Thursday, January 18, 2018

बियाणे कंपन्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी गावस्तरीय शाश्वत बियाणे बँक योजना राबविणार - जरूर येथील "सरकार आपल्यादारी कार्यक्रमात " किशोर तिवारी यांची घोषणा

बियाणे कंपन्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी गावस्तरीय  शाश्वत बियाणे बँक  योजना राबविणार - जरूर येथील "सरकार आपल्या दारी " कार्यक्रमात  किशोर तिवारी यांची घोषणा 
दिनांक -१८ जानेवारी २०१८ 
सध्या महाराष्ट्रात  विदर्भ मराठवाड्यातील कापूस पिकाखाली ४४ लाख हेक्टरचे क्षेत्र असून ऑक्टोबर नंतर सर्वच  ठिकाणी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे हे सत्य आहे  शेतकऱ्यांनी अमेरीकेच्या बी टी बियाणांवर बोंडअळीचा  हल्ला होत नाही या बियाणे कंपन्यांच्या दाव्यावर  ठेऊन बोंडअळीचा पेरणी केली आता राज्यात १२ लाखावर शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी सुमारे ५ हजार कोटीच्या वर अधिकृत तक्रारी सादर केल्या आहेत व महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस  सरकारने अडचणीतल्या शेतकऱ्यांना दिलासा देत कापुस उत्पादकांना  ऐतिहासिक हेक्टरी ३० ते ३८ हजार मदत जाहीर केली असुन बियाणे कंपन्यांनी आजपर्यंत याच शेतकऱ्याकडून हजारो कोटींची कमाई केल्यानंतर आता कोर्टाची भाषा व पुढील वर्षी बियाणेच  देणार नाहीत अशा धमक्या देत सरकार  व शेतकऱ्यांनी वेठीस धरण्याचा प्रयन्त सुरु केला असुन आता या बियाणे कंपन्यांची मक्तेदारी  संपविण्याची वेळ आली असुन   कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा. मिशनने हे आवाहन स्वीकारले असुन येत्या खरीप हंगामपासून ग्रामस्तरीय शाश्वत बियाणे बँक  ही योजना पंजाबराव कृषी विद्यापीठ  , केंद्रीय कापुस संशोधन  संस्था व महाबीजच्या सहकार्याने सुरु करणार असल्याची घोषणा अध्यक्ष किशोर तिवारी यांनी  यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी  तालुक्यातील जरूर येथील "सरकार आपल्या दारी" या कार्यक्रमात केली  आहे . 
महाराष्ट्र सरकारच्या बळीराजा चेतना अभियानाचा एक भाग म्हणून ग्रामीण जनतेच्या विकासाच्या व लोककल्याणाच्या योजना राबविणाऱ्या विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांना गावाच्या चावडी हजर करून सर्व तक्रारीचे समाधान करण्यासाठी असा अभिनव उपक्रम शेतकरी मिशन तर्फे आयोजित करण्यात येत असुन हळुहळु सर्व राजकीय पक्षाच्या व सामाजिक संघटनांच्या सहकार्याने या मोहीमेला गती आली असुन व जिल्हा प्रशासनाने अशा कार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन करण्यास पुढाकार घेतला असल्यामुळे सर्व विभागाचे अधिकारी या सरकार आपल्यादारी कार्यक्रमाला उपस्थित रहात असल्यामुळे एक चळवळ म्हणुन समोर येत आहे . 

जरूर येथील "सरकार आपल्या दारी" या कार्यक्रमात सौ. कालींदाताई आत्राम सभापती पं.स. घाटंजी, सौ. सरिता मोहनराव जाधव जि.प. सदस्या शिवणी सर्कल,  मोवाडा, सुनीता पेंदोर सरपंच, मोरेश्वरराव वातिले उपसरपंच, मोहण जाधव, अंकित नैताम,तुळशीराम आत्राम सरपंच  जि.के. हामंद तहसिलदार घाटंजी, एम.एस. चव्हाण गट विकास अधिकारी घाटंजी, आर.व्ही. माळोदे ता. कृषि अधिकारी, श्री मडावी सा. वनिकरण उपवि. अधि., श्री. भावसार साहेब ठाणेदार घटंजी, डॉ. उमरे ता.आरोग्य अधिकारी, श्री. शेजे उपविभागिय अभियंता, श्री.डोंगरे सहाय्यक निबंधक, श्री. चव्हाण पशु संवर्धन, मंडळ अधिकरी व तलाठी ग्रामसेवक आदि. मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन मधुकर सातपुडके यांनी  तर  प्रास्ताविक मोरेश्वर वातीले यांनी तर आभार प्रदर्शन नंदु तुमराम यांनी केले 
यावेळी सरपंच सुनीता पेंदोर , संजय जिवतोडे रघुनाथ वहीले, संजय पेंदोर, मधुकर सातपुडके, अरूण सिडाम, काशीराम वेट्टी परबतराव कोवे, संजय मेश्राम, कल्पनाताई कोटनाके, कलाताई कीनाके, राहुल वनकर, नीलकंठ करमनकर, लक्ष्मण आञाम यांनी प्रचन्ड तक्रारी मांडल्या यावेळी  परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
=================================================
============================

No comments: