महा पोर्टलचा घोटाळा व्यापम घोटाळ्याच्या बाप - मागील ५ वर्षातील ऑन लाईन भरती ,निविदा आणी परीक्षा या सारख्या साऱ्या पारदर्शक गोरखधंद्याची सखोल चौकशी करा -किशोर तिवारी
दिनांक -३ डिसेंबर २०१९
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सरकारने महा पोर्टल रद्द करण्याची मागणी केल्याच्या नंतर मागील ५ वर्षातील ऑन लाईन भरती ,निविदा आणी परीक्षा या सारख्या साऱ्या पारदर्शक उपक्रमाची सखोल चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे कृषी सल्लागार किशोर तिवारी यांनी केली आहे कारण ऑन लाईन भरती ,निविदा आणी परीक्षा या सारख्या साऱ्या उपक्रमाची कार्यपद्धतीवर शेकडो तक्रारी सतत येत होत्या व या ऑन लाईन भरती ,निविदा आणी परीक्षा या सारख्या साऱ्या उपक्रमाचे ऍडमिन वा
ऑन लाईनवर येणारी संपुर्ण माहीती व फेरपार करण्याची चावी वा सुविधा असणाऱ्या व्यक्ती या प्रशासनाच्या बाहेरच्या असुन पूर्वीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या लोकांचा असल्याचे आरोप होत असल्यामुळें या उपक्रमाचे कंत्राट घेणाऱ्या कंपन्या व त्यांचे मालक यांची सारी माहीती जगासमोर येणे गरजेचे आहे कारण महाराष्ट्राला आज पर्यंत मिळालेल्या पारदर्शक व चारीत्र्यवान पूर्वीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असा वाद पुढे येणे अनुचीत असल्यामुळें याची सखोल चौकशीची आवश्यकता आहे वर्तमान मुख्यमंत्र्यांचे सल्लागार असलेले शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.
मागील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने सरकारमध्ये ऑन लाईन भरती ,निविदा आणी परीक्षा या सारख्या साऱ्या उपक्रमाचे लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने महा पोर्टल उभारले होते मात्र नेटवर्क ग्रामीण भागात नसल्याने सर्वांचा अतोनात झळ करण्यात आला आता त्या पारदर्शक प्रणालीमध्ये पोटभरू दलालांनी कोट्यवधींची कमाई केली असा वासही येणे चुकीचे आहे म्हणून भाजपचे विरोधी पक्ष नेत्यांनी सि बी आई चौकशीची मागणी लावून धरणे अत्यंत गरजेचे झाले आहे कारण महा पोर्टलबद्दल बर्याच तक्रारी आल्या आहेत. काही नावे / आडनावांना प्राधान्य देण्यात आले होते आणि इतरांना जाणीवपूर्वक हटविण्यात आले आहे, अशी शंका सर्वत्र पसरली आहे. काही विशिष्ट जाती / समुदायांना अनुकूलता देण्यात आल्याची तक्रार तर बिनबुडाची वाटते मात्र पारदर्शक व चारीत्र्यवान पूर्वीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या झालाच नसेल असा विश्वास किशोर तिवारी प्रगट केला असुन मात्र रामभक्तांनी भगवान रामाचा आदर्श ठेवत दुधाचे दूध पाण्याचे पाणी करावे असा आग्रह करीत मागील सरकारने सुरू केलेल्या 'ई-टेंडरिंग' प्रक्रियेत व्यापक अनियमिततेच्या तक्रारी आल्या आहेत काही विशिष्ट घटकांना 'पूर्ण पारदर्शकता' न घेता अयोग्य फायदा दिल्याचा आरोप गंभीर फौजदारी गुन्हांना आमंत्रित करणारा आहे .
"महा पोर्टल व्यवस्थापनासह संबंधित व्यक्ती आणि माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ अद्यापही आपल्या पदाचा राजीनामा देण्यास टाळाटाळ करतात. बर्याच वेळा त्यांच्यापैकी काहीजण विचित्र तास किंवा ठिकाणी विचित्र काम करीत असल्याचे दिसून आले आहे तसेच महापोर्टल महा टेंडर अधिकृत होण्यापूर्वी त्यांच्या माहितीची उघड वारंवार केली जात होती असा गंभीर आरोपच किशोर तिवारी यांनी यावेळी केला.
या पूर्वी मागील आठवड्यातच माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन देताना खादर सुप्रिया सुळे म्हणाले की, महा पोर्टलवरील बेरोजगारांना भेडसावणाऱ्या नवयुवकांना केलेल्या तक्रारी व अडचणी लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी ते काढून टाकावे आणि त्याऐवजी त्यापूर्वीच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतींनुसार भरती करण्याची मागणी केली होती तसेच शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्यांसमवेत अशीच मागणी केली आणि सुळे यांच्यासमवेत त्यांनी भेट घेतली होती हे विषेय आहे .
बाह्य माहिती तंत्रज्ञ तज्ञांकडून महा पोर्टलची संपूर्ण तपासणी केल्यास महाराष्ट्रातील घोटाळ्याचे संभाव्य व्यापाम प्रकार उघडकीस येऊ शकतात आणि म्हणूनच त्याला त्वरित सील करण्यात यावे व पुढील कामकाज सर्व आई टी कंपन्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे .
========================================================================
No comments:
Post a Comment