Thursday, November 8, 2018

अवनी प्रकरणाचा धर्मगुरू प्रेमसाई यांना यवतमाळ लोकसभा उमेदवारी देण्यासाठी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांचा वापर -खदाणीसाठी व उद्योगांकरिता अवनीचा खात्मा केल्याचा आरोप हि एक दिवाळखोरी -किशोर तिवारी

अवनी प्रकरणाचा धर्मगुरू प्रेमसाई यांना यवतमाळ लोकसभा उमेदवारी देण्यासाठी  केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांचा वापर -खदाणीसाठी व  उद्योगांकरिता अवनीचा खात्मा केल्याचा   आरोप हि एक दिवाळखोरी -किशोर तिवारी 
दिनांक -८ नोव्हेंबर २०१८
सध्या जगात सर्व वन्यजीव व पर्यावरणवाद्यांना  बिनबुडाची माहीती देऊन  महाराष्ट्रच्या भाजप सरकारला अडचणीत आणण्यात आघाडीवर असलेल्या   केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचेवर आपले योगगुरु प्रेमासाई बाबा उर्फ सुरेशभाऊ नटराजन नायर यांना यवतमाळ लोकसभा उमेदवारीसाठी दबाव टाकत असल्याचा गंभीर आरोप यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वन विभागात मागील ३० वर्षापासून आदीवासी व शेतकऱ्यांच्या मदतीने वन्य व  वन्यजीव रक्षक चळवळ चालविणारे किशोर तिवारी यांनी केला मूळचे चंद्रपूरचे असलेले सुरेशभाऊ नटराजन नायर उर्फ प्रेमासाई बाबा हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातले गुन्हेगारीचे काही वादग्रस्त प्रकरणे बाहेर आल्यावर त्यांनी आसामच्या कामाख्या मंदिरात एका महंताच्या आश्रय घेतला होता त्याच ठिकाणी मेनका गांधी यांना या बाबानी भुरड टाकली मात्र या बाबाचा शोध यावर्षी १२  ऑगस्ट रोजी यवतमाळच्या प्रेमसाईंच्या आश्रमात नागपूरची बैठक रद्यकरून खासगी वाहनात   आल्या वर भेट दिल्यावर लागला त्यानंतर १५ ऑगस्टला त्यांचे पुत्र खासदार वरुण गांधीही आश्रमात आले. त्यामुळे प्रेमसाईंचा भाव यवतमाळच्या धार्मिक वर्तुळात एकदम वधारला. अभिनेत्री सुधा चंद्रन यांना बोलावून बाभुळगाव तालुक्यात मोठा कार्यक्रम बाबानी घेतला होता त्यांनतर आपणास यवतमाळ -वाशीम लोकसभा मतदार संघाची उमेदवारी केंद्रीय मंत्री मनेका गांधी दिल्याची घोषणा पत्रकार परीषदेत केली त्यानंतर कोण अशी विचारणा करीत त्यांचे ते पुत्रप्राप्ती साठी दरबार घेतात व अनेक चंद्रपूर व यवतमाळ येथील महिलांच्या गंभीर तक्रारी भाजप नेत्यांनी  प्रेमसाईंची बदनामी सुरु केली त्यांनतर चंद्रपूर व यवतमाळच्या या भाजप नेत्यांची तक्रार सरळ अमित शहा मनेका गांधीकडुन करण्यात आली व   दिल्लीत तक्रार केल्यानंतर उलट भाजप नेत्यांना कडक समज देण्यात आल्याची माहीती  भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी जाहीरपने सांगीतले ,मागील  आठवड्यात महाराष्ट्र भाजप अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मनेका गांधी यांनी वारंवार विनंती केल्यावर या बाबाच्या कडे भेट नाकरल्यानंतर संतापलेल्या  मनेका गांधी यांनी  प्रेमसाई बाबांच्या नादात केंद्रीय मंत्री  'वाघ बचाव' आणि 'मुनगंटीवार हटाव' अशी गरळ ओकत असल्याची चर्चा होत आहे. प्रेमसाईबाबा यांना राजकारणात येण्याची इच्छा असणे योग्य आहे मात्र  त्यासाठी मनेका गांधी यांच्या राजकीय पार्श्वभूमीचाही ते वापर करीत आहे मात्र  ज्या अवनी टी १ वाघिणीने १३ जणांचा जीव घेतला होता त्यामुळे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचे नेते सतत आंदोलन करीत होते आता त्याचं प्रकरणाचे प्रेमसाई यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठीच मनेका गांधी यांनी वापर करावा हा प्रकारच चुकीचा असल्याची टीका किशोर तिवारी यांनी केली आहे . 
खदानी व उद्योगासाठी अवनी टी १ वाघिणीचा  खात्मा हा आरोप बिनबुडाच्या  
ज्या वाघग्रस्त भागात तसेच राळेगाव व केळापूर तालुक्याच्या ज्याभागात  अवनी टी १ वाघिणीने १३ जणांचा जीव घेतला त्याभागात वा त्याचा १०० किलोमीटर एकही खदानी वा उद्योग सुरु नाही वा एकही खदानी वा उद्योगाचा कोणताही प्रस्ताव नाही अशा राळेगाव केळापुर तालुक्यातील ७० आदीवासी बहुल खेड्यात सुमारे १ लाखावर निष्पाप शेतकरी व आदीवासी  जनजीवन जवळ जवळ संपले असतांना बिर्ला आणि अंबानी यांच्या उद्योगांसाठीच अवनी वाघिणीची शिकार केल्याचा आरोप करणे एक प्रकारची दिवाळखोरी असल्याची टीका सुद्धा तिवारी यांनी केली. 
मनेका गांधीसह सर्व वन्यजीव प्रेमींवर १३ जीव गमावलेल्या कुटुंबाचे नातलग तसेच हजारो कोटीचे पीक नुकसानीचे व सदोष मानववध दावे ठोकणार 
शहरात राहणारे चाकरमाने व विदेशी पैशावर वन्यजीव प्रेम करणारे पोटभरू एन जी ओ ज्या कार्यकर्त्यांवर व मनेका गांधी वन्यप्राण्यामुळे होत असलेली प्रचंड प्राणहानी व पिकांचे हजारो कोटींचे नुकसान यांचे सामुहिक दावे गावकरी आदीवासी दाखल करतील तसेच  १३ जीव गमावलेल्या कुटुंबाचे नातलग फौजदारी कारवाईसाठी पहिले पोलीसात तक्रार दाखल करतील व नाकर्त्या पोलिसवाल्यांची कारवाही केली नाही तर न्यायालयात दाद मागतील कारण सध्या पांढरकवडा वन विभागात वाघांची संख्या प्रत्येक वर्षी वाढतच आहे जवळच्या टिप्पेश्वर अभयारण्यमध्ये यावर्षी ४ वाघिणी बाहेर आली आहेत . झरी केळापुर मारेगाव वणी राळेगाव येथे सध्या ९ वाघिणीचा आपल्या मुलांसह क्षेत्रासाठी लढा सुरु आहे त्यातच चंद्रपूर जिल्हातून आलेल्या वाघिणीच्या वणी कोळसा खदानीच्या परीसरात हैदौस सुरु झाला आहे यामुळे  अवनी  वाघिणीच्या मेल्याने हा वाद संपणारा नसुन यापरीसरातील सुमारे ५ लाखावर ग्रामीण जनतेच्या जीविताचा प्रश्न उभा झाला आहे यासाठी वन्यजीव कार्यकत्यांनी ,मनेका गांधींसारख्या नेत्यांनी एकात्मिक आदीवासी व शेतकरी वाचवा कार्यक्रम लागू करण्यासाठी बसावे लागेल फक्त दिल्ली मुंबई पुण्याला  बसुन प्रेस नोट काढणे व विदेशी पैशाने उच्चं वा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याने हा प्रश्न पुन्हा पुन्हा समोर येणार अशी भीतीसुद्धा किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे . 

===============================================================================

No comments: