Sunday, February 17, 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पांढरकवडा मेळावा :महीला व कोलाम -पारधी यांना दिलेल्या पॅकेजचे स्वागत मात्र दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा न दिल्यामुळे निराशा -किशोर तिवारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पांढरकवडा मेळावा :महीला व कोलाम -पारधी यांना दिलेल्या पॅकेजचे स्वागत मात्र दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा न दिल्यामुळे निराशा -किशोर तिवारी 

दिनांक -१७ फेबु .२०१९
स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदा भारताचे पंतप्रधान यवतमाळ जिल्ह्यातील अतिदुर्गम शेतकरी आत्महत्याग्रस्त आदिवासी भागात  महीला  व  आदिवांसीचा मेळावा घेऊन महीला बचत गटांचे   फिरते भांडवल १५ हजार कमीतकमी १ लाख करण्याची त्यांना बिनव्याजी पतपुरवडा  देण्याच्या तसेच स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर पहील्यांदा आदीम जातीसाठी विषेय पॅकेज देऊन कोलाम व पारधी यांना पहील्यांदा दिल्ली व मुंबईच्या मंत्रालयात विषेय विकास अधिकारी तसेच स्वतंत्र डेस्क निर्माण करण्याचा ऐतिहासिक निर्णयाच्या सोबतच मागील दहावर्षाच्या आदिवासींच्या ३६० कोटी रुपयाच्या खावटी कर्जाची माफी देऊन नव्याने खावटी कर्ज सर्व आदिवासींना देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी  व  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांचा पांढरकवडा येथील घोषणेचे स्वागत  कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे व मिशनच्या मागील तीन वर्षाच्या सतत पाठपुराव्याला सरकारने  पॅकेज देऊन दिलासा दिल्यामुळे विदर्भातील ७०लाखावर कोलाम व पारधी तसेच जिल्ह्यातील १७  हजार  बजतगटाच्या २ लाखावर  महीला यांची मागणी पूर्ण झाली आहे यामुळे या अतिमागास भागात विकासाला नवीन दिशा मिळेल असा विश्वास किशोर यांनी यावेळी  व्यक्त केला . 
भारताचे परीवहन व सिंचन मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस -राष्ट्रवादीच्या काळात सतत १३ वर्षांनी रखडलेले बेंबळा , महादापूर ,कोची ,पाचपोर धरणाचे काम तसेच राष्ट्रीय महामार्गासह या भागात ३००० हजार कोटीच्या कामाची सुरुवात केल्याबद्दल त्यांचे विषेय धन्यवाद यावेळी केले .

मात्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कृषी मूल्य ,पतपुरवडा व अपुरे नगदी अनुदान ,पीकपद्धती बदलण्याच्या मूळ मागण्या त्यामध्ये नवीन पीककर्ज वाटप ,कृषी कर्जमाफीची अंबालबजावणीच्या प्रचंड तक्रारी ,कापसाच्या तसेच सोयाबीन व तुरीच्या हमीभावाच्या प्रश्न्नावर मौन पाळल्याबद्दल किशोर तिवारी यांनी आपली नाराजी सरकारला कळवीली आहे कारण यावेळी  पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भेटण्यासाठी यावेळी १ लाखावर शेतकरी  सुद्धा आले होते आपण यासर्व मागण्या पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या समोर मांडणार असुन तोडगा काढण्यासाठी प्रयन्तशील असल्याचे यावेळी  किशोर तिवारी यांनी सांगीतले .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम रद्द झाला आहे अशी अफवा विरोधकांनी सोशल मीडियावर सतत पसरवील्याने सुमारे १ लाखावर महीला व आदीवासी या मेळाव्याला सम्पूर्ण तयारी असूनही येऊ शकले नाही 
अशी माहीती किशोर तिवारी यांनी यावेळी दिली  . या मेळावा अभुतपुर्व यशस्वी करण्यासाठी पालकमंत्री मदन येरावार आमदार संजीव रेड्डी डॉ अशोक उईके  प्रकल्प संचालक राजेश कुलकर्णी भाजप नेते नितीन गिरी बंटी जुवारे तसेच  सामाजिक कार्यकर्ते सतीश झाझरिया रवी नसकुलवार , आदिवासी कार्यकर्ते अंकित नैताम सुरेश बोलेनवर मोहन जाधव बाबुलाल मेश्राम भीमराव नैताम  यांनी अहोरात्र परीश्रम घेतले  या मेळाव्याला यशस्वी पांढरकवडा नगरीच्या व्यापाऱ्यांनी सर्व सामाजिक संस्था जनता व  सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तसेच  जिल्हयातील सर्व तालुक्यातील सर्व महीला बचत  गटाच्या सहयोजणींचा व  संघटन  प्रमुख यांनी केलेल्या सहकार्य अतुलनीय असल्याचे मत किशोर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केली . 
===================================================
===============================================

No comments: