Saturday, November 3, 2018

गॅस वितरकाव्दारे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत ग्रामीण भागात हजारोची वसुली -तक्रार देण्याचे शेतकरी मिशनचे आवाहन

गॅस वितरकाव्दारे  प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत ग्रामीण भागात हजारोची वसुली -तक्रार देण्याचे शेतकरी मिशनचे आवाहन 
दिनांक -३ नोव्हेंबर २०१८
भारतामध्ये स्वच्छ इंधन वापरात वाढ घडवून आणणे,महिलांच्या आरोग्यामध्ये सुधारणा घडवून आणणे व महिला सशक्तीकरण करणे, प्रदूषण प्रमाण कामी करणे यासाठी  दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणार्‍या कुटुंबांना  नि:शुल्क एल पी जि  गॅसकनेक्शन उपलब्ध करून देण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१६ प्रासून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील  महिलांना पहिले गॅस  कनेक्शन नि:शुल्क देण्यात येणारी योजना सुरु केली मात्र कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारीं यांचेडून राबविण्यात येत असलेल्या सरकार आपल्या दारी कार्यक्रमात आदीवासी दलित तसेच  दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणार्‍या कुटुंबांतील महिलांनी सतत केलेल्या तक्रारीवरून लक्षात आले आहे की बहुतेक सर्वच गॅस वितरक या गरीबांकडून ३५०० रुपयापासून २५०० रुपयांपर्यंत जबरीने वसूल करीत आहेत तर गॅस सिलींडर सुद्धा रु १२०० ते १५०० रुपयात रिफील करून देत आहेत जे गरीब तक्रार करीत आहेत त्यांना गॅस वितरक  धमकावतात व होते ते करा असा सल्ला देतात वनखात्यामार्फत देण्यात येणाऱ्या गॅस वितरणामध्येही हाच प्रकार होत असल्याचे समोर आले आहे मात्र अन्न नागरी विभागाचे वन खात्याचे तसेच गॅस कंपनीचे अधिकारी गॅस वितरकाकडून मासीक हप्ते खात असल्यामुळे हा गोरखधंदा राजरोसपणे सुरु असल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला असुन ज्या गरीबांकडून अशा प्रकारे निशुक्ल योजनेमध्ये वसुली करण्यात आहे त्यांनी आपणाकडे मोबाईल ९४२२१०८८४६ वर  तक्रार करावी अशी विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे . 

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत केंद्र सरकारव्दारे मागील ३ वर्षांमध्ये ५ कोटी कुटुंबांना नि:शुल्क गॅस कनेक्शन उपलब्ध करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते त्यावर  ८ हजार कोटी रुपये खर्च झाला असून तरीही गरीबांना रोजरोसपणे गॅस वितरकाकडून होणारी वसुली  हा फौजदारी गुन्हा असुन जर या सर्व गरीबांना मुक्याने घेतलेले हजारो कोटी रुपये तात्काळ परत करण्यात यावे यासाठी शेतकरी मिशन मोहीम उघडणार असल्याची माहिती किशोर तिवारी यांनी यावेळी दिली 

======================






No comments: