Thursday, March 1, 2018

सुसरी- पेंढरी शाळांच्या भोंगळ कारभाराची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी होणार - किशोर तिवारी

सुसरी- पेंढरी  शाळांच्या भोंगळ कारभाराची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी होणार - किशोर तिवारी 

दिनांक -१ मार्च २०१८ 
यवतमाळ जिल्हातील आदीवासी बहुल टिप्पेश्वर अभयारण्यालगत असलेल्या सुसरी व पेंढरी येथील प्राथमिक शाळांची पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्या नाकर्तेपणामुळे तीन तेरा वाजल्याचा प्रचन्ड तक्रारी वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाल्यांनतर त्यातच सुसरी येथे शिक्षक शाळेतच दारू पितात तर पेंढरी येथे शिक्षकाने आपल्या ठिकाणी गावातील आदीवासी युवक बंडू कुमरे यांना स्वतःच्या जागेवर रु दोन हजार प्रतिमहा मानधनावर गट विकास अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्या  पूर्वपरवानगीने नियुक्त केल्याच्या तक्रारीची गंभीर दखल  कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा. मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी घेऊन तालुका दंडाधिकाऱ्याच्या सोबत पंचायत समिती केळापूरचा प्रशासकीय भोंगळ कारभारच समोर आल्याने या संपुर्ण प्रकरणाची यवतमाळ जिल्हाचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी दंडाधिकाऱ्या मार्फत चौकशी करावी व दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची शिफारश केल्याची माहीती  एका निवेदनामार्फत दिली आहे . 
मागील आठवड्यात सुसरी येथील चिमुकल्या मुलानी पांढरकवडा गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयातच शाळा भरविल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्यावर सरकारची किरकिरी कमी व्हावी व बेजाबदार अधिकारी व कर्मचारी यांचेवर कारवाई तात्काळ करण्यासाठी कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा. मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी तहसीलदार महादेवराव जोरवार यांचेसोबत सुसरीला अधिकृत भेट देण्याचे ठरविले व गट विकास अधिकारी श्री आरेवार यांना सोबत येण्यासाठी संपर्क केला असता आपण यवतमाळ येथे आंदोलन करीत असुन संपावर असल्यामुळे येण्यास नकार दिला व आपला शिक्षणाधिकारी पाठवीत असल्याचे सांगितले मात्र सुसरीला भेटी दरम्यान कोणताही अधिकारी शिक्षण विभागाकडुन आला नव्हता . 
सुसरी शाळेचा संगणक दारुड्या शिक्षकाने विकला 

सुसरी येथे शाळेच्या भेटी दरम्यान जे दोन शिक्षक उपस्थित होते त्यांना त्याच दिवशी एकतासी अगोदर बाजूच्या शाळेतुन पाठविण्यात आल्याचे कळले व ज्या वेळी १ ते ५ वर्गाच्या चिमुकल्या मुलांना अडचणी विचारल्यांनंतर त्यांनी शाळेतच नियमित शिक्षक देशीचा पवा  आणुन दारूच्या नशेत शिकवितात व तसेच आमची शाळा डिजिटल असल्यामुळे आलेला संगणक दारुड्या मास्तराने विकला असल्याची गंभीर तक्रार केली तेंव्हा या प्रकाराची तक्रार  गट विकास अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना केल्यावरही त्यांनी सतत दुर्लक्ष केल्यामुळे आम्हाला शाळेला कुलुप आलून गट विकास अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन करावे लागले असे बयान तहसीलदारांना यावेळी दिली . 
पेंढरीच्या शाळेला कुलुप 

सुसरी येथे शाळेची भेट आटपुन गाडीत बसतांना गावातील सामाजिक कार्यकर्ते पंकज बाकमवार यांनी लगतच्या पेंढरी शाळेवर शाळेचे नियमित शिक्षकाने स्वतःच्या जागेवर रु दोन हजार प्रतिमहा मानधनावर गावातील बेरोजगार आदीवासी युवकाला नियुक्त केल्याची अफलातुन खबर दिल्यावर या तक्रारींचे सत्य पाहण्यासाठी किशोर तिवारी यांनी दुपारी १२ वाजता भेट दिल्यांवर चक्क शाळेला कुलुप असुन सर्व मुलांनी आज सुट्टी असल्याचे सांगितले . मुलांना भोजन देणाऱ्या आदीवासी कर्मचाऱ्यांशी चौकशी केली असता आज शाळेचे शिक्षक ठाकरे यांनी ट्रेनिंग असल्यामुळे आज सैंपाक तयार करू नका असा निरोप दिला असल्याचे सांगितले . शाळेत गावातील आदीवासी युवक बंडू कुमरे नियमित मुलांना उत्तम प्रकारे शिक्षण देतात अशी माहीती यावेळी दिली .शाळेचे बंद कुलुप सुद्धा बंडू कुमरे उघडले व त्यांनी आपण मुलांना टीव्हीशन देत असल्याचे कबुल  केले . पेंढरीची शाळा सुद्धा डिजिटल असल्यामुळे किशोर तिवारी संगणक चालू करण्याचा प्रयन्त केल्यावर शाळेचा मीटर वीज कंपनीने नेला असल्याचे यावेळी गावकऱ्यांनी सांगितले . शाळेचे शिक्षक बहुजन समाजाचे मोठे नेते असल्यामुळे ते सतत समाजाच्या कामाने व्यस्त असल्यामुळे गावातील बेरोजगार आदीवासी युवकाला आपल्या पगारातून कामावर ठेवल्याची माहीती यावेळी गावकऱ्यांनी दिली . हा राजरोसपणे सुरु असलेला बिहार करणारा प्रकार किशोर तिवारी यवतमाळ जिल्हाचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांना पेंढरी येथूनच फोनवर सांगितले व असले नालायक अधिकारी व कामचुकार कर्मचारी सरकारच्या कोट्यवधी रुपयाच्या निधी खर्च करूनही शिक्षण क्षेत्रात समाजाला व आदीवासी निष्पाप जनतेला चुना लावीत आहेत ,या संपुर्ण प्रकरणाची दंडाधिकाऱ्यामार्फत सखोल चौकशीकरुन आदीवासी अट्रोसिटी कायद्यांतर्गत कारवाई करण्याची शिफारश यावेळी केली आता जिल्ह्यातील मस्तवाल प्रशासन काय कारवाई करते यावर सर्वांचे लक्ष लागले आहे .
=====================================
=======================================


No comments: