Tuesday, January 22, 2019

यवतमाळ जिल्हाधिकारी यांच्या आदर्श घेऊन किशोर तिवारी करणार २३ जानेवारीला कोसाऱ्याला मुक्काम

यवतमाळ जिल्हाधिकारी यांच्या आदर्श घेऊन किशोर तिवारी करणार २३ जानेवारीला कोसाऱ्याला मुक्काम 
दिनांक -२२ जानेवारी २०१९

सध्या यवतमाळ जिल्ह्यात ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासनाच्या वतीने महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान राबवण्यात येत आहे. या अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात ३६ गावांत हे अभियान सुरू असून ग्राम विकासासाठी आता अधिकारी गावागावात मुक्काम करून नागरिकांशी संवाद साधत आहे. या अभिनव उपक्रमामुळे गावाच्या विकासाला चालना मिळत आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुसद तालुक्यातील रोहदा येथे मुक्काम करून नागरिकांशी संवाद साधला होता. आतापर्यंत जवळपास २० अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या गावात मुक्काम केला असुन यातून गावातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यात यश येत आहे ,गावात मुक्काम केल्याने गावातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी अधिकाऱ्यांना बराच वेळ मिळतो या जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अनुभवाचा आदर्श घेऊन येत्या २३ जानेवारीला  कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त झरी तालुक्यातील कोसारा या दुर्गम खेड्यात करण्याचा निर्णय घेतला आहे . 
किशोर तिवारी संध्याकाळी ५ वाजता झरी  तालुक्यातील कोसारा येथे आरोग्य विभागाच्या प्रेरणा प्रकल्पाअंतर्गत परीसरातील गावातील सर्व शेतकरी शेतमजूर व  युवक सोबतच मुलांशी सामाजिक विषयांवर सल्लामसलत करतील . रात्री ७ ते ९ वाजता प्रत्येक घरात भेट देतील व संवाद साधणार आहेत . या संवाद कार्यक्रमात  परीसरातील गावातील सर्व शेतकरी शेतमजूर व  युवक सोबतच मुलांना निरोप व आणण्याची जबाबदारी प्रशासन, आरोग्य विभाग, महीला व बालकल्याण विभाग सोबतच पोलिसांची देण्यात आली आहे यावेळी परीसरातील अवैध धंदे व बेकायदेशीर दारू विक्री ,पोलिसांच्या मदतीने सुरु असलेले वरळी मटका ,चेंगळ कोंबडा बाजार यांच्या व्हिडीओसह तक्रारी सादर कराव्यात अशी विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे . 


जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुसद तालुक्यातील रोहदा येथे मुक्काम केल्यांनतर लोणी गावात बीडीओ समाधान वाघ यांनी मुक्काम केला. त्यानंतर कळंब तालुक्यात गणेशवाडी गावात एसडीओ संदीप अपार, नांझा येथे बीडीओ सुशील संसारे, सहायक बीडीओ पद्माकर मडावी, बेल्लोरीत तहसीलदार सुनील पाटील, नेरमधील चिकणी डोमगा येथे तहसीलदार अमोल पवार, पाथरड गोळे येथे बीडीओ युवराज मेहत्रे हे मुक्कामी होते. उमरखेडमधील चिंचोलीत तहसीलदार भगवान कांबळे व डिप्टी सीईओ मनोहर नाल्हे, करंजीत बीडीओ जयश्री वाघमारे, यवतमाळ तालुक्यातील मुरझडी चिंच येथे शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, चौधरा गावात जि. प.चे खेरडे व ढोले, घोडखिंडी गावात बीडीओ अमित राठोड, पुसद तालुक्यातील शेलू (खु.) येथे तहसीलदार गरकल व अन्य अधिकाऱ्यांनी मुक्काम केला.या माध्यमातून प्रशासनाचे अधिकारी गाव स्तरावरील समस्या गावातच सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्या या मुक्कामामुळे गावाच्या विकासाला चालना  मिळत असल्यामुळे चला खेड्यात मुक्कामाला ही एक चळवळ व्हावी या आशेने आपण कोसारा मुक्कामाला निवडला आहे . 
=======================================================================

No comments: