Monday, June 18, 2018

ग्रँड मराठा फाऊंडेन्शन कडून शेतकरी विधवा व शेतकऱ्यांच्या मुलांना मदतीचे वाटप

ग्रँड मराठा फाऊंडेन्शन कडून शेतकरी विधवा व शेतकऱ्यांच्या मुलांना मदतीचे वाटप 

दिनांक -१९ जुन २०१८

इंग्लंड येथे स्थायिक झालेले प्रसिद्ध व्यावसायिक रोहीत शेलाटकर यांनी विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी विधवा व कर्जबाजारी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या पाल्यांना उच्चं शिक्षणाकरिता मागील पाच वर्षापासुन ग्रँड मराठा फाऊंडेन्शने  माध्यमाने भरीव मदत करीत असुन यावर्षी सुद्धा पांढरकवडा येथे झालेल्या कार्यक्रमात शेतकरी विधवा व अभियांत्रिकी संगणक शिक्षणासाठी शेतकरी विधवा व शेतकऱ्यांच्या मुलांना मदतीचे वाटप करण्यात आले . यावेळी कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी उपस्थित होते 
सायखेडा येथील आदिवासी शेतकरी विधवा चंद्रकला मेश्राम तसेच मोरवा येथील आदिवासी शेतकरी विधवा कमलबाई सुरपाम यांना ग्रँड मराठा फाऊंडेन्शनचे संचालक राजेश तावडे यांच्या हस्ते खरीपाच्या पेरणीकरीता  मदत करण्यात आली . अभियांत्रिकी पदवी पूर्ण करण्यासाठी वार्षिक फी भरण्यासाठी जयंत गावंडे, संतोष कांबळे ,उमरखेडचे वैभव हुंबाडे ,पुण्याच्या सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अमृता शिखरे तसेच संगणक पदविकेच्या  शिक्षणासाठी  शेतकरी विधवेची मुलगी वैष्णवी  कोपुलवार ,आदीवासी शेतकऱ्याची मुलगी समीक्षा गेडाम यांना पदाविका   पूर्ण करण्यासाठी वार्षिक फी भरण्यासाठी मदतीचा धनादेश ग्रँड मराठा फाऊंडेन्शनचे संचालक राजेश तावडे यांनी दिला . 
इंग्लंड येथे स्थायिक झालेले प्रसिद्ध व्यावसायिक रोहीत शेलाटकर यांनी पोलंडवरून सर्व शेतकरी विधवा व विद्यार्थींशी सवांद साधला प्रत्येक अडचणीत मदतीला धावून येण्याचे आश्वासन यावेळी दिले . 
जयंत गावंडे व  संतोष कांबळे यांनी यावर्षी अभियांत्रिकी पदवी पूर्ण करीत असुन त्यांना सुरवातीला रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी रोहीत शेलाटकर यांनी . 
उमरखेड येथील संकटात असलेले शेतकरी हुबाडे यांनी मागीलवर्षी किशोर तिवारी यांचेशी संपर्क केल्यावर अभियांत्रिकी पदवी पूर्ण करण्यासाठी फीची मदत ग्रँड मराठा फाऊंडेन्शन मार्फत उपलब्ध करून दिली तशीच मदत शेतमजूराची मुलगी अमृता शिखरे हिला मागील वर्षांपासून पुणेयेथील संपूर्ण खर्चाची मदत करण्यात येत आहे . 
ग्रँड मराठा फाऊंडेन्शनचे संचालक राजेश तावडे यांच्या हस्ते मागील वर्षी सुद्धा १०० शेतकरी विधवांना खरीपाच्या पेरणीकरीता  कापुस व सोयाबीनच्या बियाणांचे वाटप  करण्यात आले होते . रोहीत शेलाटकर यांनी विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरीता नागपूरच्या मिहानमध्ये प्रकल्प टाकण्याचा निर्णय घेतला असुन याकरीता मागील आठवड्यात मिहानला भेट सुद्धा देण्यात आली आहे . 
=================================================================


No comments: