ऑक्टोबर महिन्यातच दिल्यावरही सिंचन विभागाचे भ्र्ष्ट अधिकारी वसुलीच्या नांवावर शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करीत असल्याचा गंभीर आरोप दातोडीचे शेतकरी भाजप नेते प्रह्लाद पाटील जगताप यांनी यावेळी केला . वेणी धरणाचे पाणी तात्काळ सोडा व लोअर   पैनगंगा धरण विरोधी  कार्यकर्त्यावरील खटले तात्काळ मागे करण्याची मागणी त्यांनी यावेळी रेटली . 
यावर्षी  संपुर्ण आर्णी व घाटंजी तालुक्यात  कोरडवाहू क्षेत्रात  शेतकऱ्यांचे यंदा ६० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे  त्यानुसार सर्वच भागांतून कापसाची आवक प्रचंड प्रमाणात घटली असुन बहुतेक शेतकऱ्यांनी कापसाचे पीक नष्ट केले  मात्र कृषी विभागाचे अधिकारी फक्त कार्यालयात बसल्याबसल्या पिकांचे पंचनामे करीत असल्याच्या प्रचंड तक्रारी आपणास  दातोडी सावरगाव व सायतखर्डा येथे मिळाल्या असल्याची माहीती किशोर तिवारी यांनी दिली . घाटंजी व आर्णी तसेच वणी व झरी तालुके तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी यावेळी एकमताने जिल्हापरिषद सदस्य प्रकाशभाऊ राठोड दातोडीचे सरपंच विकास उईके मुबारक तंवर प्रह्लाद पाटील जगताप  जिल्हापरिषद सदस्य पवनीबाई कल्लमवार , सुरेश जैस्वाल  पंचायत समिती   सभापती ,सायतखर्ड्याचे सरपंच मालनबाई शेंडे यांनी केली . 
कार्यक्रमाला तेलंगणा भाजप निवडणुकीचे निरीक्षक शेतकरी नेते सुरेशभाऊ बोलेनवार ,  कोलाम नेते बाबुलालजी मेश्राम ,माधवराव टेकाम अंकित नैताम  मधुकर घसाळकर ,दत्ता सिडाम  उपस्थित होते. या सरकार आपल्या दारी कार्यक्रमाचे संयोजक सावरगावचे तुकाराम मोहुर्ले अजयरेड्डी एलटीवार  दातोडीचे लक्ष्मण मुजमुले संदीप गाडगे ओमप्रकाश जगताप अशोक पाटील    व  सायतखर्ड्याचे रघुनाथ शेंडे संतोष मोहुर्ले मधुकर चौधरी विष्णू शेंडे तानबा आडे प्रभाकर देशमुख  होते .  
===================================================================================

No comments: