प्रितीश नंदीचे आरोप बिनबुडाचे -नरभक्षक अवनी हत्येच्या विरोधात सुरु असलेली मोहीम वन्यप्राणी व मानव संघर्षात आग ओकणारी -किशोर तिवारी
दिनांक -१५ नोव्हेंबर २०१८
आज सध्या भारताच्या वाघांचे चित्रीकरण व वन्यप्राणी प्रेमापोटी गांधारीप्रमाणे डोळ्याला पट्टी बांधून आंधळ्याचे ढोंग करणाऱ्या अतिरेकी निसर्गप्रेमींच्या रांगेत प्रसिद्ध पत्रकार व सिनेनिर्माते प्रितीश नंदी यांनी मुंबईच्या आपल्या पंचतराकिंत वातानुकूल जुहू चौपाटीच्या घरात बसुन अवनीच्या हत्येचे सत्य आपणास साक्षात्कार झाल्याने कळले असुन व त्यांनी एका हिंदी राष्ट्रीय दैनिकात लेख लिहून सादर केलेली सत्यता वस्तुस्थितीचा विपर्यास असल्याने अशा बिनबुडाच्या प्रचाराने सध्या प्रचंड प्रमाणात मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस बिकट स्थिती धारण करत असल्याने वन्यप्राण्यांविरुद्ध टोकाच्या भुमिकेत जात असुन वन्यप्राणी प्रेमीजनांनी हा वाद संपवावा अशी कळकळीची विनंती शेतकरी जळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी केली आहे .
प्रितीश नंदी यांनी जे आरोप केले आहेत त्यांनी जे सत्य उकळल्याचे लिहले आहे त्यामध्ये ज्या वाघग्रस्त भागात तसेच राळेगाव व केळापूर तालुक्याच्या ज्याभागात अवनी टी १ वाघिणीने १३ जणांचा जीव घेतला त्याभागात वा त्याचा १०० किलोमीटर एकही खदानी वा उद्योग सुरु नाही वा एकही खदानी वा उद्योगाचा कोणताही प्रस्ताव नाही अशा राळेगाव केळापुर तालुक्यातील ७० आदीवासी बहुल खेड्यात सुमारे १ लाखावर निष्पाप शेतकरी व आदीवासी जनजीवन जवळ जवळ संपले असतांना बिर्ला आणि अंबानी यांच्या उद्योगांसाठीच अवनी वाघिणीची खात्मा केल्याचा आरोप २००९ मध्ये सर्व नियम धाब्यावर ठेऊन आघाडी सरकारने ऐन निवडणुकीची आचार संहीता लागण्यापूर्व अनिल अंबानी यांच्या उद्योग समुहाला यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील चनाखा, घुबडी, निमडेली व कारेगांव या खेड्यातील हजारो एकर जमिन फुकटात दिली होती किशोर तिवारी यांनी बिर्ला अंबानी यांच्या साठी अवनी मारल्याचा आरोपावर जगाला माहिती देण्यासाठी वस्तुस्थिती दाखविणारा यवतमाळ नकाशाच प्रकाशीत केला असुन प्रितीश नंदी सारख्या मुंबई पुण्याला बसुन लेख लिहणे व विदेशी पैशाने उच्चं वा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे तसेच फोटो काढण्यासाठी वाघावर छंद म्हणुन निष्पाप आदिवासी व शेतकऱ्यांच्या जिवापेक्षा नरभक्षक वाघिणीसाठी ओरड करणारे पाखंडी नेत्यांनी संयम ठेवण्याचा सल्ला किशोर तिवारी दिला आहे .
एकीकडे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात निष्पाप मरणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे त्याचवेळी वेगवेगळ्या कारणांमुळे वन्यप्राण्यांच्या मृत्यूचा आकडा वाढत आहे. निसर्ग आणि वन्यजीव यांच्याविषयी नव्या पिढीत आस्था वाढविण्यासाठी वन विभागाने मागील चारवर्षात वन्य जीव संरक्षण जनजागृतीपर उपक्रम मोठा प्रमाणात हाती घेतला त्यातच मानव आणि वन्यजीव यांच्यातील प्रत्यक्ष अन् अप्रत्यक्ष संघर्षांवर समाधान न शोधता अतिरेकी भुमिका घेणे सर्वांना चुकीचे राहणार असा इशारा यावेळी किशोर तिवारी यांनी दिला .

सध्या नागरी वसाहतीत शिरकाव करणाऱ्या वन्य प्राण्यांचे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. गत पाच वर्षांत बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्रात अनेक ठार तर शेकडो जण जखमी झाले आहेत त्यातच लांडग्याच्या हल्ल्यात सुद्धा अनेकजण ठार तर शेकडो जण जखमी झाले. उसाच्या क्षेत्रात वास्तव्य करणे पसंत करणाऱ्या बिबटय़ाचे पाळीव प्राणी हे खरे भक्ष्य. त्यामुळे त्याच्या भक्ष्यस्थानी पडणाऱ्या पाळीव प्राण्यांची संख्या मोठी आहे. बिबटय़ाच्या हल्ल्यात १० हजारावर शेळ्या, मेंढय़ांना तर लांडग्यांच्या हल्ल्यात ही संख्या १००० वर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात होणाऱ्या या नुकसानीपोटी वन विभाग नुकसान भरपाई देत असतो ती हास्यास्पद आहे .वाघाच्या वा बिबटय़ाच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना यापूर्वी दोन लाख रूपयांची मदत दिली जात असे. आता शासनाच्या नव्या निर्णयानुसार दहा लाख रूपये मदतीपोटी दिले जातात. . वन्यप्राण्याच्या हल्ल्यात पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्यास शासनाचा निकष आहे बैल व गायीसाठी प्रती दहा हजार आणि मेंढी व बकरीसाठी प्रत्येकी तीन हजार. त्याचा विचार करता मागील पाच वर्षांत नुकसान भरपाईपोटी लाखो रूपयांची रक्कम वाटण्यात आली आहे.पण, हा संघर्ष अजून तसाच सुरू आहे. या संघर्षांस सर्वाधिक जबाबदार कोण, याची चर्चा सतत होत नसुन त्यातच मनेका गांधी यांच्या प्रेमात अडकलेले प्रितीश नंदी आपली लेखणीने आग ओकत असल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे .
1 comment:
hey find the recent updates here
https://www.xappie.com/top-stories
Post a Comment