Thursday, February 14, 2019

१६ फेबु.चा पांढरकवडा मेळावा :यवतमाळ जिल्ह्यातील १७ हजार बचतगटाच्या २ लाखावर महीला पंतप्रधान नरेंद्र मोदींशी हितगुज करणार : मेळावा तयारीपुर्व सभेत निर्धार

१६ फेबु.चा पांढरकवडा मेळावा :यवतमाळ जिल्ह्यातील १७  हजार  बचतगटाच्या २ लाखावर  महीला पंतप्रधान नरेंद्र मोदींशी हितगुज करणार : मेळावा तयारीपुर्व सभेत निर्धार 
दिनांक -१४ फेबु. २०१९
स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदा भारताचे पंतप्रधान यवतमाळ जिल्ह्यातील अतिदुर्गम शेतकरी आत्महत्याग्रस्त आदिवासी भागात  महीला  व  आदिवांसीचा मेळावा घेऊन त्यांच्या वेदना व पॅकेज देण्यासाठी येत्या १६  फेबु .ला पांढरकवडा येत आहेत या संधीचे सोने करण्यासाठी केळापूर ,झरी ,घाटंजी ,राळेगाव ,मारेगाव तालुक्यातील सर्व जनता आतुरतेनी वाट पहात आहे . यावेळी जिल्ह्यातील १७  हजार  बजतगटाच्या २ लाखावर  महीला पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भेटण्यासाठी संपुर्ण तयारी केली असुन यावेळी १ लाखावर शेतकरी व आदीवासी सुद्धा येत असल्याची माहीती कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सुमारे ३ हजारांवर  महीला बचत  गटाच्या सहयोजणींचा व  संघटन  प्रमुख यांचा मेळावापूर्व बैठकीनंतर ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुलकर्णी यांनी दिली .यावेळी  फिरते भांडवल १५ हजार कमीतकमी १ लाख करण्यात यावे तसेच यावेळी  अशी मागणी करण्यात आली . 
यवतमाळ जिल्हयात महीला बजत गटाची चळवळ आता एका सामाजीक क्रांतीकडे पुढे जात असुन मागील तीन वर्षांत बँकांनी सुमारे १०० कोटीच्या वर पतपुरवडा उपलब्ध करून दिला असुन १६ फेबु.ला पंतप्रधान  नरेंद्र मोदी यवतमाळ जिल्ह्यातील १७  हजार  बजतगटाच्या २ लाखावर  महीलाना ३०० कोटीचे भरीव पॅकेज देणार अशी माहीती जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी केल्यावर सर्व  वंचित ,दलीत व आदीवासी महिलांमध्ये नवा जोश  संचारला असुन उमरखेड ,पुसद, दारव्हा, दिग्रस  नेर , महागाव ,यवतमाळ कळंब तालुक्यातील बचत गटाच्या महिलांची हजारोच्या संख्येत येण्याची तयारी कळवली असुन त्याच वेळीळापूर ,झरी ,घाटंजी ,राळेगाव ,मारेगाव तालुक्यातील  गावच्या गाव १६ तारखेला पांढरकवड्याला येणार असल्याची माहिती यावेळी किशोर तिवारी दिली . 
यापूर्वी २००६मध्ये तात्कालीन पंतप्रधान मन मोहनसिंग कोळझरीला येणार होते मात्र त्यांना त्यावेळचे महाराष्ट्राच्या  मंत्र्यांनी येऊ दिले नाही याची खंत आज पर्यंत येथील महिलांना आहे मात्र यावेळी ही आलेली संधी साधून महीला बचत गट कोलाम पारधी तसेच दलितांना विशेष भरीव मदतीचे पॅकेज घेण्याचा विश्वास कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केले . या भागातील सर्व आदिवासी कार्यकर्ते अंकित नैताम सुरेश बोलेनवर मोहन जाधव बाबुलाल मेश्राम भीमराव नैताम यांच्या नेतृत्वात कामाला लागले आहेत. या मेळाव्यात हजारो आदीवासी उपस्थित राहणार अशी माहीती तिवारी यांनी यावेळी दिली . या मेळाव्याला अभूतपूर्व करण्यासाठी जिल्हयातील सर्व तालुक्यातील सर्व महीला बचत  गटाच्या सहयोजणींचा व  संघटन  प्रमुख यांचा सर्व लोकप्रतिनिधी उपस्थितीत तयारीसाठी हजारो कार्यशाळा आयोजित करण्यात येत असल्याची माहीती ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुलकर्णी यांनी दिली  .
===============================================================

No comments: