Friday, May 15, 2015

सरकारच्या "सावकार कर्जमुक्तीचा " फायदा एकाही शेतकऱ्याला होणार नाही : सरकारने बँकांची बंद दारे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सक्तीने उघडावी -किशोर तिवारी

सरकारच्या "सावकार कर्जमुक्तीचा " फायदा एकाही शेतकऱ्याला होणार नाही : सरकारने बँकांची बंद दारे  दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सक्तीने उघडावी -किशोर तिवारी 

दिनांक -१६ मे २०१५
भाजप सरकारने मोठा गाजा वाजा करीत रु. १७० कोटीची परवानाधारक सावकारांची आत्महत्याग्रस्त विदर्भाच्या शेतकऱ्यांनी दिलेली कर्जमाफीचा फायदा एकाही  कर्जबाजारी शेतकऱ्यांना होणार    नाही व या योजनेचा फायदा परवानाधारक सावकार आपल्या जवळच्या लोकांची खोटी शपथपत्रे  सहकार खात्याला सादर करून घेणार असुन ही एक राजरोसपणे भाजप सरकारने सुरु केलेली लुट  आहे कारण २००५ नंतर सरकारने परवानाधारक सावकारांची प्रकरणे उघडून कारवाई सुरु केल्यानंतर मागील १० वर्षात एकाही परवानाधारक सावकारने पिककर्ज वाटप   केले नसून आता सरकारच्या रु. १७० कोटीची लुट करण्यासाठी काही परवानाधारक सावकारनी निव्वळ खोटी माहिती दिल्याचा आरोप शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केला असून ,सरकारने जे कृषी केंद्र मालक,दारुवाले ,सोनार,राजकीय नेते ,गैर परवानाधारक सावकार यांच्या शेती  कर्जाची माहिती घेऊन ते कर्ज माफ करण्याची व शेतकऱ्यांना त्यांचे विक्रीपत्र लिहून घेतलेले पिक कर्ज व सोने  गहाण ठेऊन घेतलेले कर्ज माफ करण्याची खरी गरज असून आज सर्व कृषी केंद्र मालक,दारुवाले ,सोनार,राजकीय नेते ,गैर परवानाधारक सावकारयांनी शेतकऱ्यांना कर्ज देणे बंद केले आहे व हे सर्व शेतकरी सरकारी व सहकारी बँकांचे मागील तीन वर्षापासून थकितदार आहेत मात्र यांचे पुनर्वसनही बँका  करण्यास तयार नाही मागील वर्षाच्या  एकाही थकितदार शेतकऱ्यांचे पीककर्ज पुनर्वसन झालेले नाही अशा गंभीर व कठीण समयी सरकारने बँकांची बंद दारे  दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सक्तीने उघडावी अशी  शेतकरी नेते किशोर तिवारी केली आहे . 

सरकारने सावकार कर्जमुक्तीचा आदेश व जी  . आर . फारच चुकीचा असुन फक्त सावकारांनी नावे व कर्जाची रक्कम दयावी व शेतकऱ्यांनी घेतल्याची कबुली द्यावी नंतर सरळ रक्कम मंत्रालयातून १७० कोटीची रक्कम  सावकारांच्या बँक खात्यात जमा होणार आहे मात्र यामध्ये शेतकऱ्याचा गहाण सोने वा शेतीचा परतीचा कोणताच कायदेशीर बंधन नाही जर सारे कर्ज गैर शेतीसाठी आहे व पिक कर्ज म्हणून एक  दमडीही नाही तर आता सावकार ,मंत्री ,राजकीय नेते व अधिकारी ही सारी रक्कम वाटून घेणार व आत्महत्याग्रस्त विदर्भाच्या शेतकरी असेच बँकांची दारे घासुन मरणार अशी खंत तिवारी यांनी व्यक्त केली . 
सरकारने सरकारी व सहकारी बँकांचे पिककर्ज माफ करणे ही काळाची गरज आहे मात्र सरकार आपले आश्वासन पूर्ण करीत नसुन  परवानाधारक सावकारांची तिजोरी भरण्याचे पाप करीत आहे आपण ह्या गोरघधंद्याच्या भंडाफोड करणार असून सर्व खोट्या  शपथपत्रांची  कथा जगासमोर मांडत सर्वांना फौजदारी कारवाई जेलाची हवा चारण्याचा निर्धार व ईशारा ,किशोर तिवारी यांनी दिला आहे . 

No comments: