Thursday, June 22, 2017

कर्ज माफी व वाढीव हमीभाव खुल्या बाजार व्यवस्थेत कृषी संकटाचा उपाय नाही- किशोर तिवारी

कर्ज माफी व वाढीव हमीभाव खुल्या बाजार व्यवस्थेत  कृषी संकटाचा उपाय नाही- किशोर तिवारी
जेव्हा भारतातील बऱ्याच  राज्यात  शेतकरी शेतकरी कर्जमाफी व वाढीव हमीभाव मिळावा यासाठी आंदोलनकरीत आहेत महाराष्ट्रात  राज्य शासनाने  उत्तरप्रदेशात  कर्ज माफी कारणामुळे  ३२ हजार कोटींची  कर्जमाफी जाहीर  केली आहे परंतु केंद्र सरकारने या कर्जमाफीचा सारा भर सहन करावा असा निरोप दिल्याने आरबीआय ,नाबार्ड व सरकारी बँकाच्या शेतकरी  विरोधी धोरणामुळे ४  लाख कोटीच्या वर असलेल्या सरकारचे समोर गंभीर संकट निर्माण झाले आहे कर्जमाफीहा उपाय  शेतीचा पुनरुज्जीवन करण्यासाठी तात्पुरता  आवश्यक असला तरी यामुळे  दीर्घकाळात सुरक्षित पतपुरवड्याच्या धोरण  राबविले  जात नाही हा मागील अनुभव आहे . पीककर्जाची माफी  म्हणजे शासनाकडून  बँकांना देण्यात येणारी थकीत कर्जाची नुकसान भरपाई असुन या एक बँकांना आपली बुडीत कर्ज कमी करण्याच्या कार्यक्रम झाला आहे व  याचा अर्थ असा की मोठ्या प्रमाणावर पैसा, ज्यामुळे सिंचनमधील कृषी पायाभूत सुविधा बळकट होणार होत्या तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेतील जोड धंदे , स्थानिक मूल्यवर्धित प्रकल्प आणि बियाणे उत्पादन, माती आरोग्याची वाढीचे प्रकल्प आणि वनस्पती संरक्षण  यासारख्या संशोधनासाठी कार्य थंड्या बस्त्यात जाणार आहेत तसेच शेतकऱ्यांच्या आंदोलनाची प्रमुख मागणी एमएस स्वामिनाथन यांनी किमान आधारभूत किंमतीची (एमएसपी) शिफारस  ज्याने लागवड खर्च अधिक ५० टक्के  नफा असा हमीभाव जागतीकरणाच्या सध्याच्या काळात खुल्या अर्थव्यवस्थेत  एक  अशक्य बाब असुन आता कृषी संकटाला तोंड देण्यासाठी  अर्थव्यवस्था म्हणून अनेक दशकांपासून सर्व सरकारांनी लागू केलेल्या चुकीच्या कृषी  धोरणांना परिणाम असुन यावर गंभीरपणे विचार व्हावा अशी मागणी शेतकरी मिशनचे प्रमुख किशोर तिवारी यांनी केली आहे . 
महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त कोरडवाहू भागात दीर्घकालीन टिकाऊ उपाय योजना अत्यंत आवश्यक असतांना व  मान्सूनचा व्यवहार अतिशय अनियमित झाला असुन  शेतकरी गेल्या काही वर्षांपासून गंभीर दुष्काळ समस्येला सामोरे तोंड देत होते  सुदैवाने, मागील वर्षी  भरपूर पीक आले  परंतु शेतकऱ्यांना शेतीमालाला भाव मिळाला नाही  म्हणून त्यांना  बँकाकडून  व  खाजगी सावकारांद्वारे घेतलेल्या कर्जाची परतफेड करता आली नाही आणि आता हे ४० लाख कोरडवाहु शेतकरी नवीन पिककर्जासाठी पात्र नाहीत त्यातच उत्तर प्रदेश सरकारच्या  कर्जमाफीमुळे महाराष्ट्र सरकारने एक लाख रुपयाची सरसकट पीककर्ज माफीचा फायदा तात्काळ मिळणे आवश्यक असतांना पश्चिम महाराष्ट्राच्या तथाकथित शेतकरी नेत्यांच्या सुकाणु समितीच्या अडेल धोरणामुळे नवीन पीककर्ज वाटप होत नसल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत असे प्रतिपादन किशोर तिवारी यांनी केले आहे . 
आजपर्यंत  शेतकऱ्यांच्या आत्महत्येची अनेक  कारणे देण्यात आली आहे अजूनही मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा अभ्यास केला जात आहे, यामध्ये  परंतु सर्वसामान्य कारणे कुटुंबातील आर्थिक स्थिती व विपन्नावस्थाच आहे, अनेकवेळी   दुष्काळ नापिकीमुळे  आल्यामुळे तर अनेकवेळी शेतीमालाला भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असल्यामुळे  कर्ज माफीच्या अंमलबजावणीनंतरही  कोणताही सकारात्मक परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिकस्थितीत   होत नाही हेच सत्य समोर आले आहे  तर जोपर्यंत दीर्घकालीन उपाय होत नाहीत व  कोरडवाहू शेती विकासासाठी पुरेसा निधी देणे व कालबद्ध अंबलबजावणीचा कार्यक्रम शेतकर्यांच्या आत्महत्येला रोखण्यासाठी तात्काळ आवश्यक असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील तीन वर्षात मोठ्या प्रमाणात या क्षेत्रात कामे सुरु केली आहेत  व यांना शेतकऱ्यांनी त्यांना प्रचंड प्रतिसाद दिला  यामुळेच मागील वर्षी महाराष्ट्राने बहुविध पीकनिर्मितीसह उच्च उत्पादकता दाखवली आहे आणि बायोमास, पीक-पशुधन ,सिंचन क्षेत्रात विक्रमीवाढ सह स्थानिक  गावपातळीवर  मूल्याच्या अतिरिक्त वाढीसाठी गंभीर प्रयत्न केले आहेत त्याचे  चांगले परिणाम दिसून आले आहेत परंतु शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली नाही, ज्यामुळे त्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे मात्र आता याची गती निधी अभावी  मंद होणार अशी भीती शेतकरी मिशन व्यक्त केली आहे . 
आता कृषी समस्येचे निराकरण करण्यासाठी  दीर्घकाळ उपाय काय आहेत त्यामध्ये  पारंपारिक शेती व  देशी बियाण्याच्या व  सेंद्रीय शेतीचा वापर आणि लागवड पध्दती हे पर्याय समोर आले आहेत कारण जैविक शेतीमुळे मातीची सुपीकता वाढते आणि कीटकनाशकांचा वापर टाळता येतो, जे अन्न मिळते ते विषमुक्त असते याची आता जागतिक स्तरावर पुष्टी झाली  आहे . जैविक आणि पौष्टिक सेंद्रीय शेतीने अनेक फायदे पर्याय म्हणुन समोर आले आहेत . डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्यामते  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  राष्ट्रीय शेतकरी आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी केली असुन त्यामध्ये सुधारीत बियाणे, मातीचे  आरोग्य कार्ड, कृषी कर्ज सुधारणा, सुधारित विमा, सिंचन क्षेत्र वाढविण्याच्या क्षेत्रातील संशोधन आणि कृषी मंत्रालयाच्या जबाबदारीनिश्चित करून  शेतक-यांचे कल्याणनिधी  वाढविण्यात आला आहे यामुळे  लागवडीचा खर्च कमी झाला परंतु शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या दुप्पट करण्याचे पंतप्रधानांचे आश्वासन हे एक महत्त्वाचा  कार्यक्रम देशासमोर दिला आहे मात्र अनेक  राज्यांनी त्यांच्याकडे गांभीर्याने दुर्लक्ष केले आहे. सध्याच्या परिस्थितीत  शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या दुप्पट करण्याच्या कार्यक्रमाची  सुरुवात करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. सर्व धान्य, डाळी, तेलबिया, फळे आणि भाजीपाला यांचे प्रामुख्याने उत्पादन गावांमध्ये होते. तथापि, शहरांमध्ये त्यांचे स्थानांतरण, मिलिंग, प्रक्रिया, पॅकेजिंग आणि वितरण शहरांत स्थानांतरित होते त्यासाठी गावामध्ये  शेती उत्पादनांवर आधारित उद्योग असणे आवश्यक आहे आणि गावांमध्ये शेती व पशुजन्य उत्पादनांचा वापर आणि शहरी भागातील बाजारपेठांचा वापर करणे आवश्यक आहेत्यासोबतच बहुतांश कृषि उत्पादनांचे संचयन, ग्रेडिंग, प्रक्रिया व पॅकेजिंग गावांमध्ये प्राथमिक उत्पादनांचे मूल्य वाढवणे, उत्पादकांच्या उत्पन्नात वाढ करणे आणि ग्रामीण समुदायांमध्ये रोजगाराची निर्मिती करणे तसेच शहरांपेक्षा ग्रामीण भागातील इंटरनेटची तरतूद स्वस्त दराने करून महाराष्ट्रातील दुष्काळ प्रदेशात शेतकऱ्यांच्या  ज्ञान-आधारित "टेक्नो-गाव" तयार करण्यास योजना प्रचंड प्रतिसाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळत असतांना त्यांच्या  कामाला गती देणे हाच एकमेव पर्याय विदर्भ व मराठवाड्याच्या युवा शेतकरी भूमिपुत्रासमोर असल्याचे प्रतिपादन तिवारी यांनी केले आहे  







No comments: