Monday, February 26, 2018

मोनसँट्रोच्या बी टी कापसाने विदर्भ-मराठवाड्यात घरा -घरात आणली खाज - ग्रामीण भागात आता सर्वांना सुरक्षा कीट देण्याची गरज

मोनसँट्रोच्या  बी टी कापसाने  विदर्भ-मराठवाड्यात  घरा -घरात  आणली खाज - ग्रामीण भागात आता सर्वांना सुरक्षा कीट  देण्याची गरज 

दिनांक -२७ फेबु २०१८
मागील वर्षी खरीप हंगामात कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा झाल्यांनतर सर्व शेत मजुरांना व फवारणी करणाऱ्या शेतकऱ्यांना सुरक्षा किट वाटपाची सुरु झालेली मोहीम आता अख्ख्या महाराष्ट्रातील कापुस उत्पादक क्षेत्राच्या ग्रामीण अमेरीकेच्या मोनसँट्रो कंपनीच्या बी टी कापसामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यांनतर बाधीत कापुस ज्या ठिकाणी ठेवण्यात येत आहे त्या ठिकाणी त्याचा संपर्कात येणाऱ्या सर्वाना ऍलर्जी व प्रचंड खाज याच्या आजाराने ग्रस्त केले असुन आता महाराष्ट्रातील कापुस उत्पादक क्षेत्राच्या ग्रामीण सर्वांना सुरक्षा कीट  देण्याची अफलातुन मागणी शेतकऱ्यांनी केल्याची माहीती कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा. मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज दिली . या हरीतक्रांती आणणाऱ्या रासायनिक शेतीचा सर्वात भयंकर सैतानी अवतार हजारो निष्पाप शेतकरी व शेतमजुरांना दिसत असतांना याच्या   प्रचन्ड वेदना व आरोग्याच्या गंभीर समस्यांना लहान लहान मुलांना ,गर्भवती महिलांना ,आजारी वृद्धांना सामोरे जावे लागत असुन आता बहुराष्ट्रीय कंपन्यांची दलाली करणारे राजकीय नेते ,शेतकरी संघटनेचे नेते ,संरक्षण देणारी अधिकारी मंडळी चुप का असा सवाल करीत किशोर तिवारी यांनी हा विनाशाचा मार्ग बदलुन शाश्वत परमपरागत शेतीवर येण्यासाठी राष्ट्रीय कृषी कार्यक्रमाची मागणी पुढे रेटली आहे . 
यावर्षी अख्ख्या महाराष्ट्रातील सुमारे ४०  हेक्टर वरील बी टी कापसाचे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर ५० टक्के कापसाचे उभे पीक  नष्ट झाल्याने शेतकऱ्यांचे सुमारे १० हजार कोटीचे प्रचंड आर्थिक नुकसान झाल्यानंतर आता बाजारात कापसाला भाव नसल्यामुळे घरात ,शेताच्या बंड्यात ठेवलेल्या बी टी कापसाच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांना प्रचंड प्रमाणात त्वचाविकाराची लागण होत असुन गावातील शेतकरी ,शेतमजूर ,लहान मुले सर्वच ऍलर्जी व प्रचंड खाज याच्या आजाराने शेकडोच्या संख्यने प्राथमिक आरोग्य केंद्र ,ग्रामीण रुग्णालय ,जिल्हा रुग्णालयात तसेच खाजगी  रुग्णालयात उपचार घेत असुन यावर शेकडो कोटी रुपयाचा खर्च लागत या आरोग्याच्या संकटाला सरकारने गंभीर घेण्याची ,या हजारो त्वचाविकाराची लागण झालेल्यांची मोफत उपचार व सामान्य आरोग्याला घातक अशा बीटी कापसाच्या बियाणाच्या कंपन्यांकडून संपुर्ण नुकसान भरपाई घेण्याची  मागणी   मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली  आहे . 
यवतमाळ ,नांदेड सह वर्धा जिल्ह्यातील कापुस उत्पादक क्षेत्राचा ,ग्रामीण ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राचा दौरा केल्यांनतर किशोर तिवारी महाराष्ट्र सरकारला दिलेल्या अहवालात  बी टी कापसाचे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या कापसामधील जंतू मोठ्याप्रमाणात सक्रिय झाले असुन प्रत्येक खेड्यात सर्वच ऍलर्जी व प्रचंड खाज याच्या आजाराने शेकडोच्या लोक प्रभावित असुन उपचाराच्या नावावर अनेकांची प्रचंड लूट होत असल्याच्या तक्रारी आल्याची माहीती समोर आली आहे . 
यवतमाळ जिल्हातील  केळापुर  तालुक्यातील करंजी येथील कापुस उत्पादक शेतकरी डॉ मोतीरामजी बावणे यांनी आपण आपल्या ,शेताच्या बंड्यात ठेवलेल्या बी टी कापसाच्या संपर्कात येणाऱ्या मजुरांच्या मुलांना मोठयाप्रमाणात खाज सुरु झाल्याने मजुरांनी शेतातील आपले वास्तव सोडल्याची माहीती दिली व आपण या आरोग्याला घातक असलेल्या कापसापासुन मुक्ती मिळावी म्हणून पडेल किमतीमध्ये सोमवारला विकल्याची माहीती दिली . केळापूर येथील सरपंच कमलाबाई सिडाम यांनी माहीती दिली की या कापसामुळे होत असलेली खाज व त्वचा रोगाची दहशतीमुळे सध्या शेतात असलेल्या कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने सोडावा लागत असल्याची तक्रार केली . 
सोनबर्डी येथे घरात ठेवलेला कापुसामुळे सर्वाना खाज व त्वचा रोगाची लागण होत असल्यामुळे शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या आंगणात कापूस ठेवला आहे मात्र त्यामुळे संपर्कात येत असलेल्याना  सर्वच ऍलर्जी व प्रचंड खाज याच्या आजाराने ग्रासले यामुळे आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याची तक्रार पहापळ येथील आरोग्य केंद्राच्या आढावा बैठकीत मिळाल्याचे तिवारी यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे . यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव व झरी तालुक्यात बी टी कापसामुळे प्रचंड प्रमाणात त्वचाविकाराची लागण शेकडो तक्रारी आल्यानंतर कै वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथील डीन डॉ मनीष शिरिगिरवार यांनी या तालुक्यात विषेय चमु पाठविली आहे व यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी  ऍलर्जी व त्वचाविकाराची सर्वच औषधी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र ,ग्रामीण रुग्णालय ,उप जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून दिली असल्याची माहीती सुद्धा अहवालात देण्यात आली आहे . 
वर्धा जिल्हात काही भागात ज्या ठिकाणी कापसाचे उभे पीक वेचणीच्या त्रासामुळे ढोराना खाण्यासाठी सोडल्यांनंतर मोठ्याप्रमाणात विषबाधेच्या तक्रारी आल्याची माहीती चौकशीसाठी शेतकरी मिशनने सरकारकडे सादर केली आहे . जर हे कापसाचे बियाणे आरोग्याला घातक आहे तर यावर तोडगा काढणे काळाची गरज नाही का ?  असा सवालही किशोर तिवारी यांनी सरकारला केला आहे . 
यापूर्वी कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा. मिशनने गुलाबी  बोंडअळीचा व बी टी बियाणाच्या   विषय केंद्रात व राज्यात लावून धरला होता शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई ,गुलाबी  बोंडअळीच्या संकटातुन कायम सुटका यासाठी सर्व स्तरावर पाठपुरावा सुरु केला होता  व सोबतच या बी टी कापसावरील  बोंडअळीची  समस्या निवारण कार्यक्रमात  किशोर तिवारी यांनी सरकारला शेतकऱ्यांचे गुलाबी  अळी यांचा संकटाचा सामना करण्याकरितां प्रबोधनाची मोहीम सुरु करण्याचा व या संकटाचे मूळ कारण आता निवारण करण्याकरीता उपाययोजना ,नुकसान भरपाईसाठी कारवाईची संपुर्ण माहीती त्यासाठी कृषी ,ग्रामविकास व महसुल विभागाचा सहभाग ,कापसाचे गुलाबी अळीग्रस्त पीकाना समुळ नष्ट करणे त्यामुळे  अळीचा सरसकट नाश  होईल,जमिनीमधील गुलाबी अळीच्या अंडी नष्ट करणे ,कापसाचे पीक फरतड न घेता काढून फेकणे ,मॉन्सूनपूर्व कापसाची पेरणी टाळणे ,कापसाचे पीक यावर्षी  गुलाबी अळीग्रस्त झाले असल्यास पुढच्या वर्षी  डाळीचे वा तेलबियांचे पीक घेणे,अमेरीकेचे कापसाचे बियाणे गुलाबी अळीचे निमंत्रक असल्यामुळे या कापसाच्या बियाणांच्या जागी भारतीय सरळ वाणाच्या कापसाचा पेरा करणे एकमेव उपाय कापुस उत्पादक शेतकऱ्यांसमोर असल्यामुळे सरकारने कृषी खाते ,केंद्रीय कापूस शोध संस्था ,भारतीय कृषी संशोधन परिषद ,कृषी विद्यापीठ यांना कामावर लावणे गरजेचे असुन विदेशी बियाणे कीटकनाशक कंपन्याचे कृषि क्षेत्रातील साम्राज्य संपण्याचा निर्वाणीचा सल्ला  किशोर तिवारी यांनी दिला होता मात्र सरकारच्या मस्तवाल अधिकाऱ्यांनी आजपर्यंत कोणतीही कारवाई वा कृती कार्यक्रम राबविला नसल्याने आता आरोग्याच्या समस्यांना समोर जावे लागत असल्याची खंत तिवारी यांनी व्यक्त केली आहे . 
==========================================================

No comments: