Friday, August 17, 2018

वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती हीच अटल बिहारी वाजपेयी यांना खरी श्रद्धांजली -किशोर तिवारी

वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती हीच अटल बिहारी वाजपेयी यांना खरी श्रद्धांजली -किशोर तिवारी 
दिनांक-१७ ऑगस्ट २०१८

भाजप पक्षाच्या भारतीय जनसंघापासुन  छोट्या राज्याची निर्मितीला सुयोग्य प्रशासन व समतोल विकासासाठी पाठिंबा होता व यामुळेच स्व.अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असतांना २००४ मध्ये एका झटक्यात त्यांनी झारखंड, छत्तीसगड व उत्तराखंड या तीन नवीन राज्याची निर्मिती केली होती. परंतु आपल्या भुवनेश्वर येथील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या १९९० दशकातच वेगळ्या विदर्भ राज्य निर्मितीचा ठराव एकमताने मंजूर सुद्धा करण्यात होता झारखंड, छत्तीसगड व उत्तराखंड या तीन नवीन राज्याची निर्मिती अटल बिहारी वाजपेयी यांनी केली तेंव्हा वेगळ्या विदर्भासाठी त्यांनी त्यावेळी आग्रह धरला होता मात्र शिवसेनेची राजकीय नाराजी टाळण्यासाठी त्यावेळी 
सर्वात जुनी मागणी असलेला विदर्भ राज्य स्व.अटल बिहारी वाजपेयी कार्यकाळात होऊ शकला नाही, याचे शल्य त्यांना अखेरपर्यंत होते. ती भावना खुद्द अटलबिहारी वाजपयी यांनी अनेकवेळा  एका  बोलून दाखविली होती. एका राज्याच्या निर्मितीसाठी जे काही शक्य आहे, ते सर्व विदर्भात आहे, परंतु मुंबई व पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांच्या राजकीय दबाबामुळे हे शक्य झाले नाही मात्र आज केंद्रात व राज्यात भाजपची अमर्याद सत्ता आहे तसेच केंद्रात कट्टर विदर्भवादी नेते  नितीन गडकरी वजनदार मंत्री आहेत तर राज्यात कट्टर विदर्भवादी नेते देवेंद्र फडणवीस व सुधीर मुनगंटीवार मुख्यमंत्री व अर्थमंत्री आहेत अशा वेळी स्व.अटल बिहारी वाजपेयी यांना खरी श्रद्धांजली देण्यासाठी व त्यांचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांची सहमतीने महाराष्ट्राच्या विधिमंडळात विदर्भाचा ठराव समत विदर्भ राज्य निर्माण करावे अशी कळकळीची विनंती विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष व महाराष्ट्र्र सरकारच्या कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी स्व.अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धाजंली व्यक्त केली आहे . 

ज्यावेळी २००४ मध्ये  स्व.अटल बिहारी वाजपेयी यांनी झारखंड, छत्तीसगड व उत्तराखंड या तीन नवीन राज्याची निर्मिती केली त्यावेळी महाराष्ट्रात विदर्भ राज्याचा विरोध करणाऱ्या शिवसेनेच्या भाजपला कुबड्या घेण्याची गरज होती आता २०१८ मध्ये राजकीय समीकरण बदलले आहेत केंद्रात व राज्यात भाजपची अमर्याद सत्ता आहे तसेच केंद्रात कट्टर विदर्भवादी नेते  नितीन गडकरी वजनदार मंत्री आहेत तर राज्यात कट्टर विदर्भवादी नेते देवेंद्र फडणवीस व सुधीर मुनगंटीवार मुख्यमंत्री व अर्थमंत्री आहेत त्यामुळे विदर्भ राज्य निर्मितीचा मार्ग सुकर झाला आहे मात्र नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांनी स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्या विदर्भ राज्याच्या निर्मितीच्या स्वप्नपूर्ती गंभीरपणे प्रतिष्ठापणाला लावून प्रयन्त करावे  असे आवाहन किशोर तिवारी यांनी केले आहे. 
===========================
============

No comments: