Tuesday, February 10, 2015

दिल्लीतला पराभव भाजप पराभव :शेतकऱ्यांचा व गरीबांचा विश्वासघात कराल विदर्भातहि भाजपचे पानिपत अटळ

दिल्लीतला पराभव भाजप पराभव :शेतकऱ्यांचा व गरीबांचा  विश्वासघात कराल विदर्भातहि  भाजपचे पानिपत अटळ 


दिनांक - १० फ़ेब. २०१५
मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या दिल्लीने सर्वाचा सर्व खासदार दिले व ६० विधानसभेत आघाडी दिली त्याच दिल्लीकरांनी अवघ्या सात महिन्यात भाजपला पुर्णपणे नाकारले असुन हा जनतेचा रोष मोदी सरकारच्या  गरिबांच्या व शेतकऱ्यांच्या विरोधी धोरणांचा असून आपण भोळ्या बापळ्या  जनतेला खोटी स्वप्ने व  पोकळ आश्वासने देऊन आम्ही गमत गमत करीत होते अशी बतावणी करणाऱ्या मोदिजींचा जनतेचा निरोप असुन दिल्ली जनतेपेक्षा विदर्भाची जनताही तशीच त्रस्त असुन जर आज १०० दिवसानंतर विदर्भात निवडणुका झाल्यातर  विदर्भातही भाजपची अशीच गत होणार अशी जळजळीत प्रतिक्रिया दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या वं व्यथा जगासमोर  मांडणारे शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी निवडणूक निकालावर व्यक्त केली आहे . 
सबका साथ और केवळ अंबानी -अडाणी सह फक्त मुठभर लोकांचा होत असलेला विकास त्यातच गरिबांना अन्न ,घर ,मातीचे तेल यापासुन वंचित करणाऱ्या व विदर्भाच्या कोरडवाहु शेतकऱ्यांना हमीभाव लागवड खर्ज अधिक ५० % नफा देऊ ,सातबारा कोरा करू ,वीज बिल संपुर्ण माफ करू असे स्पष्ट आश्वासन देऊन आम्ही हे जाहीरनाम्यात दिलेच नाही असे घुमजाव करणाऱ्या भाजपविरुद्ध संपुर्ण गरीबात व शेतकऱ्यात दिल्लीकरासारखाच  राग आहे भाजप सरकारला का दिसत नाही असा सवाल किशोर तिवारी केला आहे . 
मागील सात महिन्यात विदर्भात १५०० च्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या दररोज ३ ते ४ शेतकरी आत्महत्या करीत आहेत मोदिजीना लक्ष देण्यास वेळ नाही मात्र आमचे विदर्भाचे भाजपचे राष्ट्रीय  नेते यावर चुप कां ,पाच वर्ष  फार लवकर निघून जातात मात्र सत्तेचा अहंकार व जनतेची उपेक्षा लोक लवकर विसरत नाही , एकदा जनता मूर्ख बनते मात्र जनतेला सदा मूर्ख करण्याचा मोदि प्रकार  भाजपच्या विदर्भाच्या नेत्यांना महाग पडणार असे चित्र ग्रामीण विदर्भात दिसत आहे  मात्र  हे सर्व पाहण्यास कोणी गावात जात नाही ही शोकांतिका  आहे अशी टीकाही तिवारी यांनी केली . 
दिल्लीचा पराभव भाजपला जमिनीवर येण्याचा व गरीब -शेतकरी यांना साथ देण्याचा असुन फक्त अंबानी -अडाणी सारखे  मोठे श्रीमंत व दलाल हे निवडणुकीत रुपये देऊ  शकतात मात्र जनतेची मते देऊ शकत हा निरोप देणारा आहे मात्र सत्तेचा मस्ती डोक्यात गेलेले नेते पराभव  नंतरच समजणार आता स्वताचा विकास करू दया असा निरोप त्यांच्याच गरीब कार्यकर्त्यांना देत असल्याची खुली चर्चा होत असुन साऱ्यांनीच डोळ्यावर पट्टी बांधल्यामुळे निराशेचे सावट अधिक दाटत असल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे . 

No comments: