Monday, September 8, 2025

महाराष्ट्रातील कंत्राटदारांच्या होत असलेल्या आत्महत्या रोखा-किशोर तिवारी-कामाआधीच घेतलेले कमिशन परत करण्याचे नेत्यांना आवाहन

महाराष्ट्रातील कंत्राटदारांच्या होत असलेल्या आत्महत्या रोखा-किशोर तिवारी-कामाआधीच घेतलेले कमिशन परत करण्याचे नेत्यांना आवाहन


प्रतिनिधी यवतमाळ 

राज्यातील हजारो कंत्राटदारांची कोट्यवधीची देयके प्रलंबित आहे. पैसे न मिळाल्याने अडचणीत आलेले कंत्राटदार आता आत्महत्या करीत आहे. या आतमहत्या थांबवा तसेच कामाआधीच कंत्राटदारांकडून घेतलेले ३० टक्के कमिशन तत्कालीन आमदार, खासदार तसेच नेत्यांनी परत करावे असे आवाहन शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केले आहे. 

महाराष्ट्रात नोकरशाहीने खर्चाचे ताळमेळ जपण्याचे व आपले सनदी कामे नीट करण्याची घटनात्मक  शपथ घेतली आहे, तरीही कोणतीही अर्थ संकल्पीय तरतूद नसतांना सुमारे २ लाख कोटींची कामे २०२४ च्या विधानसभा निवडणुकी पुर्वी निविदा काढून देण्यात आली. तत्कालीन सर्व पक्षाच्या लोक प्रतिनिधींनी या कंत्राटदाराकडून कमीतकमी ३० टक्के कमिशन घेतले असुन देयके न मिळाल्याने प्रत्येक आठवड्यात कमीत कमी दोन कर्जबाजारी कंत्राटदार आत्महत्या करीत आहे. या कंत्राटदारांना वाचविण्यासाठी ५० हजार कोटी कमीशनपोटी हात उसने घेतलेले परत करावे अशी कळकळीची विनंती शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी देवाभाऊला  केली आहे. यामुळे निरपराथ लहान कंत्राटदारांच्या आत्महत्या थांबतील असेही त्यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. ५० हजार कोटी कमीशन घेणाऱ्यांमध्ये प्रमुख वाटा तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथांच्या व देवाभाऊचे संकटमोचक गिरीश महाजन व सनातनी भ्रष्ट दादांचा आहे. त्याच बरोबर सर्व तत्कालीन आमदार, खासदार यांनी सुद्धा घटनात्मक अधिकाराने पैसे घेतले आहे. आता मात्र हे सर्व मंत्री, आमदार व खासदार असहाय्य झाले आहेत कारण महाराष्ट्र सरकार प्रचंड आर्थीक संकटात आले आहे. मार्च २०२६ मध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षात महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात राज्याचे कर्ज १० लाख कोटी रुपयांचे वर  होणार आहे,  त्यामुळे महाराष्ट्रातील अंदाजे १३ कोटी नागरिकांपैकी प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर कमीत कमी ८० हजार रुपयांचे कर्ज राहणार आहे, ही महाराष्ट्र निर्मिती पासून आजवरची सर्वात जास्त आर्थिक विपन्नावस्था आहे ,असे किशोर तिवारी यांनी सरकारी आकड्यांचा आधार घेत म्हटले आहे 

देवाभाऊंचा दावा खोटा 

या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ५७ हजार ५०९ कोटी ७१ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या ठेवल्या त्या पुर्णपणे नियमांची पायमल्ली असुन यावर मुख्य सचिवांसह अर्थसचिवांनी हरकत घेतली आहे. सध्या नौकरदारांचे पगार देण्यासाठी कर्ज घेण्याची अवस्था सरकारवर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व सरकारी कंत्राटदारांची यंदा दिवाळी चांगली जाईल हा देवाभाऊंचा दावा धांदात खोटा आहे. फक्त भाजपच्या सर्व कंत्राटदार मंत्री, आमदार यांची देयके देण्यात येतील व यासाठी आपले राज्यकर्ते आत्महत्या केलेल्या कंत्राटदारांच्या टाळूवरील लोणी खातील, त्यामुळे देवाभाऊंनी जाहिरातीच्या माध्यमातून प्रसिध्दीचा हव्यास टाळून कंत्राटदारांच्या आत्महत्या रोखण्याचे आवाहन  किशोर तिवारी यांनी केले आहे. 
=======================
प्रति, संपादक, जिल्हा प्रतिनिधी
वरील बातमी आपल्या प्रसिध्द वृत्तपत्रात प्रकाशित करावी, ही विनंती.

No comments: