Wednesday, November 21, 2018

प्रेमदास ताकसांडे यांची आत्महत्या विदर्भाच्या अभूतपूर्व नापिकीच्या संकटामुळे - शेतकरी मिशनच्या सत्यशोधन अहवालात भीषण कृषी संकट आले समोर

प्रेमदास ताकसांडे यांची आत्महत्या विदर्भाच्या अभूतपूर्व नापिकीच्या संकटामुळे - शेतकरी मिशनच्या सत्यशोधन अहवालात भीषण कृषी संकट आले समोर 
दिनांक -२१ नोव्हेंबर २०१८
सध्या शेतकरी आत्महत्याग्रस्त विदर्भ व मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात कोरड्या दुष्काळाचा फटका बसला असतांना ज्या तालुक्यात सरासरी ७० ते ९० टक्के पाऊस झाला त्या तालुक्यात पूर्वी पावसाच्या खंडाने आता पर्यावरणाच्या प्रचंड बदलाने कापुस सोयाबीन धान व तुरीचे पीक अभूतपूर्व नापिकीच्या संकटात आले असुन शेतकऱ्यांचे उत्त्पन्न फक्त ३० ते ४० टक्के येत असुन त्यातच गुलाबी अळीचा हल्ला उशिरा का होईना पण मोठ्या प्रमाणात सिंचन करून कापुस घेण्याचा प्रयन्त करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांना फटका बसला आहे . पर्यावरणाच्या प्रचंड बदलाने बदलाने तापमानात झालेली प्रचंड वाढ संपूर्ण तुरीचे पीक नष्ट करीत आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या अडचणीत कमालीची वाढ झाली असुन यामुळे प्रचंड नैऱ्याश   पसरले असल्याचे सत्य या कठीण समयी सरकारी अधिकारी व कर्मचारी जनतेशी योजनांचा फायदा तर सोडा मात्र सदा संपर्कही करीत नसल्याचे कटू सत्य कै .वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शेतकरी आत्महत्यासाठी जगात प्रसीद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या पाथरी गावात दलीत शेतकरी प्रेमदास ताकसांडे यांनी केलेल्या १५ नोव्हेंबरच्या आत्महतेच्या संदर्भात २० नोव्हेंबरला त्यांच्या घरी भेट दिल्यावर समोर आले हे सत्य आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर करणार असल्याचे किशोर तिवारी यांनी सांगीतले . 
आपल्या अहवालात किशोर  तिवारी यांनी प्रामुख्याने मांडले आहेत 
१-मस्तवाल सनदी व पोलीस अधिकारी - महाराष्ट्र सरकारने वारंवार आदेश काढल्यांनंतरही २० नोव्हेंबर पर्यंत एकही सनदी वा उच्चं स्तरीय पोलीस अधिकारी चौकशीला आला नसल्याचे सत्य प्रेमदास ताकसांडे यांच्या पत्नी तुळसाबाई ताकसांडे यांनी सांगीतले फक्त पटवारी कृषी सहायक आल्याचे सांगीतले . किशोर तिवारी यांच्या भेटीच्या वेळीही उपविभागीय अधिकारी ,उपविभागीय पोलीस अधिकारी फक्त १० किलोमीटरवर वातानुकूल केबिन मध्ये बसले होते मात्र विभागीय आयुक्त ,जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक  विनंती केल्यावरही कोणीच आला नाही तेव्हा मौदा  या ठिकाणी ५ किलोमीटरवर पांढरकवड्याचे ठाणेदार आठवडी बाजाराची वसुली करीत असल्याचे कळल्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी विनंती केल्यावर त्याठिकाणी आले .त्याच प्रमाणे तिवारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा आरोग्य अधिकारी ,जिल्हा पुरवडा अधिकारी यांना फोन लाऊन कमीतकमी तालुक्याच्या अधिकाऱ्यांना पाठवा अशी विनंती केली त्यांनतर मस्तावलेले अधिकारी त्याठिकाणी आले . सध्या आमदार खासदार यांना पोसा व शेतकरी मरत असलेल्या जनतेला वाऱ्यावर सोडा अशी भूमिका अधिकाऱ्यांनी खेतली असल्याचे कटू सत्य तिवारी यांनी आपल्या अहवालात मांडले आहे . 
२-पीककर्ज माफीचा लाभ व नवे कर्ज पीककर्ज मिळाल्यानंतरही आत्महत्या - प्रेमदास ताकसांडे हे आपल्या ४ एकर जमिनीसाठी नियमित पीक कर्ज घेणारे असल्याने पीक कर्जमाफीमध्ये त्यांना १५ हजार रुपये मिळाले होते ,मात्र दलीत असतांना त्यांना एकही कृषी योजनेचा लाभ मिळाला नसल्याचे तुळसाबाई ताकसांडे यांनी सांगितले,
. प्रचंड कापसाची व तुरीची नापिकी - यावर्षी फक्त जेमतेम १ क्विंटल कापसाचे उत्त्पन्न आले असुन प्रत्येक वर्षी कमीत कमी २० क्विंटल कापुस होते यामुळे प्रेमदास प्रचंड चिंतेत होते साऱ्या परिसराची परिस्थिती अशीच असल्याची माहीती यावेळी शेतकरी व पाथरीचे सरपंच राजू पेंदोर व मोहद्याचे सरपंच विजय तेलंगे यांनी दिली 
४. उज्वला गॅस योजनेत लाभ पण सिलिंडर भरण्यास पैसे नाही - उज्वला गॅस योजनेत गॅस कनेक्शन मिळाले मात्र सिलिंडर १२०० रुपयात देत असल्यामुळे विकत घेणे कठीण झाल्याचे तुळसाबाई ताकसांडे यांनी सांगितले. जंगलात वाघ असल्यामुळे आता अनेक वेळा  चुली जळत नसल्याची माहितीही त्यांनी दिली . 
५. दलीत असुनही रमाई योजनेचा लाभ नाही - प्रेमदास यांनी घर तट्टे व प्लास्टिक बांधून प्रचंड गरीबीत दिसले मात्र डोळ्याला पट्टी बांधलेल्या अधिकाऱ्यांना हे दिसत नसल्याची खंत तिवारी यांनी अहवालात व्यक्त केली. 
६-वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभार - या भेटीत वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता सह सर्व अधिकारी कार्यालयात बसले असतांना त्यांनी पाथरीला लाईनमन पाठविला होता .दिवसा कधीच लाईन येत नाही व रात्री वाघ असल्यामुळे शेतकरी शेतात जाऊ शकत नाही यामुळे पाणी असूनही आम्ह्चे पीक बुडाले अशी तक्रार सर्वच शेतकऱ्यांनी यावेळी केली मात्र माजलेले वीज वितरण कंपनीचे अधिकारी सरळ वीजमंत्र्यांचा हवाला देत त्यांना भेटा असा निरोप देत असल्याची तक्रार यावेळी शेतकऱ्यांनी केली . 
७- आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा -प्रेरणा प्रकल्प कागदावर -   प्रेमदास बी वर्गातील नैरायात होता मात्र यांचे उपचार करण्याची जबाबदारी आमची नाही अशी माहीती तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली . प्रेरणा 
प्रकल्पाचा एकही अधिकारी आरोग्य विभागाकडून आला असल्याचे  तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी यावेळी सांगीतले , प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध व उपचार करण्याची आम्हाला सक्ती नाही आम्ही रोगराई रोखण्यासाठी असल्याची अफलातून माहीती यावेळी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली ,डॉक्टर कर्मचारी अपुरे असल्याने व प्राथमिक आरोग्य केंद्राची लहान लहान डागडुगी होत नसल्याची तक्रारही त्यांनी यावेळी केली तर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी हे माझ्या हातात नाही असे सांगीतले . 
८- प्रेमदास ताकसांडे मदतीस प्रात्र नाही  - प्रेमदास ताकसांडे यांचेवर थकीत पीककर्ज नसल्याने व ते प्रामाणिक शेतकरी असल्यामुळे पत्नी तुळसाबाई ताकसांडे यांना मदत मिळणार नाही असे तात्काळ तलसीलदारांनी सांगीतले तर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी चक्क प्रेमदास ताकसांडे मनोरुग्ण होता असे  घोषीत करण्याची तयारी केल्याचे अहवालात तिवारी म्हटले आहे . 
विदर्भ व मराठवाड्यातील ५० लाखावर शेतकरी दुष्काळ व नापीकीमुळे दररोज ४ ते ५ शेतकरी आत्महत्या करीत आहेत तर भ्रष्ट व्यवस्था त्यांच्या टाळू वरचे लोणी खात असल्याची खंत तिवारी आपल्या अहवालात व्यक्त केली आहे -. 

No comments: