Wednesday, October 31, 2018

अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे पारधीसमाजाची सतत उपेक्षा : गोपालनगर पारधीबेड्यावर समोर आले भयानक सत्य

अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे पारधीसमाजाची सतत उपेक्षा : गोपालनगर    पारधीबेड्यावर समोर आले भयानक सत्य 
दिनांक -31  ऑक्टोबर  २०१८
स्वातंत्र्यानंतर पारधी समाजाची होत असलेली सतत उपेक्षेची  मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी गंभीर घेत यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील गोपालनगर  पारधी नेते मतीन भोसले व आदीवासी विधिमंडळ समितीचे अध्यक्ष राळेगावचे  लोकप्रीय आमदार डॉ .अशोक उईके व स्व वसंतराव नाईक  स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या पुढाकाराने आयोजीत सरकार आपल्या दारी कार्यक्रमाला आदीवासी प्रकल्प अधिकारी उपविभागीय अधिकारी गट विकास अधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी यासारखे महत्वाचे अधिकारी  उपस्थितीत तर नव्हते मात्र या  कार्यक्रमाला गोपालनगर पारधीबेडयांवरचे पटवारी व ग्रामसेवकही गायब होते याचे कारण गोपालनगर  पारधी बेडा भयाण वास्तव सत्य त्यात पारधी समाजाला विकासाच्या नावाचा येथे कुठेही लवलेश नसणे  पोट भरण्याच्या संघर्षात विकास यांच्यापासून कोसो दूर ठेवणे  दररोज उद्याच्या अन्नाचे  काय? हा प्रश्‍न यांच्या आजही उभा आहे अशा   या पारधी पोडाच्या समस्या जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची उदासीनताच जबाबदार आहे अशी व्यथा आमदार डॉ .अशोक उईके यांनी व्यक्त केली . 
 पारधी  बेड्यावर पाणी नाही, रस्ता नाही, साधी नालीही नाही व खायला धान्यपण नाही अशा समस्या विदर्भातील  पारधी बेड्यावरील आहेत त्यातच पारध्यांना  मूलभूत सुविधांपासून व  अंत्योदय योजनेपासून वंचित ठेवण्याचे संघटीत षडयंत्र प्रशासनातील कामचोर अधिकारी करीत असतात ,  मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी पारधीसमाजाची सतत उपेक्षा करणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचाराण्यासाठी अनेक पारधी बेडे दत्तक घेतले आहेत व आणखी घेणार आहेत अशा पारधी बेड्यावर असणाऱ्या समस्या सरकार दरबारी मांडण्यासाठी व विषेय पारधी विकास योजनेमध्ये त्याचा समावेश करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजीत असल्याचे पारधी नेते मतीन भोसले यांनी यावेळी सांगितले . 
यावेळी आमदार डॉ .अशोक उईके व मतीन भोसले  यांनी उच्चंन्यायालयाच्या आदेशाची सतत पायमल्लीकरून या विभागातील  हजारो   पारध्यांना अंत्योदय योजनेपासून वंचित ठेवण्याच्या जिल्हा  नागरी पुरवडा विभागाच्या सर्व जबाबदार  अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली नागरी पुरवडा विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावर अंबलबजावणी केली नसल्याच्या तक्रारी केल्या व त्याची सत्यता   भेटीत  गोपालनगर   पारधी बेड्यावर घराघरात जावून प्रत्येकाच्या समस्या जाणून घेणार घेतल्या दिसली . पारधी बेड्यावर   पोडावर रस्ते, नाल्या, पिण्याचे पाणी, अंत्योदयाचे धान्य, आरोग्याच्या समस्या अशा अनेक समस्याचे तसेच   ज्या नागरिकांच्या घरकुलाच्या समस्या, प्लॉटच्या समस्या आहेत त्यांनी आपल्या तक्रारी यावेळी द्याव्यात आल्या . या कार्यक्रमात जिल्हा भाजपा अध्यक्ष राजूभाऊ डांगे जी प सदयस जित्तरंजन कोल्हे , राळेगाव तालुका भाजपा अध्यक्ष कवीश्वर जिल्हा आदिवासी आघाडीचे सरचिटणीस अंकितराव नैताम पारधी नेते प्रकाशराव फुलमाळी ,सुखदेव पवार , सुदाम पवार ,फुलमाळी,अंकुश पवार ,रिमीन राऊत ,सचिन भोसले ,अजय फुलमाळी , अर्जुन काळे ,देवी घोसले ,प्रह्लाद राऊत,रामराव पवार यावेळी उपस्थित होते 
==============================

No comments: