Monday, May 28, 2018

२६ व २७ मे पीककर्ज मेळाव्यामध्ये हजारो शेतकऱ्यांच्या सहभाग -सहकारी बँका व सोसायटीच्या निल शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँका देणार पीककर्ज -किशोर तिवारी

२६ व २७ मे पीककर्ज मेळाव्यामध्ये हजारो शेतकऱ्यांच्या सहभाग-सहकारी बँका व सोसायटीच्या निल शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँका देणार पीककर्ज -किशोर तिवारी  
दिनांक २५ मे २०१८

   
यावर्षी सरकारने शेतकऱ्यांवरील थकीत झालेले २००१ पासुन जून  २०१७ पर्यंतचे सर्व पिक कर्ज व सर्व मध्यम मुदतीचे शेतीसाठी घेतलेले दीड लाखपर्यंतचे थकीत कर्जाची रक्कम बँकांना दिले असुन आता आजच्या  हेक्टरी पत मर्यादेप्रमाणे पिक कर्ज वाटप करणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे  " मागेल त्याला पीककर्ज " योजना सुरु करण्यात आली असुन   सर्व शेतकऱ्यांना सरकारला दिलेल्या सवलती प्रमाणे फायदा देऊन नवीन पत पुरवडा करान्यासाठी येत्या २६-२७ मेला अर्ज द्या व पीककर्ज घ्या '   असे पीक कर्ज मेळावे संपुर्ण यवतमाळ जिल्हात सुमारे २९० बँकांच्या शाखेत आयोजित करण्यात आले होते या मेळाव्यामध्ये दोन्ही दिवशी ४७ हजारावर शेतकऱ्यांनी बँकामध्ये भेटी दिल्याअसून १५ हजारावर शेतकऱ्यांचे पीककर्जाचे अर्ज मंजुरीसाठी प्राप्त झाले आहेत या सर्वाना या आठवड्यात पीककर्ज वाटप करण्यात येणार असल्याची माहीती शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी  २६-२७ मेला   बँकांच्या शाखेत  भेटी दिल्यांनतर देण्यात आली  . किशोर तिवारी २६ मेला  झरी येथील  बँक ऑफ महाराष्ट्र , ग्रामीण बँक,मध्यवर्ती सहकारी बँकेला भेटी दिल्या व  सर्व   बँकांनी कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी लावणे ,सरकारने कर्जमाफीची रक्कम जमा  केल्यांनंतर नव्याने पीककर्ज  देणे ,दुष्काळ घोषीत केल्यांनंतर थकीत पिक कर्जाचे पुनर्वसन  करणे,पीकविमा व अनुदानाची मदत पीककर्ज खात्यात जमा केली असल्यास या सर्व तक्रारींची चैकशी केली . ज्या शेतकऱ्यांना सहकारी सोसायट्या वा सहकारी बँक कर्जमाफी नंतर ना हरकत प्रमाणपत्र देत आहे त्यांना सरकारी बँकांनी तात्काळ पीककर्ज नव्याने द्यावे तसेच वन टाइम सेटलमेंट करनाऱ्या शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज तात्काळ देण्यात यावे यासाठी विषेय सूचना दिल्या .यावेळी शेतकरी नेते सुरेशभाऊ बोलेनवर ,रामलू ईटवार ,अंकित नैताम ,आदीवासी नेते धर्मा आत्राम सोबत होते . 

त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पाटण व  पाटणबोरीला स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा पाटणबोरी , बँक ऑफ महाराष्ट्र  पहापळ व  स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा पारवा   येथे भेट  दिली त्यावेळी पंचायत समिती सदयस सुहासभाऊ पारवेकर ,रुपेश कातमवार ,अर्जुन आत्राम उपस्थित होते यावेळी कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी केली . 
त्याच प्रमाणे  २७ मे दुपारी  राळेगाव तालुक्यातील स्टेट बँक ऑफ  इंडिया शाखा सावरखेड  व इलाहाबाद बँक  शाखा झाडगाव त्यानंतर सेन्ट्रल  बँक ऑफ इंडिया शाखा मौदा  येथे भेट दिली   यावेळी नोडल अधिकारी  जिल्हा परिषद डेप्युटी सि ओ मोहोड साहेब ,सामाजिक कार्यकर्ते अशोक बाबु केवटे ,विजयभाऊ आदमने ,विजयभाऊ तेलंगे ,वासूभाऊ बोकीलवार ,राळेगाव तालुक्याचे तहसीलदार हेमंत गांगुर्डे ,गटविकास अधिकारी खेडकर ,तालुका कृषी अधिकारी पाठकसाहेब सोबत होते . 
यावर्षी सरकारने ऐतिहासिक पीककर्जमाफी दिल्यांनतर यवतमाळ जिल्ह्यातील बँकांना सुमारे हजार कोटी रुपये जमा केल्यानंतरही सरकार बँका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनांचा पालन  करीत नसुन या खरीप हंगामात दोन हजार कोटीच्या वर पीककर्ज वाटप करण्याचे लक्ष पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी  २६-२७ मेला 'अर्ज द्या व पीककर्ज घ्या ' मोहिमेअंतर्गत  यामध्ये सरकारी बँकांनी कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी न लावणे ,सरकारने कर्जमाफीची रक्कम जमा  केल्यांनंतरही नव्याने पीककर्ज न देणे ,दुष्काळ घोषीत केल्यांनंतरही थकीत पिक कर्जाचे पुनर्वसन न करणे,पीकविमा व अनुदानाची मदत पीककर्ज खात्यात जबरीने जमा करणे  अशा प्रचंड तक्रारीची दखल दूर करण्यासाठी बळीराजा चेतना अभियाना अंतर्गत  आयोजित करण्यात आले होते यावेळी ज्या बँका शेतकऱ्यांना वेळेवर पीककर्ज देणार नाहीत त्या बँकांवर कारवाई करण्याच्या सूचनाही सरकारने देण्यात आल्या . 
--------------------------------------------------------
-----------------------
----------

No comments: