Sunday, August 11, 2019

उन्नत शेती व महाराष्ट्रातील कृषी संकट

उन्नत शेती व महाराष्ट्रातील कृषी संकट -किशोर तिवारी (शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते )

लहरी निसर्ग आणि ग्रामीण महाराष्ट्रात रोजगाराच्या अत्यल्प संधी यामुळे छोटय़ा शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. शेतकऱ्यावरील हे संकट दूर करण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे असल्याने  शेती उत्पादकतेविषयी  मागील  ५ वर्षांपासून विषेय प्रयन्त होत आहेत त्यातच 'उन्नत शेती, समृद्ध शेतकरी' हे महत्‍त्‍वाकांक्षी  संकल्पना अस्तित्वात आली आहे त्यातच या वर्षी नवीनच निवडणून आलेल्या भाजप सरकारने झीरो बजेट शेतीची अफलातुन योजनेला विषेय महत्त्व दिले  यामुळे राज्य सरकारच्या 'उन्नत शेती, समृद्ध शेतकरी' या महत्‍त्‍वाकांक्षी अभियानाला आता कृषी अधिकारी व निकाम्या कृषी विद्यापीठानी बाजूला केले आहे . 
सध्या शेती क्षेत्रावरील अरिष्टाची छाया गडद होत असल्याचे आपल्या निदर्शनास येत आहे  या अरिष्टामागची कारणे जाणून घेऊन ती दूर करण्यासाठी उपाय व  शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या कमी करण्याचे आवाहन केंद्र व राज्य सरकारांसमोर आहे कारण कृषी क्षेत्रात हरितक्रांती आल्यावर कृषी मधील खर्च उत्पादनाच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली त्यातच भारतीय शेती क्षेत्रातील जवळपास सर्व पिकांची उत्पादकता जागतिक पातळीपेक्षा लक्षणीय प्रमाणात कमी राहिल्यामुळे भारतातील शेतकरी मागील ७० वर्षात गरीब झाला आहे आता या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतमालाचे दर हेक्टरी उत्पादन वाढविणे हा विवेकी पर्याय उन्नत शेतीच्या माध्यमातून सरकारने सुरु केला आहे मात्र एकीकडे  'उन्नत शेती, समृद्ध शेतकरी' हे महत्‍त्‍वाकांक्षी  संकल्पना सुरु करावयाची त्याच वेळी झीरो बजेट शेतीची अफलातुन योजनेला विषेय निधी उपलब्ध करावा यामुळे सरकारच्या काम करण्याच्या गंभीरतेवर प्रश्न उठतात कारण एकीकडे शेतकऱ्यांची मते मिळविण्यासाठी  त्यांच्यावर अनेक सवलतींचा वर्षांव केला जातो पण यासर्व  सर्व आर्थिक सवलतींचा उद्देश शेती क्षेत्रातील उत्पादनवाढ व्हावी असा असतो परंतु तो साध्य होत  नाही हे सत्य चिंतेचा विषय आहे कारण अशा सवलतीवर  सरकारने अशी वारेमाप उधळपट्टी केल्यामुळे शेती क्षेत्राच्या विकासासाठी संशोधन व विस्तार कार्यक्रमावर खर्च करायला सरकारकडे पैसा उरलेला नाही आणि अशी गुंतवणूक केल्याशिवाय शेती क्षेत्रात उत्पादकता वाढणार नाही व उन्नत शेती, समृद्ध शेतकरी' हे महत्‍त्‍वाकांक्षी  संकल्पना पूर्ण होणार नाही . 
सध्या कृषी संकटाचे प्रमुख कारण  सीमांत व अल्पभूधारक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती आहे कारण त्यांच्या शेती उत्पादनावर गुजारा करण्याचे ठरविले तर त्यांची उपासमार होईल हे निश्चित आहे त्यातच  देशातील अशा कुटुंबांची टक्केवारी एकूण शेतकरी कुटुंबांच्या ८५ टक्के एवढी आहे. अशा दुर्बल शेतकरी कुटुंबांना वर्षभर उत्पादक काम मिळत नाही हेच त्यांचे शेती उत्पन्न कमी असण्यामागचे प्रमुख कारण आहे.  

'उन्नत शेती, समृद्ध शेतकरी' हे महत्‍त्‍वाकांक्षी  संकल्पना ही देशाला नवीन नाही कारण स्वातंत्र्याच्या पहिल्या दशकामध्ये उद्योजकता व कारखानदारीकडे लक्ष दिले गेले होते त्यानंतर  ७० च्या दशकात शेतीकडे लक्ष दिल्याने धरणांची साखळी, मोठी धरणे वाढली. लोकसंख्या वाढल्याने अन्नधान्य, तेलबियांची गरज वाढली व ती आयात करणे परवडत नसे. त्यामुळे देशाची गरज भागविण्यासाठी उन्नत संकरीत वाणांचा वापर करून पाणी, रासायनिक खते देऊन रोग व कीड व्यवस्थापन करून उत्पादन टप्प्या - टप्प्याने वाढले व भुकबळी कमी होऊन आयात कमी झाली. यामध्ये डॉ. एम. एस. स्वामिनाथन या भारतीय शास्त्रज्ञाचे व डॉ. नॉर्मन बोरलॉग या नोबेल पारितोषिक विजेत्या शास्तज्ञाचे जगातील भुक मिटविण्यामध्ये फार मोठे योगदान ठरले आणि अशा रितीने भारत देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झाला. नवीन वाणांचा वापर, त्याला योग्य निविष्ठा, पाण्याची उपल्बधता, योग्य पोषक हवामान व कीड - रोगांसाठी उपलब्ध असलेल्या रासायनिक निविष्ठा यामध्ये वाढत्या लोकसंख्येची गरज भागविता येणे शक्य झाले होते परंतु अधिक समृद्धी आणि विकास याच्या मागे माणूस लागल्याने आणि भारतसारख्या विकसनशील राष्ट्रांना आधुनिकरण, औद्योगिकीकरण याचा आधार घेऊन विकासाची गरज भासल्याने ग्रामीण जमीन कमी होऊन जिल्हावार, तालुकावार व त्या - त्या भाजीपाला, फळबाग पट्ट्यातील लागवड व कारखानदारी उत्पादनासाठी न वापरता सुखासीन व अती सुखाधीन यामुळे माणूस हा पर्यावरणाचा नाश करून सिमेंटची जंगले उभारून शहरी, निमशहरी, निमग्रामीण शहरे विकसीत झाली आहेत  तेथे शैक्षणिक सुविधा वाढल्या, ग्रामीण रोजगार वाढला आणि या सर्वांचा परिणाम निसर्गावर झाला. ही सुरुवात १९७२ पासून झाली. खरे पाहता १९६० सालापासून रस्त्यांचे डांबरीकरण, हायवे निर्मिती याने उष्णता वाढली, ओझोनचा थर कमी झाला. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा या ऋतुमधील हवामानातील चढ - उतार याने हवामानाची मानके - दररोजचे तापमान, आर्द्रता, थंडीचे प्रमाण, ढगाळ वातावरण, आभाळ येणे, गारा पडण्याचे प्रमाण, पाऊस पडण्याचा काळ - वेळ यांचे संतुलन पुर्णपणे कोलमडले हे सत्य आहे . 
एकीकडे 'उन्नत शेती, समृद्ध शेतकरी' हे महत्‍त्‍वाकांक्षी  संकल्पना तर दुसरीकडे  शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करावे यासाठी  आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संद्रिय शेतीसारखा पारंपारिक व अत्यावश्यक गोष्टींचा वापर करून कृषी उत्पादन वाढविता येईल काय यावर चर्चा सुरु आहे . शेतकऱ्यांच्या सर्व गरजा ह्या वेळेवर व योग्य दरामध्ये आवश्यक तेवढ्या मिळाव्यात. म्हणजे त्यांचा उत्पादन खर्च वाढणार नाही. वेळेवर दर्जा व उत्पादन मिळेल. अन्नधान्य, कडधान्य यांचे दुप्पट उत्पादन झाल्यावर त्याचे पॅकिंग, वाहतुक व्यवस्था, टिकवण क्षमता, त्याचे मुल्यवर्धन व प्रक्रिया उद्योगात रूपांतर करण्यासाठी लागणारे आधुनिक तंत्रज्ञान, उच्च दर्जाच्या निविष्ठा, यंत्रसामुग्री, कृषी कौशल्य गरज व व्यवस्था, हाताने चालविता येणारी यंत्रे, सौरऊर्जेवर चालणारी यंत्रे, शितगृह (साठवण व पॅकिंग), स्वच्छता. मालाचे आरोग्य, शीत वाहन व्यवस्था (Cold Chain System) आणि निर्यात व्यवस्था ह्या सर्व गोष्टी निर्माण करणे गरजेचे आहे मात्र यावर ग्रामस्तरावर काम होत नाही हे सत्य आहे त्यातच झीरो बजेट शेतीची योजनेला विषेय महत्त्व दिल्याने ज्यांना शेतीचा अनुभव नाही व ज्यांनी अनुदान लाटण्यासाठी चाकरमान्या मूठभर पोटभरू लोकांच्या स्वदेशी जागरण करण्याच्या प्रयोगामुळे 'उन्नत शेती, समृद्ध शेतकरी' हे महत्‍त्‍वाकांक्षी  संकल्पना लवकरच केराच्या टोपलीत लाडचाटू नौकरशाही करणार हे निश्चित

kishortiwari@gmail.com
मोबाईल -९४२२१०८८४६
========================================================================
 






No comments: