Monday, November 24, 2014

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुख्यमंत्री व महसूल मंत्र्याकडून होत असलेली उपेक्षा म्हणचे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार -येत्या हिवाळी अधिवेशनात शेतकरी विधवा या मंत्र्यांना मिठाचे पोत भेट देणार

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुख्यमंत्री व महसूल मंत्र्याकडून होत असलेली  उपेक्षा  म्हणचे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार -येत्या हिवाळी अधिवेशनात  शेतकरी विधवा  या मंत्र्यांना मिठाचे पोत भेट देणार 

दिनाक -२५ नोहेंबर २०१४
आजच्या यवतमाळ भेटीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना जिल्हा  पोलीस मार्फत सर्किट हाउसला ताटकळत ठेऊन  महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री  यांना न भेटताच  निघुन गेल्याने  व राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी  सरकारची तिजोरी खाली आहे पिककर्ज ,कापसाला बोनस  व वीज बिल माफी देता येत नाही मोबाइलवरचे बोलणे थांबू नये म्हणून तुम्ही दरमहा मोबाइल बिल भरताच ना! मग वीज बिल नियमित का भरत नाही, अशा शब्दांत  यांनी रविवारी अकोला येथील दुष्काळी आढावा कार्यक्रमात शेतकऱ्यांनाच  उपदेश  दिल्याने विदर्भाचे दुष्काळग्रस्त शेतकरी व्यथीत झाले असून , शेतकरी अभूतपूर्व संकटात असतांना त्यांच्या अडचणी ऐकण्यास वेळ नसणे तर त्यांना दिलासा न देता मस्तवालपणा दाखविणे हा तर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असुन आम्ही  भाजप सरकारला येता हिवाळी अधिवेशनात शेकडो शेतकरी विधवांच्या हातांनी मिठाचे पोत देऊन आपला  त्रागा प्रगट करणार अशा  तिव्र शब्दात शेतकऱ्यांना मदतीच्या  उशिरावर शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी   महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व महसूल मंत्री  वागण्यावर  व्यक्त केली आहे . 
या पुर्वी जेंव्हा जेंव्हा भारताच्या   महामाहीन राष्ट्रपतीसह  केंद्रीय मंत्री यांनी यवतमाळ शहराला भेट दिली त्यांनी वेळात वेळ काठून शेतकरी विधवा व शेतकर्याना  वेळ दिला आस्थेने विचारपुस केली पण ज्या यवतमाळ जिल्यात भारतात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या झाल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  दाभाळी  येथे  विषेय  राष्ट्रीय शेतकरी चर्चा  केली व शेतकरी आत्महत्यांचा  मुददा रेटून केंद्रात व राज्यात सत्ता काबीज केली ते सरकार पदारुड होताच आपल्या जाहिरनाम्यानुसार पिककर्ज ,बीज बिलमाफी  देणार ,लागवड खर्च अधिक ५० % नफा  असा कापसाचा व सोयाबीनचा हमीभाव तात्काळ देणार अशी आशा सर्व विदर्भ मराठवाड्याच्या कोरडवाहू शेतकर्याना होती मात्र मागील सहा महिन्यात भारताच्या मोदी सरकारने ह्या मागण्या विचारातच घेतल्या नाहीत तर आता १५ वर्षानंतर सत्तेवर आलेल्या राज्याच्या भाजप सरकारने चक्क हातच वर केल्यामुळे शेतकरी विश्वासघात  झाल्याचा अनुभव घेत आहेत व  यामुळेच मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत असल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे 

आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  यांना निवेदन देऊन    शेतकरी वाचवा व या कोरडवाहु शेतकऱ्यांना मदतीचा हात द्या अशी विनंती करून खालील मागण्या सादर केल्या आहेत 

-कोरडवाहु शेतकऱ्यांच्या  प्रमुख मागण्या 
१.सर्व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी वीस हजार रुपये सरसकट नुकसान भरपाई वा मदत देणे 
२. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या सात-बारा कोरा करणे 
३. कोरडवाहु शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेमधून प्रती हेक्टरी १०० दिवसाची मजुरी सरळ अनुदान रूपाने देणे 
४. कापूस -सोयाबीन   - धानासाठी  राष्ट्रीय शेतकरी आयोगाच्या शिफारशी प्रमाणे लागवड खर्च अधिक ५० % नफा  असा हमीभाव द्या . 
५-सर्व आदिवासीना तात्काळ  अन्न  सुरक्षा व  खावटी देणे   
दुष्काळग्रस्त आदिवासी  शेतकऱ्यांच्याना व शेतमजुरांना सरसकट  अंत्योदय योजने नुसार अन्न सुरक्षा व  खावटी वाटप  करा . 
६- आरोग्य सेवा 
सर्व दुष्काळग्रस्त  शेतकऱ्यांच्याना व शेतमजुरांना २०१३ च्या यादी नुसार बी पी  एल चे  कार्ड देऊन मोफत वैद्दकिय सेवा  सर्व दवाखान्यात मोफत देणे 
७..सर्व दुष्काळग्रस्त  शेतकऱ्यांच्याना व शेतमजुरांनावृद्धाना व विधवा  मासीक अनुदान -सर्वदुष्काळग्रस्त  शेतकऱ्यांच्याना व शेतमजुरांना शेतकरी विधवा ,परितक्त्या महिलांना दरमहा कमीतकमी हजार रुपये मासीक अनुदान व सरकारी नौकर सारखे प्रत्येक महीन्याला १ तारखेला बँकेतून देण्याची योजना दया ,अशी माहिती किशोर तिवारी यांनी दिली मात्र सरकार या मागण्यावर गंभीर नसुन शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास टाळाटाळ  करीत असल्याचा आरोपही तिवारी यांनी केला आहे . 

No comments: